logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड येथे सामाजिक कार्यकर्ते अक्षय कोकाटे यांना नगर परिषद येथील कथित भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल खंडणीची ऑफर व जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, धमकी, दमदाटी आणि आक्रमक हालचालींचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आल्याने बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कोकाटे यांनी २६ मे २०२६ रोजी नगर परिषद बीडचे सहा-लेखापाल गणेश तुळशीराम पगारे यांच्याविरोधात कथित भ्रष्टाचारासंदर्भात लेखी निवेदन देत चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली होती. ही तक्रार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २७ मे रोजी, कोकाटे यांच्या मोबाईलवर "तुला पंधरा लाख पाहिजेत का", "तुला चांगलं हातात देतो", "फोन उचल", "कानात बीड दिसती का तुला" अशा प्रकारचे धमकीजनक संदेश आले. तसेच, सतत फोन करून मानसिक दबाव टाकत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, २७ मे रोजी रात्री अंदाजे ८ वाजण्याच्या सुमारास, नगरसेवक भरत कांबळे यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज लिहित असताना गणेश पगारे व मुन्ना गायकवाड हे तेथे आले. त्यांनी कार्यालयाबाहेर उभे राहून "कुठं आहे तो अक्षय कोकाटे, त्याला बाहेर काढा, दाखवतो त्याला..." अशी दमदाटी करत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. संबंधितांनी आक्रमक पवित्रा घेत थेट जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला असून, हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अक्षय कोकाटे यांनी पोलीस अधीक्षक बीड तसेच पेठ बीड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्याला भ्रष्टाचार प्रकरण उघड केल्यामुळे धमक्या दिल्या जात असल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे, आणि "जर सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांनाच धमक्या मिळत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?" असा सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात खंडणी, धमकी, शिवीगाळ, दबाव टाकणे व जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच अक्षय कोकाटे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

1 hr ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
1 hr ago

बीड येथे सामाजिक कार्यकर्ते अक्षय कोकाटे यांना नगर परिषद येथील कथित भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल खंडणीची ऑफर व जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, धमकी, दमदाटी आणि आक्रमक हालचालींचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आल्याने बीड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कोकाटे यांनी २६ मे २०२६ रोजी नगर परिषद बीडचे सहा-लेखापाल गणेश तुळशीराम पगारे यांच्याविरोधात कथित भ्रष्टाचारासंदर्भात लेखी निवेदन देत चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली होती. ही तक्रार दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २७ मे रोजी, कोकाटे यांच्या मोबाईलवर "तुला पंधरा लाख पाहिजेत का", "तुला चांगलं हातात देतो", "फोन उचल", "कानात बीड दिसती का तुला" अशा प्रकारचे धमकीजनक संदेश आले. तसेच, सतत फोन करून मानसिक दबाव टाकत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, २७ मे रोजी रात्री अंदाजे ८ वाजण्याच्या सुमारास, नगरसेवक भरत कांबळे यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज लिहित असताना गणेश पगारे व मुन्ना गायकवाड हे तेथे आले. त्यांनी कार्यालयाबाहेर उभे राहून "कुठं आहे तो अक्षय कोकाटे, त्याला बाहेर काढा, दाखवतो त्याला..." अशी दमदाटी करत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. संबंधितांनी आक्रमक पवित्रा घेत थेट जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला असून, हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अक्षय कोकाटे यांनी पोलीस अधीक्षक बीड तसेच पेठ बीड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्याला भ्रष्टाचार प्रकरण उघड केल्यामुळे धमक्या दिल्या जात असल्याने शहरात संताप व्यक्त केला जात आहे, आणि "जर सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्यांनाच धमक्या मिळत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?" असा सवालही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात खंडणी, धमकी, शिवीगाळ, दबाव टाकणे व जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच अक्षय कोकाटे यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पाटोदा येथील तहसील कार्यालयात मुस्लिम आणि हिंदू समाजातील बांधवांकडून 'गायीला' राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी करत एक निवेदन सादर करण्यात आले. मुस्लिम धर्मगुरु मौलाना अर्शद मदनी साहेब यांच्या आदेशाने हे निवेदन भारतात प्रत्येक ठिकाणी देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून पाटोद्यातही हे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे शासनाला कळविण्यात आले आहे की, 'गाय' ही हिंदू धर्मासाठी श्रद्धेचे स्थान आहे. या मागणीमुळे दोन समाजांमधील सलोखा टिकून राहील आणि देशातील एकोपा, सुख व समृद्धी अबाधित राहण्यास मदत होईल, असे नमूद करण्यात आले आहे. पाटोदा येथील तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनावेळी पाटोद्यातील सर्व हिंदू, मुस्लिम समाजसेवक, मौलाना आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात सरकारने या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    पाटोदा येथील तहसील कार्यालयात मुस्लिम आणि हिंदू समाजातील बांधवांकडून 'गायीला' राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी करत एक निवेदन सादर करण्यात आले. मुस्लिम धर्मगुरु मौलाना अर्शद मदनी साहेब यांच्या आदेशाने हे निवेदन भारतात प्रत्येक ठिकाणी देण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून पाटोद्यातही हे निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनाद्वारे शासनाला कळविण्यात आले आहे की, 'गाय' ही हिंदू धर्मासाठी श्रद्धेचे स्थान आहे. या मागणीमुळे दोन समाजांमधील सलोखा टिकून राहील आणि देशातील एकोपा, सुख व समृद्धी अबाधित राहण्यास मदत होईल, असे नमूद करण्यात आले आहे. पाटोदा येथील तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनावेळी पाटोद्यातील सर्व हिंदू, मुस्लिम समाजसेवक, मौलाना आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात सरकारने या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • राज्यात डिझेलच्या टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारक त्रस्त असताना, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. डिझेल मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही जेव्हा वाहनधारकांना डिझेल मिळाले नाही, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त करण्याऐवजी चक्क जल्लोष करत आनंद साजरा केला. या घटनेतून कठीण परिस्थितीतही आनंदी राहण्याचा एक वेगळा संदेश दिसून आला, जिथे एकीकडे डिझेलसाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे डिझेल संपल्याचाच आनंद व्यक्त करण्यात आला.
    1
    राज्यात डिझेलच्या टंचाईमुळे शेतकरी आणि वाहनधारक त्रस्त असताना, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे एक अनोखे चित्र पाहायला मिळाले. डिझेल मिळवण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतरही जेव्हा वाहनधारकांना डिझेल मिळाले नाही, तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त करण्याऐवजी चक्क जल्लोष करत आनंद साजरा केला. या घटनेतून कठीण परिस्थितीतही आनंदी राहण्याचा एक वेगळा संदेश दिसून आला, जिथे एकीकडे डिझेलसाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे डिझेल संपल्याचाच आनंद व्यक्त करण्यात आला.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जालना-जिंतूर हायवेवरील कर्नावळ पाटीजवळ आज एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका कारचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या सीएनजी पाइपलाइनच्या पाइपवर वेगाने धडकली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते, ज्यात एक महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. अपघातातील सर्वजण हिंगोली येथील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर, परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा टायर फुटल्यानेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे जालना-जिंतूर हायवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
    1
    जालना-जिंतूर हायवेवरील कर्नावळ पाटीजवळ आज एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या एका कारचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या सीएनजी पाइपलाइनच्या पाइपवर वेगाने धडकली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, या कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते, ज्यात एक महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश होता. अपघातातील सर्वजण हिंगोली येथील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले.

