logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एम एन जी एल कंपनीचा ढिसाळ आणि संताप जनक प्रकार MNGL चा ढिसाळ आणि संतापजनक प्रकार… सध्या नाशिक शहर सर्वत्र धूळ, खोदकाम आणि वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहे. शहरातील विविध ठिकाणी स्मार्ट सिटी आणि MNGL ची कामे सुरू असून, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासकामे आवश्यक असली तरी त्यांची गुणवत्ता आणि नियोजनाबाबत महापालिकेने गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. गॅस लाईन टाकण्याच्या कामादरम्यान रस्ते कुठेही आणि कसेही खोदून ठेवले जात आहेत. पाईप रस्त्यावरच टाकलेले असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे आणि अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. काम करताना पाण्याच्या लाईन तुटणे तर नित्याचेच झाले आहे. उदाहरण म्हणून, १६ तारखेला रात्री संभाजी चौकात गॅस लाईनचे काम करताना MNGL च्या कर्मचाऱ्यांनी पाण्याची लाईन तोडली. त्यानंतर पूर्ण दिवस कोणतीही दुरुस्ती न करता १७ तारखेला पुन्हा काम सुरू करण्यात आले आणि संध्याकाळी ५.३० वाजता पाण्याची मुख्य लाईन पुन्हा तोडली गेली. मी १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते, मात्र MNGL चा एकही अधिकारी तिथे नव्हता. अनेक वेळा फोन करूनही “१० मिनिटांत येतो” एवढेच उत्तर मिळाले. दरम्यान, लाखो लिटर पाणी वाया गेले आणि पाणी सिटी सेंटर मॉलपर्यंत पोहोचले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्हॉल्व बंद केल्यामुळे पवननगर आणि गंगापूर रोड परिसराचा पाणीपुरवठा खंडित झाला. नागरिकांचे सतत फोन येत होते. मी जवळपास चार तास घटनास्थळी थांबले, पण तोपर्यंत MNGL चा एकही अधिकारी उपस्थित झाला नाही. त्या दरम्यान दोन स्कूटरस्वार घसरून पडले. शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून काम पूर्ण करून घेतले. अशीच परिस्थिती शहरातील अनेक भागांत दिसून येत आहे. स्मार्ट सिटी, MNGL, MSEB आणि केबल यंत्रणा यांचा महापालिकेशी कोणताही समन्वय दिसत नाही. याबाबत आयुक्तांना पत्र देऊन शहरात खोदकाम करणाऱ्या सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे. सर्व यंत्रणांमध्ये योग्य संवाद आणि समन्वय असणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून नुकताच बनवलेला रस्ता लगेच पुन्हा खोदणे, पाण्याच्या लाईन तोडणे असे प्रकार थांबतील आणि नागरिकांचा मनस्ताप कमी होईल. आयुक्तांनी लवकरात लवकर संबंधित यंत्रणांवर नियंत्रण ठेवून ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.

3 hrs ago
user_Abhijeet KOLHE
Abhijeet KOLHE
Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago
90412479-2270-47b4-adb5-62fa37e5fc3e

एम एन जी एल कंपनीचा ढिसाळ आणि संताप जनक प्रकार MNGL चा ढिसाळ आणि संतापजनक प्रकार… सध्या नाशिक शहर सर्वत्र धूळ, खोदकाम आणि वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहे. शहरातील विविध ठिकाणी स्मार्ट सिटी आणि MNGL ची कामे सुरू असून, त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासकामे आवश्यक असली तरी त्यांची गुणवत्ता आणि नियोजनाबाबत महापालिकेने गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. गॅस लाईन टाकण्याच्या कामादरम्यान रस्ते कुठेही आणि कसेही खोदून ठेवले जात आहेत. पाईप रस्त्यावरच

dff5e2fc-a365-4946-a136-11caf4212ddf

टाकलेले असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे आणि अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. काम करताना पाण्याच्या लाईन तुटणे तर नित्याचेच झाले आहे. उदाहरण म्हणून, १६ तारखेला रात्री संभाजी चौकात गॅस लाईनचे काम करताना MNGL च्या कर्मचाऱ्यांनी पाण्याची लाईन तोडली. त्यानंतर पूर्ण दिवस कोणतीही दुरुस्ती न करता १७ तारखेला पुन्हा काम सुरू करण्यात आले आणि संध्याकाळी ५.३० वाजता पाण्याची मुख्य लाईन पुन्हा तोडली गेली. मी १५ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते, मात्र MNGL चा एकही

