logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

“कार्याचा गौरव, नव्या वाटचालीचा संकल्प : महाराष्ट्र दिनी ५० कार्यकर्त्यांचा सन्मान” महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने संस्थेतील विविध शाखांमध्ये वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० कार्यकर्त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. या सोहळ्याने संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या समर्पण, मेहनत आणि योगदानाचा सन्मान करत एक प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. यावेळी चेअरमन प्रमोद देशमुख यांनी मार्गदर्शन करताना संस्थेतील सर्व विभागांमधील समन्वय अधिक दृढ करण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थी केंद्रित उपक्रमांना अधिक प्राधान्य देत शिक्षण प्रक्रियेला अधिक परिणामकारक बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, संस्थेतील अंतर्गत व्यवस्थापन अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्यासाठी श्री. शीतलकुमार जोशी व आयटी टीमने विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीचा नियमित वापर करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. या प्रणालीमुळे कामे अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्था आणि परिसरात राबवले जात असलेले पर्यावरणपूरक प्रकल्प हेच संस्थेच्या कार्याचा गाभा असल्याचे नमूद करत, या उपक्रमांकडे विशेष लक्ष देण्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील अध्यापिका श्रीमती किरण सलगर यांनी भौतिकशास्त्र विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी आ प्रमोद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सचिव डॉ जयंत जकाते, खजिनदार श्री संजीव सगरोळीकर आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील देशमुख उपस्थित होते.

22 hrs ago
user_Jawed
Jawed
Press reporter देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
22 hrs ago
8f0016e1-0537-4765-9d81-dda17d4e434b

More news from Maharashtra and nearby areas
  • नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    1
    नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.  आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. 
नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
  • Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    1
    Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    user_MAHARAJ TRAVELS NILANGA
    MAHARAJ TRAVELS NILANGA
    निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Shaikh Rafik Qureshi
    1
    Post by Shaikh Rafik Qureshi
    user_Shaikh Rafik Qureshi
    Shaikh Rafik Qureshi
    हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
    1
    डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष अश्वजितभैय्या गायकवाड यांच्या पुढाकाराने आज 30 एप्रिल रोजी इंजिनिअर विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हेर तालुका उदगीर येथे स्तुत्य उपक्रम राबविला. 
गावातील निराधार अंध राम सूर्यवंशी यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. रस्त्याच्या कडेला प्रांतविधिला जाताना कित्येकदा गाडयांना धडकून तो जखमी झाला. जेवण वेळेवर मिळत नसल्याने उपासमार त्याच्यावर आली होती. 
आज सेवाकुंडचे अध्यक्ष अश्वजित भैय्या यांनी रामला सुलभ शोचालय बांधून दिले आणि त्याच्या दोन वेळच्या जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था केली. आज खऱ्या अर्थाने विश्वजित भैय्याचा वाढदिवस लहान भावाने समाजाला खूप मोलाचा संदेश देऊन साजरा केला. 
अश्वजित भैय्या आपल्या हातून असेच कार्य घडो आणि सेवाकुंड यशोशिखराला जाओ!  हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक एक मे 2026. लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
    1
    लातूरच्या चित्रपटगृहात राजा शिवाजी प्रदर्शित. 
रितेश देशमुख दिग्दर्शनात राजा शिवाजी चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी गर्दी. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शुक्रवार दिनांक एक मे 2026.
लातूर शहरात आज महाराष्ट्र दिनी 1 मे 2026 रोजी राजा शिवाजी चित्रपट रितेश देशमुख दिग्दर्शित प्रदर्शित झाला रितेश देशमुख यांच्या जन्म ठिकाणी त्यांनी पहिला शो प्रेक्षकांच्या साक्षीने पाहिला प्रेक्षकांच्या गर्दीने रितेश देशमुख यांचे मने जिंकली.
आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी महाराष्ट्राला अनमोल भेट दिली. राजा शिवाजी या चित्रपटात शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचा दडलेला इतिहास पुढे आणला यामुळे शिवप्रेमींच्या वतीने आभार मानण्यात आले. 
यावेळी रितेश देशमुख यांनी बोलताना प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.