नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद होणार? कर्जमाफी मिळालेले शेतकरी अपात्र? शासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय नाही अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ९व्या व १०व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना, काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर ही योजना बंद होणार असल्याच्या तसेच कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, उपलब्ध अधिकृत माहितीनुसार या संदर्भात राज्य शासनाने अद्याप कोणताही शासन निर्णय (GR), परिपत्रक किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच मुख्यमंत्री, कृषिमंत्री किंवा संबंधित विभागाकडून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून अपात्र ठरवण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. काही माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने विविध दावे केले जात असले तरी, त्याला शासनाची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अप्रमाणित माहिती किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, शासनाच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी संघटना आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाने या विषयावर लवकरात लवकर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रलंबित ९वे व १०वे हप्ते वेळेत वितरित करावेत, अशी मागणी केली आहे. शासनाकडून अधिकृत निर्णय किंवा घोषणा झाल्यास त्याची माहिती तत्काळ प्रसिद्ध केली जाईल. विश्वासार्ह, अचूक आणि जनहिताची बातमी.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद होणार? कर्जमाफी मिळालेले शेतकरी अपात्र? शासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत निर्णय नाही अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ९व्या व १०व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना, काही वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर ही योजना बंद होणार असल्याच्या तसेच कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळले जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, उपलब्ध अधिकृत माहितीनुसार या संदर्भात राज्य शासनाने अद्याप कोणताही शासन निर्णय (GR), परिपत्रक किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच मुख्यमंत्री, कृषिमंत्री किंवा संबंधित विभागाकडून कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून अपात्र ठरवण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. काही माध्यमांमध्ये सूत्रांच्या हवाल्याने विविध दावे केले जात असले तरी, त्याला शासनाची अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अप्रमाणित माहिती किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, शासनाच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी संघटना आणि लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाने या विषयावर लवकरात लवकर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रलंबित ९वे व १०वे हप्ते वेळेत वितरित करावेत, अशी मागणी केली आहे. शासनाकडून अधिकृत निर्णय किंवा घोषणा झाल्यास त्याची माहिती तत्काळ प्रसिद्ध केली जाईल. विश्वासार्ह, अचूक आणि जनहिताची बातमी.
- दबाव, गुंड आणि ठरावाचा आरोप ; रोहित पवारांचा शिवेंद्रराजेंवर जोरदार हल्लाबोल ; भाजपमध्ये गेल्यानंतर अशी संस्कृती सुरू झाली अहिल्यानगर साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव, दहशत आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा रोहित पवार यांनी करत या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले की, शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी आमचा जुना परिचय असून त्यांच्या कुटुंबाबद्दल मनात आदर आहे. मात्र, अलीकडील सोसायटी ठराव प्रकरणात ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरल्याच्या चर्चा समोर येत आहेत, त्या लोकशाहीला घातक आहेत. निर्णय हा लोकशाही मार्गाने व्हायला हवा; दडपशाहीच्या माध्यमातून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. *आ.रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही केली मागणी* आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष निशाणा साधत भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत, असा आरोप केला. हा निर्णय शिवेंद्रराजेंचा वैयक्तिक होता की त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला होता, याबाबत आपण ठामपणे बोलू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे आणि दबाव टाकून निर्णय मंजूर करून घेणे वेगळे आहे. अशा प्रकारच्या राजकारणाला जनतेची मान्यता नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी केली.1
- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी राहुरी फॅक्टरी, प्रतिनिधी : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवळाली प्रवरा येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व पेन देण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे, शहराध्यक्ष शरदभाऊ लोखंडे, उपशहराध्यक्ष सुनीलभाऊ रोकडे, सेक्रेटरी सागरभाऊ उल्हारे तसेच सदस्य करण लोंढे, संदीप तोडमल, प्रफुल शिंदे उपस्थित होते. देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक बाळासाहेब लोखंडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा संघटक नंदूभाऊ उल्हारे यांच्या वतीने गरजू दोन विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश भेट देण्यात आले. या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपत शिक्षण, सामाजिक समता आणि समाजसेवेचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.1
- सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक लढा उभारण्याचे आवाहन; शिरूर {. डेली न्यूज पोस्ट टीम 24}सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट थांबवणे हे पोलिसा बरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. सजग आणि सतर्क राहूनच या संकटावर मात करता येईल. सायबर गुन्ह्यांचे संकट आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचले असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी केले. शिरूर पोलिसांच्या वतीने सायबर गुन्हे व अंमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रवींद्र भोसले म्हणाले, "छुप्या पद्धतीने तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक किंवा एपीके (APK) फाईल कधीही डाउनलोड करू नयेत. ओटीपी कोणालाही सांगू नये तसेच बनावट लोन अॅप्सपासून सावध राहावे." पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देऊ नका, खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नका आणि बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी १९३० हा राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक असल्याची माहितीही त्यांनी दिली. अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत बोलताना नखाते म्हणाले की, गांजा, अफू, चरस आणि विशेषतः एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांचे व्यसन तरुणांमध्ये वाढत आहे. थ्रिलच्या नादात अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. शिरूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा, त्यांच्या मित्रपरिवार आणि हालचालींकडे लक्ष द्यावे. युवकांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून प्राणायाम, ध्यानधारणा आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस शिरूर नगरपालिकेच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, मीना पाडळे, हनुमंत सोनवणे, राजाराम चौरे, सुदर्शन भाकरे, गणेश पवार, विशाल गदादे, संदीप पवार, रोहित दाते, अशोक पाचुंदकर, अर्चना थोरात, वर्षा पवार, सोनल गोरडे, राहुल जगताप, स्नेहल निचित, सर्जेराव बोऱ्हाडे, भानुदास रोकडे, बाबासाहेब शेलार, भास्कर ओव्हाळ, शितल गायकवाड, वैशाली गायकवाड, ऋतुजा वराळ, पल्लवी पुदगाणे, विशाल कारखिले, इंदिरा जाधव, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, रेश्मा शेख, शोभना पाचंगे, रवींद्र सानप, ज्योती गायकवाड, उर्मिला कुसेकर, उत्तम शेलार, अमित उकिरडे, दिव्या कारकूड, शोभा मंदीलकर, संदीप भोगावडे, देवल शहा, रामभाऊ सरोदे, नितीन भंडारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अमोल गारुडी यांनी मानले.4
- ट्रक चालकाने वैतागून रस्त्यावर ओतत इथेनॉल मिश्रित डिझेलचा पर्दाफाश केला1
- छ संभाजीनगर -कॉकरोच पार्टीचे अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली छ संभाजीनगर कॉकरोच अभिजीत दिपकेची प्रकृती बिघडली कॉकरोच जनता पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांची प्रकृती बिघडली असून, भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना भेटत असताना अभिजीत दिपके यांना उलटी झाली, अभिजीत दिपके यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी डॉक्टर दाखल बाईट -डॉक्टर विशाल लहाने1
- प्रभाग १२ मध्ये जुनी भाजी मंडई परिसरात मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य प्रभाग १२ मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांचा संताप आण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार लोणंद : प्रभाग क्रमांक १२ मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली. मात्र, संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, "मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत. आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी." नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला.1
- हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबतसेक्सकरतो हाभामटाराहुरीफैक्ट्रीचाआहेअविनाशकोल्हेआहेआईसोबसेक्सकरतोयाचीआईयाचाबुलाघेतीटोडामधी1