मायलेक जागीच ठार ; ड्रिंक अँड ड्राईव्हने घेतला दोघांचा बळी विक्रम शिंदे /भोर दि.३१ सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी भोर- कापूरव्होळ मार्गावरील आळंदे ते कासुर्डी दरम्यान दुचाकीवरील मायलेक मोटारीने उडवल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.३१) दुपारी पावणेदोनच्या दरम्यान घडली आहे.अमृत लक्ष्मण धावले वय २८ आणि नंदा लक्ष्मण धावले वय ५५ रा.तेलवडी( ता.भोर ) असे दुर्दैवी मायलेकाचे नाव आहे. याबाबत स्थानिकांनी दिलेली माहीत अशी मृत अमृत आणि त्याची आई आळंदे येथील शेतातील काम उरकून तेलवडी (ता .भोर ) येथील आपल्या घरी दुचाकीने (एम एच १२ पी.व्ही. ८०६९) चालले होते.दरम्यान भोरहून कापूरव्होळच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी मोटारीने (एम एच १२ व्ही एन ०१०१) दुचाकीला मागील बाजूने जोरात धडक दिली.दोघेही दुचाकीसह रस्त्याच्याकडेला खड्ड्यात पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने जागीच ठार झाले.मोटारीमध्ये ३ तरुण असल्याची माहीती मिळत आहे.घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र राठोड यांचेसह पोलीस हवालदार राजेंद्र घायाळ यांनी घटना स्थळी धाव घेत जगदगुरू नरेंद्र महाराज नाणीज सेवाट्रस्ट रुग्णवाहिका चालक तुळशीराम अहिरे यांचे मदतीने जखमींना नसरापूर येथील इस्पितळात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यु झाला.मोटारीतील तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून मोटार चालकासह तिघांनी मद्यप्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना हुल्लडबाज तरुणांनी मद्य प्राशन करून गाडी चालविल्याने निष्पाप मायलेकाचा मृत्यु झाल्याने आळंदे ,तेलवडी तसेच कासुर्डी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तर ड्रिंक अँड ड्राइव्हच्या या घटनेमुळे नागरिकांनी चीड व्यक्त केली आहे.

- गाजियाबाद, UP में हिंदू रक्षा दल ने तलवारें बांटी। वीडियो सामने आने पर पुलिस ने HRD अध्यक्ष सहित 16 नामजद और 30 अज्ञात कार्यकर्ताओं पर FIR दर्ज की। 10 आरोपियों की गिरफ्तारी हुई। #viral #viralreels #viralvideos #uttarpradesh1
- तीर्थस्थळांना शिवप्रतिमा भेट मुरबाड, शहापूर तालुक्यातील अनेक तीर्थस्थळे येथे शिवप्रतिमा स्थापना कार्यक्रम राबवला जात आहे.मुरबाड तालुक्यातील ठूणे गावचे शिवप्रेमी व्यक्तिमत्व श्री ज्ञानेश्वर मुरबाडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा स्थापना कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र संगमेश्वर येथे उपस्थित राहून भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा वतीने शुभेच्छा दिल्या.यावेळी ह. भ. प.मधुकर महाराज मलिक गुरुजी, सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष मुरबाडे उपस्थित होते.1
- https://youtube.com/shorts/JQw1lOaRt58?si=Pr-VTQg1ytGYtQbB1
- रात्रीच्या अंधारात काय घडलं? ओझरमधील नामांकित शोरूममध्ये मोठी चोरी; लाखो रुपयांवर डल्ला ! प्रतिनिधी सचिन वखारे....1
- Post by Ashish Kumar1
- Ward No 16 से Haji Isa Qureshi ने अपना Nomination Form File Kiya | Gallinews Bharat1
- वडिलांच्या स्मृती पदार्थ हेमंत शिंगाडे यांनी बांधली पाणपोई पोशेरा - वडीलांच्या स्मृती प्रितर्थ, सामाजिक कार्यकते हेंमत शिंगाडे यांनी केला अनोखा उपक्रम. पाणपोईच्या माध्यमातुन वाटसरूना दिला थंड पाण्याच्या आधार.आज कालची तरुण पिडी मोबाईल च्या गर्तेत अडकली असताना वडीलांच्या वारकरी सेवेचा वसा, मुलाने पाणपोई उभारून आदरांजली वहान्याचा स्तुत्य उपक्रम राबवला. मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील सामाजिक युवा कार्यकते, हेंमत शिंगाडे यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ पोशेरा येथे, बसस्थानकावर वाटसरू साठी पाणपोई उभारून समाजासमोर, एक वेगळा आदर्श मांडला असून, या स्तुत्य उपक्रमामुळे सर्वत्र हेंमत शिंगाडे यांचे कौतुक केले जात आहे. या पाणपोई उदघटना प्रसंगी विदर्भातील प्रसिद्ध विद्रोही कवी व वक्ता कॉम्रेट गोविंद पोलाड. माजी सभापती प्रदीप वाघ, पोशेरा ग्रामपंचायत सरपंच मनोहर नवले,पत्रकार हानिफ शेख, ज्ञानेश्वर पालवे,भाऊ वैजल, माजी सभापती जयराम निसाळ, लक्ष्मण शिंगाडे, जयराम वाघ आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.. या निम्मित्ताने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटून,कार्यक्रमात अनोखी भर पाडली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राथमिक शिक्षक श्री. भालचंद्र धनगरे यांनी केले तर समाज परिवर्तनाची नांदी इतराकडून होईल हि अपेक्षा न ठेवता हेंमत शिंगाडे या युवाकाने, स्वतापासून बदल घडविण्याचे काम करत असल्याची भावना, माजी सभापती, प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली.2
- https://youtube.com/shorts/yvGkIX-aVJg?si=-SHz_0n-zjDsvSES1
- जालन्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार तर भाजप स्वबळावर 65 जागा लढणार1