गांधी चौक पोलिसांच्या विशेष पथकाने चोराला पकडून मुद्देमाल जप्त केला पो. नि. रेजितवाड यांच्या पथकाची दमदार कामगिरी !! झटपट पकडली जबरी चोरी !! लातूर : गांधी चौक पोलीस ठाण्याला प्रभारी अधिकारी म्हणून ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड रुजू झाल्यापासून या पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला जणू चैतन्य प्राप्त झाले आहे. गुन्ह्याचा तपास काही तासातच लावण्यात आता गांधी चौक पोलीस पटाईत झाले आहेत. अशी चर्चा लातूरला चालू झाली आहे. गांधी चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आपल्या हद्दीत एका वृद्धास मारहाण करून त्याच्या खिशातील रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास गंजगोलाई येथील मिरची लाईन परिसरात ही घटना घडली. फिर्यादी अजोमाद्यीन बाशूमियों शेख (रा. खुंटेगाव, ता. औसा, जि. लातूर) यांना आरोपीने अडवून “तुझ्या जवळ किती पैसे आहेत? ते मला दे” असे म्हणत मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील 6400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले, आणि “कोणाला सांगितले तर जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी दिली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 101/26 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३५१(२)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानुसार पोउपनि चित्ते, सफौ राजेंद्र टेकाळे, पोह प्रकाश भोसले, राम गवारे, रविसन जाधव, पोलीस नाईक संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले व शिवराज भाडुळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी मिरची लाईन, गंजगोलाई येथून विशाल उत्तम रणदिवे (वय २८, रा. वैशाली नगर, लातूर) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून लुटलेली 6400 रुपयांची रोख रक्कम मुद्देमाल म्हणून जप्त करण्यात आली आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि सोनकांबळे करीत आहेत.

- लातूर -लातूर मध्ये पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –चार आरोपींना तात्काळ अटक; न्यायालयाकडून पी.सी.आर.मंजूर शहर Dysp समीरसिंह साळवे याची पत्रकार परिषदेत माहिती2
- 📍पुरणमल लाहोटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा किरकोळ वाद गेला विकोपाला चार आरोपींना पोलिसांनी तात्काळ केलं जेरबंद, 📍 न्यायालयाकडून पीसीआर मंजूर. 📍 किरकोळवादातून युवकांनी कायदा हातात घेऊ नये संयमाने लोकशाही मार्गाने वाद मिटवता येतात -DYSP समीर सिंह साळवे1
- 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia1
- Post by Today One Live1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Mohammad Rafikh1
- ऊस मजुराचा मुलगा मंगेश ढेपे झाला सी.ए. लातूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील केवळ शे दीडशे लोकवस्तीच्या छोट्याशा 'आनंदवाडी' या गावाने अभिमानाने मान उंचावली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, एका ऊस मजुराच्या मुलाने, मंगेश व्यंकटराव ढेपे याने सी.ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मंगेशच्या या यशाने संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत असून गावात एखाद्या उत्सवा सारखा आनंद साजरा केला जात आहे. मजुरी करून वडिलांनी लेकाला शिकवलं मंगेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. वडील व्यंकटराव ढेपे हे अल्पशिक्षित असून कोरडवाहू शेती आणि ऊसाच्या गुऱ्हाळावर मजुरी करून संसाराचा गाडा ओढतात. आई दुग्धव्यवसाय करून घरखर्चाला हातभार लावते. मंगेशने त्याचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षणासाठी त्याला दररोज ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागली.लातूरच्या दयानंद कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केल्यानंतर, २०१५ मध्ये त्याने पुणे गाठले. अडीच हजारांच्या नोकरीपासून सी.ए. पर्यंतचा प्रवास सी.ए. चा अभ्यासक्रम अत्यंत खर्चिक आणि कठीण असताना मंगेश डगमगला नाही. पुण्यात सुरुवातीला त्याने अवघ्या अडीच हजार रुपये पगारावर खासगी नोकरी करत स्वतःच्या खर्चाला जोड दिली. वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून मंगेशच्या शिक्षणाची ओढ कायम ठेवली. २०१६ पासून सुरू झालेला हा खडतर प्रवास अखेर यशात परावर्तित झाला. मंगेशच्या या यशाने पूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादा सण साजरा करावा त्या पद्धतीने गावकरी आनंद उत्सव साजरा करत आहेत. मंगेश ढेपे यांच्यावर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. मंगेश ढेपे यांचे आवाहन तरुणांनो जिद्द ठेवा, मी मदतीला तयार! "माझ्या यशाचे पूर्ण श्रेय माझ्या वडिलांच्या कष्टाला आहे. ग्रामीण भागातील तरुण पिढीने व्यसनांच्या आहारी न जाता मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मनात जिद्द असेल तर यश नक्की मिळते. कोणत्याही गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मार्गदर्शनाची गरज असल्यास मी मदतीसाठी सदैव तत्पर असेन." — मंगेश ढेपे,1
- 📍पुरनमल लाहोटी कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादातुन एकाचा खुन तर 3जण गंभीर जखमी.❌ लातूर मध्ये सध्या ज्या घटना घडत आहेत त्या पहिल्या असता लातूरकर सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होत आहे. आज लातूर शहरामध्ये पुन्हा एकदा मुख्य रस्त्यावर एका तरुणाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. खरंतर लातूरच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत 3आरोपीना घेतले ताब्यात, पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.1
- Post by Today One Live1