पुणे महापालिका भरती परीक्षेवरून वाद तीव्र; दूरच्या केंद्रांमुळे उमेदवार त्रस्त परीक्षा पुण्यातच घेण्याची जोरदार मागणी पुणे : प्रतिनिधी पुणे महानगरपालिकेच्या ज्युनियर इंजिनिअर पदांच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या अडचणींमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. तब्बल १६९ पदांसाठी होणारी ऑनलाईन परीक्षा दि. २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी होणार असली तरी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील उमेदवारांना नागपूर, अमरावती, नांदेडसारख्या दूरच्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक उमेदवारांना तब्बल ५०० ते ९०० किलोमीटर दूर जाऊन परीक्षा द्यावी लागत असल्याने प्रवास, निवास आणि अन्न यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. अंदाजे ५ ते १० हजार रुपयांचा खर्च प्रत्येक उमेदवारावर पडत असून, बहुसंख्य उमेदवार हे गरीब व शेतकरी कुटुंबातील असल्याने हा खर्च परवडणारा नसल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या विदर्भ आणि मराठवाडा भागात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. अशा परिस्थितीत लांबचा प्रवास करणे आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. दोन दिवसांचा प्रवास, त्यानंतर परीक्षा आणि परतीचा प्रवास—या सर्वामुळे उमेदवारांवर मानसिक व शारीरिक ताण वाढत आहे. या सर्व अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार परीक्षा देण्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन परीक्षा पुण्यातच आयोजित करावी किंवा परीक्षेचे दिवस वाढवून स्थानिक केंद्रांची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. या प्रश्नावर खा. श्रीरंग बारणे यांना निवेदन देण्यात आले असून, त्यांनी महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परीक्षा स्थगित करून पुण्यातच घेण्यात यावी, किंवा गैरसोयीमुळे अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी १० ते १५ दिवसांत पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रकाश जाधव, मारुती भापकर, आबासाहेब ढवळे, सतीश काळे, ब्रह्मानंद जाधव आणि प्रसाद दौंडकर यांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला असून, “गरीब व होतकरू उमेदवारांना न्याय मिळावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1