Shuru
Apke Nagar Ki App…
खुलताबाद तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; नदी-नाले तुडुंब, गिरिजा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक खुलताबाद तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हैसमाळ परिसरात सर्वत्र पाणी साचून परिसर जलमय झाला असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गिरिजा नदीमध्ये पाणी येत असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे निसर्गरम्य दृश्ये खुलली असली तरी नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
Marathi News Point
खुलताबाद तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग; नदी-नाले तुडुंब, गिरिजा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक खुलताबाद तालुक्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. म्हैसमाळ परिसरात सर्वत्र पाणी साचून परिसर जलमय झाला असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गिरिजा नदीमध्ये पाणी येत असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे निसर्गरम्य दृश्ये खुलली असली तरी नागरिकांनी अनावश्यकपणे पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. छत्रपती संभाजीनगरात भेसळीच्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई; ३.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त, डेअरीचे परवाना निलंबित. Anc : छत्रपती संभाजीनगर शहरात Safe Food, Safe Maharashtra मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. एमआयडीसी चिकलठाणा येथील अमोल दूध डेअरीवर छापा टाकून तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपयांचे तूप, पनीर, क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले. तपासादरम्यान नॉन-फूड ग्रेड बॅरलमधील सोयाबीन तेलाचा वापर अॅनालॉग पनीर आणि गाईचे तूप तयार करण्यासाठी होत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. कारवाईत २९९ किलो तूप, १९९ किलो क्रीम, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल, असा एकूण ९५० किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित डेअरी शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि श्रीराम चौक (दर्गा रोड) येथील तीन किरकोळ विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा करत असल्याचेही उघड झाले. यानंतर लक्ष्मी डेअरीच्या तीन दुकानांवरही कारवाई करत ४१ किलो गाईचे तूप जप्त करण्यात आले असून त्याचे अन्न नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, अमोल दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन युनिट बंद करण्यात आले आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे, सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.4
- जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त रक जय भोले मित्र मंडळाच्या 21व्या अमरनाथ यात्रेनिमित्त1
- जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले1
- भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही भक्तेश्वर नगर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व मं473 474 येथील रहिवाशी यांनी वाटेवार निवेदन देवून ही महापालिका आयुक्त व महापौर तलेन्च कलेक्टर यसा निवेदन देवून ही वस्तीतील कामे मात्र आश्वासनावर काल झालेल्या पावसामुळे अत्यत वाईट अ ईट अशी अवस्था येथील रहिवाशाची झाली असुन नागरिक त्रसा आहे. म्हणून यावेळेस नागरिकाना प्रश्न पडला आहे कि आमच्या समस्या कोळा सोडू शकतो2
- 15 ऑगस्टपूर्वी मुस्लिम बांधवांना हर्षवर्धन जाधव यांचे महत्त्वाचे आवाहन कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्यांच्या या संदेशाची राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू असून, नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.1
- जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 35 ते 40 वर्षे जीर्ण इमारतीला पावसामुळे धोका; दुर्घटना घडण्यापूर्वी मनपाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आज दिनांक 31 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जुना जालना भागातील माळीपुरा परिसरात असलेल्या एकता भवनच्या जीर्ण इमारतीचे छताचे प्लास्टर सततच्या पावसामुळे वेळोवेळी कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इमारतीच्या पाठीमागील भागात तसेच आजूबाजूच्या परिसरात नागरिकांची वस्ती असल्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.1
- भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू भिवंडी येथील गंगाराम वाडी येथील चार मजली इमारत कोसळून आठ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू तसेच अनेक जण जखमी असल्याची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..1