logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रीय परीक्षा संस्थेमार्फत अहिल्यानगर जिल्ह्यात रविवार, २१ जून २०२६ रोजी नीट २०२६ ची पुनर्परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, यासाठी ५ हजार ३८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेची वेळ दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ अशी निश्चित करण्यात आली आहे, तर दिव्यांग प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी परीक्षा सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत चालणार आहे. परीक्षेचे सुरळीत, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त आयोजन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. यामध्ये १२ केंद्र अधीक्षक, १६ उपकेंद्र अधीक्षक, १६ निरीक्षक, २२५ कक्ष निरीक्षक, ३ एनटीए प्रतिनिधी तथा भरारी पथके, १२ कर्तव्य दंडाधिकारी, १०७ पोलीस कर्मचारी, २१ जिल्हा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी आणि १२ वाहनचालक यांचा समावेश आहे. परीक्षेच्या दिवशी सर्व केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, कर्तव्य दंडाधिकारी, निरीक्षक आणि भरारी पथकांमार्फत सतत देखरेख ठेवली जाईल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, फिटनेस बँड, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, पेन ड्राइव्ह, कॅमेरे, पेजर, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पर्स, हँडबॅग, पुस्तके, वह्या, नोट्स, छापील साहित्य, सैल कागदपत्रे, जिओमेट्री बॉक्स, लॉग टेबल, स्लाइड रूल, कोणतेही संप्रेषण साधन तसेच गैरप्रकारास मदत करणारे कोणतेही साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. उमेदवारांनी केवळ एनटीएने परवानगी दिलेल्या वस्तू, प्रवेशपत्र आणि वैध छायाचित्रयुक्त ओळखपत्र सोबत आणावे. जिल्हा प्रशासनाने सर्व उमेदवार, पालक आणि नागरिकांना परीक्षा शांततापूर्ण व सुरळीत वातावरणात पार पडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

3 hrs ago
user_संस्कार न्यूज
संस्कार न्यूज
Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
3 hrs ago
e52b7c4c-a4ec-476f-a5c9-08521e9688a0

More news from Maharashtra and nearby areas
  • महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एका हनुमान मंदिराचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत.
    1
    महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एका हनुमान मंदिराचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    20 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातील एका मंदिरात आज शनिवारी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी मंदिराच्या चालू बांधकामाचे छत अचानक कोसळल्याने एक भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात भाविक जागीच ठार झाले आहेत, तर अनेक भाविक घायाळ झाले आहेत. सध्या काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, मंदिराचे छत कोसळल्याने सात जण ठार झाल्याची आणि अनेक जण दबल्याची शंका यातून व्यक्त होत आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातील एका मंदिरात आज शनिवारी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी मंदिराच्या चालू बांधकामाचे छत अचानक कोसळल्याने एक भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात भाविक जागीच ठार झाले आहेत, तर अनेक भाविक घायाळ झाले आहेत.

सध्या काहीजण अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची चर्चा सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, मंदिराचे छत कोसळल्याने सात जण ठार झाल्याची आणि अनेक जण दबल्याची शंका यातून व्यक्त होत आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • लखन वाघमारे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीरपणे टेकडी फोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येईल. त्यांनी प्रशासनाला तातडीने योग्य पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल.
    1
    लखन वाघमारे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीरपणे टेकडी फोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येईल. त्यांनी प्रशासनाला तातडीने योग्य पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • कवी नितीन चंदनशिवे यांनी एका विशिष्ट प्रसंगाचे वर्णन केले आहे, जिथे त्यांची बी.कॉम. पदवीधर पत्नी पहिल्यांदाच चुलीजवळ आली. हा अनुभव त्यांनी आपल्या शब्दांत मांडला आहे.
    1
    कवी नितीन चंदनशिवे यांनी एका विशिष्ट प्रसंगाचे वर्णन केले आहे, जिथे त्यांची बी.कॉम. पदवीधर पत्नी पहिल्यांदाच चुलीजवळ आली. हा अनुभव त्यांनी आपल्या शब्दांत मांडला आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • हैदराबाद गॅझेटने दिलेल्या माहितीनुसार, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अंबड येथे हरीश राठोड यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे.
    1
    हैदराबाद गॅझेटने दिलेल्या माहितीनुसार, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अंबड येथे हरीश राठोड यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    खेड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • बहुजन मुक्ती पार्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र भूमिका घेतली असून, विषारी दारूच्या बळींना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. पक्षाची मागणी आहे की, विषारी दारूच्या बळींना न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारातील निष्काळजीपणा जबाबदार आहे.
    1
    बहुजन मुक्ती पार्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र भूमिका घेतली असून, विषारी दारूच्या बळींना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. पक्षाची मागणी आहे की, विषारी दारूच्या बळींना न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारातील निष्काळजीपणा जबाबदार आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • राज्यात पाऊस न पडल्यामुळे बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता देवाला साकडे घातले असून, पाऊस कधी पडणार, अशी प्रार्थना ते करत आहेत.
    1
    राज्यात पाऊस न पडल्यामुळे बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आता देवाला साकडे घातले असून, पाऊस कधी पडणार, अशी प्रार्थना ते करत आहेत.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुणे शहरात सराईत गुंडांनी उघडपणे उच्छाद मांडला असून, यामुळे आता कायद्याची भीती संपली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    1
    पुणे शहरात सराईत गुंडांनी उघडपणे उच्छाद मांडला असून, यामुळे आता कायद्याची भीती संपली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.