49533310-20b9-41fb-9f68-86eae777a806

अधिकारी तिथे नव्हता. अनेक वेळा फोन करूनही “१० मिनिटांत येतो” एवढेच उत्तर मिळाले. दरम्यान, लाखो लिटर पाणी वाया गेले आणि पाणी सिटी सेंटर मॉलपर्यंत पोहोचले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्हॉल्व बंद केल्यामुळे पवननगर आणि गंगापूर रोड परिसराचा पाणीपुरवठा खंडित झाला. नागरिकांचे सतत फोन येत होते. मी जवळपास चार तास घटनास्थळी थांबले, पण तोपर्यंत MNGL चा एकही अधिकारी उपस्थित झाला नाही. त्या दरम्यान दोन स्कूटरस्वार घसरून पडले. शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून काम पूर्ण करून घेतले. अशीच परिस्थिती

203f57be-98ec-4ed8-9e6e-477a57b59e1e

शहरातील अनेक भागांत दिसून येत आहे. स्मार्ट सिटी, MNGL, MSEB आणि केबल यंत्रणा यांचा महापालिकेशी कोणताही समन्वय दिसत नाही. याबाबत आयुक्तांना पत्र देऊन शहरात खोदकाम करणाऱ्या सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक घेऊन योग्य नियोजन करण्याची मागणी केली आहे. सर्व यंत्रणांमध्ये योग्य संवाद आणि समन्वय असणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून नुकताच बनवलेला रस्ता लगेच पुन्हा खोदणे, पाण्याच्या लाईन तोडणे असे प्रकार थांबतील आणि नागरिकांचा मनस्ताप कमी होईल. आयुक्तांनी लवकरात लवकर संबंधित यंत्रणांवर नियंत्रण ठेवून ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • खबर महाराष्ट्र नाशिक से अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे। रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    2
    खबर महाराष्ट्र 
नाशिक से 
अँकर = हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज के जन्मदिन के मौके पर आज नासिक  पंचवटी करंजा में छत्रपति शिवाजी महाराज की घोड़े पर सवार मूर्ति का लोकार्पण हुआ। पूरा इलाका बिजली की रोशनी से जगमगा रहा था, DJ पर संगीत बज रहा था फटाकों की आतिषबाजी चालू ही थी और हज़ारों शिव भक्त मौजूद थे।  रात ठीक 12 बजे मूर्ति का अनावरण किया गया। पूरा नासिक शहर छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े उत्साह और भक्ति के साथ मना रहा है। सभी शिव भक्त आज एक साथ मिलकर जश्न मना रहे हैं
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by VK ONLINE INFORMATION
    10
    Post by VK ONLINE INFORMATION
    user_VK ONLINE INFORMATION
    VK ONLINE INFORMATION
    Graphic designer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड! ​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार.... शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ​निवडणूक प्रक्रिया व घोषणा ​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. ​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा ​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. ​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे ​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू." ​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ ​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    4
    येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड!
​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार....
शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
​निवडणूक प्रक्रिया व घोषणा
​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा
​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे
​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ
​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    1
    मोदीजी समाज को बाटो समाज मे फुट डालो आखिर मोदी जी ऐसा क्यू कह रहे है क्या सच सामने आ रहा है क्या अंदर की बात मन की बात बहार आ रही है कमेंट मे जरूर बताये आपका क्या विचार है इस पर
    user_Sunil Dolas
    Sunil Dolas
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by आबासाहेब साठे
    2
    Post by आबासाहेब साठे
    user_आबासाहेब साठे
    आबासाहेब साठे
    Local Politician Ulhasnagar, Thane•
    11 hrs ago
  • Post by Narendra singh
    1
    Post by Narendra singh
    user_Narendra singh
    Narendra singh
    Gutter Cleaning Service भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Narendra singh
    5
    Post by Narendra singh
    user_Narendra singh
    Narendra singh
    Gutter Cleaning Service भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.