प्रविण मगर मित्र परिवाराच्या वतीने १५१ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग्सचे वाटप; महानगरपालिका शाळा क्र. १६ येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. प्रविण मगर मित्र परिवाराच्या वतीने १५१ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग्सचे वाटप; महानगरपालिका शाळा क्र. १६ येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. लातूर प्रतिनिधी, (शनि 1 ऑगष्ट 2026. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लातूर येथील महानगरपालिका शाळा क्रमांक १६ मध्ये लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने 'प्रविणजी मगर मित्र परिवारा' च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना १५१ मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा प्रसंगी मनपा. लातूरचे माजी नगरसेवक श्री. सुनील बसपुरे आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. अशोक देडे यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाला निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉ. सौ. सुनिता संतोष वाघमारे आणि लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. संतोष वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सामाजिक उपक्रमांतून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमात प्रविण मगर व त्यांच्या मित्र परिवाराच्या शुभहस्ते गरजू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना शालेय बॅग्स प्रदान करण्यात आल्या. शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत शैक्षणिक मदतीचा हा उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थितांनी प्रविण मगर मित्र परिवाराचे विशेष कौतुक केले. या सोहळ्याला प्रविण मगर मित्र परिवारातील गोविंद मगर, अनिल वेरेकर, गोविंद शिंदे, बंटी कांबळे, संतोष घोडके, स्वप्निल मगर, जितेन क्षीरसागर, गणेश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शंकर बंकट धायगुडे, सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा व्यंकट कदम, सहशिक्षिका श्रीमती उषा राम रेड्डी आणि श्रीमती महानंदा सुरेश मगर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रविण मगर मित्र परिवाराच्या वतीने १५१ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग्सचे वाटप; महानगरपालिका शाळा क्र. १६ येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. प्रविण मगर मित्र परिवाराच्या वतीने १५१ विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग्सचे वाटप; महानगरपालिका शाळा क्र. १६ येथे लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. लातूर प्रतिनिधी, (शनि 1 ऑगष्ट 2026. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लातूर येथील महानगरपालिका शाळा क्रमांक १६ मध्ये लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६
व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने 'प्रविणजी मगर मित्र परिवारा' च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना १५१ मोफत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाचा प्रसंगी मनपा. लातूरचे माजी नगरसेवक श्री. सुनील बसपुरे आणि ज्येष्ठ पत्रकार श्री. अशोक देडे यांच्या शुभहस्ते पार पडला. या कार्यक्रमाला निलंगा पंचायत समितीच्या सभापती डॉ. सौ. सुनिता संतोष वाघमारे आणि लातूर जिल्हा
परिषदेचे माजी सदस्य श्री. संतोष वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सामाजिक उपक्रमांतून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमात प्रविण मगर व त्यांच्या मित्र परिवाराच्या शुभहस्ते गरजू आणि अभ्यासू विद्यार्थ्यांना शालेय बॅग्स प्रदान करण्यात आल्या. शैक्षणिक साहित्याचे वाटप झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत शैक्षणिक मदतीचा हा उपक्रम राबवल्याबद्दल उपस्थितांनी प्रविण मगर मित्र परिवाराचे विशेष कौतुक केले. या
सोहळ्याला प्रविण मगर मित्र परिवारातील गोविंद मगर, अनिल वेरेकर, गोविंद शिंदे, बंटी कांबळे, संतोष घोडके, स्वप्निल मगर, जितेन क्षीरसागर, गणेश कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शंकर बंकट धायगुडे, सहशिक्षिका श्रीमती प्रतिभा व्यंकट कदम, सहशिक्षिका श्रीमती उषा राम रेड्डी आणि श्रीमती महानंदा सुरेश मगर यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- ऑल इंडिया तन्जीम-ए-इन्साफचे 'घंटा वाजवा' आंदोलन संपन्न मुखेड- जन्म-मृत्यूच्या प्रमाण पत्राअभावी महिला, वयोवृद्ध व्यक्ती तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना शैक्षणिक व शासकिय कामांमध्ये अडथळा येत असल्यामुळे जन्म-मृत्यूच्या प्रमाणपत्राची अत्यंत आवश्यकता असून सदर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज मुखेड तहसिलच्या विरोधमध्ये शुक्रवार दि.३१ जुलै २०२६ रोजी ऑल इंडिया तन्जीम-ए-इंसाफचे तालुकाध्यक्ष हसनोद्दीन शेख उर्फ बबलू मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर हलगीच्या तालावर घंटा वाजवून आंदोलन करण्यात आले असून तहसिल कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्विकारून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रीय आपसंख्यांक परिषदेचे महेताब शेख, शेतकरी कामगार पक्षाचे भाई असद बल्खी, ग्राहक पंचायतचे जयभीम सोनकांबळे, पत्रकार संजय कांबळे व तसेच युवा कार्यकर्ते, शोहेब सय्यद, जिलानी शेख, इसाक मनियार, गौसपठाण, खदीर शेख यांच्यासह जन्म-मृत्यू प्रमाण पत्राबाबत आदेशाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.2
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. चाकूर येथील माय मंगल कार्यालय समोरील रोडवरील खड्ड्यात पिकपचा भीषण अपघात, 4 ते 5 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026. लातूरहून चाकूरकडे येणारी विद्युत वाहन जर्मनची तार वाहतूक करणारी पिकअप आज शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी तालुका चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्याचा अंदाज पडलेल्या पावसामुळे न कळल्याने या रोडवरील खड्ड्यात वाहनाने जोरदार धक्का घेतल्याने ही पिकप गाडी जोराने पलटी झाली. या अपघाताच्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या भीषण अपघातातील जखमींना मदत व उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याचे काम सुरू आहे. शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख नागेश कोंबडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.1