नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे; पुणे महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे कार्यरत.. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी येथील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य राबविण्यात आले असून, बोटींच्या सहाय्याने सुमारे ७० ते ८० नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. सिंहगड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत घनकचरा व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग तसेच MSEDCL ची पथके प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. रात्रीच्या वेळेसही आवश्यक पथके क्षेत्रात तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. काही नागरिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, नदीपात्र व पाण्याचा प्रवाह असलेल्या धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सतर्क राहा, सुरक्षित राहा.

- नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवू पिंपरीच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे आश्वासन पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इम्रान बॅग यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक संघटना आणि समाजबांधवांकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गुन्हेगारीविरोधातील प्रत्येक मोहिमेत पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानत1
- मोशी दुर्घटना प्रकरण अधिकाऱ्यांवर महेश लांडगेंचा वरदहस्त, रोहित पवारांचा आरोप... पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेवरून आमदार रोहित पवार यांनी थेट अधिकाऱ्यांवर आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.संजय कुलकर्णी नावाच्या अधिकाऱ्याला सातत्याने काम मिळत राहावं, याची काळजी घेतली जाते, असा दावा रोहित पवारांनी केला.तसंच, संबंधित अधिकाऱ्यांवर आमदार महेश लांडगे यांचा वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला.मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या या आरोपांमुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे... #मोशीदुर्घटना #मोशीकचराडेपो #रोहितपवार #महेशलांडगे #संजयकुलकर्णी #पिंपरीचिंचवड #पिंपरीचिंचवडन्यूज #मोशी #राजकीयआरोप #अधिकारी #पुणेन्यूज #महाराष्ट्रन्यूज #BreakingNews #RohitPawar #MaheshLandge #MoshiAccident #PimpriChinchwad #TheNayakNews1
- "ज्या मुलांनी शिव्या दिल्या... त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश..!"1
- सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. सिन्नर फॉरेस्टचा भोंगळ कारभार व भ्रष्टाचार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा. राजरोस वृक्ष तोंड, उत्खनन करून माती,मूर्माचे विक्री, किती रोप आणली किती लागवड व वृक्ष जतन झाले का? कोट्यवधी पैसा व निधी हडप. माती ,मुरुमाची रॉयल्टी भरले का? सिन्नर फॉरेस्ट कार्यालयात भयंकर भ्रष्टाचार? अवैध वृक्ष तोड -- ------------------ सिन्नर तालुक्यातील वनक्षेत्रात दररोज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड चालू आहेत. अधिकारी दुर्लक्ष करतात याआडून भ्रष्टाचार चालू आहेत. माती व मुरुमाची बेकायदेशीर उत्खनन व विक्री --- ---------------------------------++ वनजमिनींतून अनेक ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन झाले आहेत. रॉयल्टी चुकवून यात अधिकारी कर्मचारी यांनी टेबलाखालून वरून पैसा कमावत भ्रष्टाचार केला आहेत. आज पर्यंत वनक्षेत्र जमिनीत उत्खनन किती झाले? किती रॉयल्टी भरली? किती पैसा कुणीकुणी हडपला याची चौकशी व्हावी. मलिदा चाखायचाय मिळतोय यामुळे वारेमाप उत्खनन होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहेत. वृक्ष रोप व वृक्ष लागवड योजनेत भ्रष्टाचार - --------------------------------- आजपर्यंत रोप खरेदी किती खर्च प्रत्यक्षात किती रोप खरेदी? लागवड किती केली? वृक्ष जतन खर्च किती? वृक्ष जगली किती? जंगल कुठे वाढवली? यासाठी निधी किती आला? हा कोट्यवधी निधी कुठे खर्च केला! याचा रिझल्ट म्हणजे जंगल, झाडे कुठे? हिशोब द्यावा. म्हणून काही रानात वणवा पेटला की झाकण्यासाठी पेटविला? रान पेटवत कोण? हेतू काय? अनेक जंगल राखण करण्यासाठी त्या भागातील साधाभोळा शेतकरी कर्मचारी नेमायाचा. त्याचा पगार न देता हडप करायचा. पैसे झिरवण्यासाठी त्याला वर्ष दोन वापरून कामावरून कमी करायचे.याची चौकशी करून कारवाई करावी. वृक्ष लागवड व जतन योजनेत कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार झाला आहेत. कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी. वरील मागण्यासाठी व या भ्रष्टाचार विरोधात शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर वतीने आमरण उपोषण करण्यात येणार. - शरद शिंदे पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सिन्नर मो.९६८९३५०६२२.1
- येवलेवाडीत देवळावरती 'गणपती बाप्पा' आणि खाली 'दारूचे दुकान': सामाजिक कार्यकर्ते सुधीर बनसोडे आक्रमक; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर! "पुण्यातील येवलेवाडी येथील कामठे-पाटील नगरमधून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. जिथे एका बाजूला पवित्र 'गणपती मंदिराची' जागा आहे, त्याच इमारतीत खाली 'टेका वाईन्स' हे दारूचे दुकान थाटण्यात आले आहे! या प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुधीर बनसोडे आक्रमक झाले असून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. धार्मिक भावनांचा बोजवारा उडाला असतानाच, या दुकानामुळे परिसरामध्ये मद्यपींचा विळखा पडला आहे. उघड्यावर आणि गाड्यांमध्ये बसून चालणाऱ्या नशेत धिंगाण्यामुळे महिला व मुलींचे घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महिला वर्गात कमालीची भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. मंदिराजवळ दारूच्या दुकानाला परवानगी दिलीच कशी? आणि स्थानिक पोलीस प्रशासन यावर डोळेझाक का करतंय? असा संतप्त सवाल आता येवलेवाडीकर विचारत आहेत. जर प्रशासनाने लवकरात लवकर हे दुकान हटवले नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधीर बनसोडे आणि नागरिकांनी दिला आहे."1