logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली असून, शनिवारी (ता. ३०) मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मॉन्सूनने लक्षद्वीप परिसर, कोमोरिन क्षेत्र (कन्याकुमारीजवळील समुद्र भाग), अरबी समुद्राचा नैऋत्य व आग्नेय भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, मध्य आणि ईशान्य भागांपर्यंत मजल मारली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मॉन्सून अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, लक्षद्वीप बेटांमध्ये, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांत तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य, मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य भागातील आणखी काही क्षेत्रांपर्यंत पुढे सरकण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात विविध भागांत सध्या उन्हाच्या चटक्यासह उकाडा कायम असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः आज चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी गारपीटीसह वादळी पावसाचा अंदाज आहे. याशिवाय, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित भागात कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहील. मध्य महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्रात कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

8 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
8 hrs ago
6dde068a-1e81-4880-b3db-6565a2ccb06b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    2
    या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    user_Ashraf Ahmed
    Ashraf Ahmed
    Contractor उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    1
    उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • मुंब्रा-कौसाच्या विकासासंदर्भात अशरफ शानू पठान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान, ठाणे, मुंब्रा आणि कौसा शहरांसाठी ५० MLD अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, विविध विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली.
    1
    मुंब्रा-कौसाच्या विकासासंदर्भात अशरफ शानू पठान यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान, ठाणे, मुंब्रा आणि कौसा शहरांसाठी ५० MLD अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, विविध विकासकामांवरही सविस्तर चर्चा झाली.
    user_PRESS MBN NEWS
    PRESS MBN NEWS
    Media Consultant ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 min ago
  • ठाणे महानगरपालिकेचे (ठा.म.पा) विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मुंब्रा शहरासाठी 50 MLD पाणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (DCM) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
    1
    ठाणे महानगरपालिकेचे (ठा.म.पा) विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मुंब्रा शहरासाठी 50 MLD पाणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (DCM) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    1
    सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    1
    ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    1
    सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.