या घटनेनंतर, परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे पाठवण्यात आले आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा टायर फुटल्यानेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातामुळे जालना-जिंतूर हायवेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • एका महत्त्वाच्या घोषणेनुसार, ईद-उल-अज़हाची नमाज़ ईदगाह मैदानावर सकाळी ९:०० वाजता अदा केली जाणार आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी वेळेवर पोहोचून नमाज़मध्ये सहभागी व्हावे. या निमित्ताने सर्वांना ईद मुबारक!
    1
    एका महत्त्वाच्या घोषणेनुसार, ईद-उल-अज़हाची नमाज़ ईदगाह मैदानावर सकाळी ९:०० वाजता अदा केली जाणार आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी वेळेवर पोहोचून नमाज़मध्ये सहभागी व्हावे. या निमित्ताने सर्वांना ईद मुबारक!
    user_उदगीर टुडे न्यूज़
    उदगीर टुडे न्यूज़
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आजाद समाज पार्टीने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर आंदोलन केले. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांचा मोर्चा रस्त्यातच अडवला आणि त्यांना ताब्यात घेतले.
    1
    आजाद समाज पार्टीने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर आंदोलन केले. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांचा मोर्चा रस्त्यातच अडवला आणि त्यांना ताब्यात घेतले.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोळक्याने फिरणारी माकडे शेतात घुसून उभी पिके फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय, ही माकडे गावातील घरांमध्ये शिरून अन्नधान्य आणि इतर वस्तूंचेही नुकसान करत आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष घालून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
    2
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील दादेगाव हजारे परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोळक्याने फिरणारी माकडे शेतात घुसून उभी पिके फस्त करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय, ही माकडे गावातील घरांमध्ये शिरून अन्नधान्य आणि इतर वस्तूंचेही नुकसान करत आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष घालून माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, पेठ बीड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला पेठ बीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शांतता समितीच्या संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते, तसेच मुस्लिम समाज बांधवांनीही हजेरी लावली. पोलीस प्रशासनाने या बैठकीत सर्व उपस्थितांना बकरी ईदचा सण शांततापूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
    1
    बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, पेठ बीड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला पेठ बीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शांतता समितीच्या संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते, तसेच मुस्लिम समाज बांधवांनीही हजेरी लावली. पोलीस प्रशासनाने या बैठकीत सर्व उपस्थितांना बकरी ईदचा सण शांततापूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे प्रकाश जाधव यांनी स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर एका आढावा बैठकीचे आयोजन केले.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे प्रकाश जाधव यांनी स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर एका आढावा बैठकीचे आयोजन केले.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर शहरात शटर उचकटून दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी चोरी करून मिळालेली रक्कम जुगाराच्या डावावर उधळत होते. पोलिसांनी निसार अहेमद गफार पठाण ऊर्फ सलमान दुल्हन आणि गणेश शामराव सदावर्ते या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून सिटी चौक, सिडको आणि जिन्सी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी ३ लाख ७१ हजार ९२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेकडून आरोपींकडे आणखी काही गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर शहरात शटर उचकटून दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी चोरी करून मिळालेली रक्कम जुगाराच्या डावावर उधळत होते.

पोलिसांनी निसार अहेमद गफार पठाण ऊर्फ सलमान दुल्हन आणि गणेश शामराव सदावर्ते या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून सिटी चौक, सिडको आणि जिन्सी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण सात गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी ३ लाख ७१ हजार ९२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेकडून आरोपींकडे आणखी काही गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.