न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे विद्यार्थिनी करिता आरोग्य शिबिराचे आयोजन *"न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे विद्यार्थिनी करिता आरोग्य शिबिराचे आयोजन हिंगोली,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा संचालित न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी विद्यार्थिनींनी आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, त्वचेची निगा, योग्य आहार तसेच महिलांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रणीता झडपे मॅडम व डॉ. शीतल धुमाळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, त्वचेची योग्य निगा कशी राखावी, योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी आरोग्य व त्वचेच्या निगेशी संबंधित विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एन.एस.सोळंके सर होते. अध्यक्षीय समारोप करताना मा.प्राचार्य डॉ.एन.एस.सोळंके सर आपले मत वक्त करताना म्हणाले अशा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनीमध्ये जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. या कार्यक्रमाच्या संयोजिका म्हणून डॉ.लक्ष्मी गलांडे होत्या.सूत्रसंचालन प्रा.शिर्के एस.पी,तर आभार प्रदर्शन प्रा. किरवले यु.डी., प्रा.करंडे ए.ए.,प्रा.तापडिया व्हि.जे., डॉ.काशिदे वाय.एम., डॉ.कदम ए.एम., प्रा.चव्हाण बी.बी., प्रा.काशिदे एस.एस., डॉ.पुरी के.एल.,प्रा.शेख जुनेद, डॉ.खंदारे एस. वाय.,प्रा.गोरे जी.यु., डॉ.वासनिक पी.एस.,प्रा.सातपूते आर. ए., डॉ.कोल्हे आर. डी., प्रा.चव्हाण एस.ए., डॉ.पाटील एस.जी.,प्रा.अवचार ए.ए. डॉ.मापारी एस.के.,प्रा.खर्जुले एस.ए.,प्रा.लेमले , विद्यार्थ्यी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे विद्यार्थिनी करिता आरोग्य शिबिराचे आयोजन *"न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे विद्यार्थिनी करिता आरोग्य शिबिराचे आयोजन हिंगोली,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारा संचालित न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथे महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी विद्यार्थिनींनी आरोग्याची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, त्वचेची निगा, योग्य आहार तसेच महिलांच्या विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. प्रणीता झडपे मॅडम व डॉ. शीतल धुमाळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, त्वचेची योग्य निगा कशी राखावी, योग्य व संतुलित आहाराचे महत्त्व तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. विद्यार्थिनींनी आरोग्य व त्वचेच्या निगेशी संबंधित विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एन.एस.सोळंके सर होते. अध्यक्षीय समारोप करताना मा.प्राचार्य डॉ.एन.एस.सोळंके सर आपले मत वक्त करताना म्हणाले अशा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनीमध्ये जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल. या कार्यक्रमाच्या संयोजिका म्हणून डॉ.लक्ष्मी गलांडे होत्या.सूत्रसंचालन प्रा.शिर्के एस.पी,तर आभार प्रदर्शन प्रा. किरवले यु.डी., प्रा.करंडे ए.ए.,प्रा.तापडिया व्हि.जे., डॉ.काशिदे वाय.एम., डॉ.कदम ए.एम., प्रा.चव्हाण बी.बी., प्रा.काशिदे एस.एस., डॉ.पुरी के.एल.,प्रा.शेख जुनेद, डॉ.खंदारे एस. वाय.,प्रा.गोरे जी.यु., डॉ.वासनिक पी.एस.,प्रा.सातपूते आर. ए., डॉ.कोल्हे आर. डी., प्रा.चव्हाण एस.ए., डॉ.पाटील एस.जी.,प्रा.अवचार ए.ए. डॉ.मापारी एस.के.,प्रा.खर्जुले एस.ए.,प्रा.लेमले , विद्यार्थ्यी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .1
- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” 🚨 खापरखेडा येथे शेतकऱ्यांचा ठाम विरोध! शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी मोजणी करून दिली नाही. ✊🌾 “आपली जमीन, आपला हक्क!” शेतकरी एकजूट — संघर्ष मजबूत! 💪 #खापरखेडा #हिंगोली #शेतकरी #शक्तिपीठमहामार्ग #भूमीअधिग्रहण #RMNewsमराठी1
- शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड1
- ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही! या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर #रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस1
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1