१४ व १५ मार्च रोजी नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन व साहित्यिक मेळाव्याची मेजवानी! नांदेड दि.१३ मार्च:-: ग्रंथसंस्कृतीचा वारसा जपणे आणि वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यावतीने १४ व १५ मार्च २०२६ रोजी दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री, साहित्यिक मेळावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मार्च रोजी सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. या वेळी उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, तहसीलदार विकास बिरादार, राजकुमार माने तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत राहणार असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने “महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम व सार्वजनिक ग्रंथालयांसमोरील आव्हाने” तसेच “छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वराज्य संकल्पना” या विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी “अभिजात मराठी भाषा व साहित्य” तसेच “स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने” या विषयांवर परिसंवाद होणार आहे. यामध्ये प्राचार्य डॉ. मा. मा. जाधव (बहिर्जी महाविद्यालय, बसमत), प्रा. संजय जगताप, डॉ. विलास वैद्य, महेश मोरे, नारायण शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, प्रा. शामल पत्की (सचिव, नांदेड एज्युकेशन सोसायटी) तसेच विजय सुवर्णकार (राजपत्रित अधिकारी) मार्गदर्शन करणार आहेत. ग्रंथोत्सवाचा समारोप डॉ. अच्युत बन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून संभाजीराव धुळगंडे, अर्जुन झाडे (जिल्हा नियोजन अधिकारी), विक्रम देशमुख (कोषागार अधिकारी), दिलीप बनसोडे (शिक्षणाधिकारी), दत्ता डांगे (इसाप प्रकाशन, नांदेड) व निर्मलकुमार सूर्यवंशी (निर्मल प्रकाशन, नांदेड) उपस्थित राहणार आहेत. गुरु गोविंदसिंग स्टेडियम परिसरातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड येथे होणाऱ्या या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, वाचक व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी व नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

- Post by Today One Live1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- वसंतराव नाईक पुतळ्यासमोर एका पोलला भीषण आग यात MSEDCL साफ दुर्लक्ष1
- मुखेड लातूर महा मार्गावर जांब येथे पोलीसाचे वॅन गेहून होमगार्डची दादा गिरी वाहतूक करणाऱ्या MH26CH0778 मॅक्स पिकप गाडी चालकाकडून दादागिरीने एन्ट्री 1000रु मागणी केली आहे महाराष्ट्र पोलीस जांब वॅन नंबर MH26R0523 ह्या क्रमांकाची वॅन गेहून जांब पोलीच व होमगार्ड यांची दादागिरी व दरोडेखोर पण चालक जास्त काही बोलल्यावर पोलिसटेशन गाडी गेहून चल म्हणून API यांना कॉल करून चालकणा धमकी गाडी सोडत नाही वीणा परवाना मॉल वाहतूक केले म्हणून मार हान1
- मुखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी संघटन सृजन अभियानास सुरुवात... काँग्रेस पक्षाच्या वतीने संघटन सृजण अभियानाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले असून त्याचाच एक भाग म्हणून मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघात या अभियानाची सुरुवात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ निरीक्षक ना.हरकरा वेणूगोपालजी,नेते,सुरज तिवारी,प्रदेश काँग्रेसचे केदार पाटील साळुंखे,महासचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,एकनाथजी मोरे,जिल्हा उपाध्यक्ष राजनजी देशपांडे,महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्ष उज्वलाताई पत्रे,युवा नेते अभिजीत पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ना.वेणुगोपालजी बोलताना म्हणाले नांदेड जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रभर ओळखल्या जात होता,काँग्रेस पक्षात असताना ज्यांना केंद्रात व राज्यात पक्षाने मंत्रीपदे दिल्यावरही स्वतःच्या स्वार्थासाठी इतर पक्षात प्रवेश केला.परंतु काँग्रेस पक्ष व्यापक विचाराचा पक्ष असून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जे पक्ष सोडून गेले ते जाऊ द्या आपण सर्वजण राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पाहण्यासाठी जनसामान्याच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ताकद याच संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून मोठी करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर आहे असे सांगितले. नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार बेटमोगरेकर म्हणाले वेणूगोपाल सर हीच समोर बसलेली जनता होती म्हणून मी मागच्या काळात आमदार झालो,लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली,कोण कुठे जातो यापेक्षा आपण याच पक्षात निष्ठेने राहून काँग्रेस पक्ष मोठा करण्यासाठी मोठ्या जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे पक्ष निरीक्षकासह आजी माजी लोकप्रतिनिधी,पदाधिकारी कार्यकर्त्यासमोर अभिवचन दिले. मात्तबर नेते अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यावर बेटमोगरेकर व नायगावकर घराण्याने या जिल्ह्यातील काँग्रेस टिकून ठेवण्यासाठी व दोन वेळेस काँग्रेसचा खासदार निवडून आणण्यासाठी खुप प्रयत्नांची पराकाष्ठा केली,याच हणमंतरावांनी अथक परिश्रम घेतले असून येणाऱ्या काळात या भागाचे नेतृत्व जिवंत ठेवायचे असेल,काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्याचे असेल तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनाच जिल्हाध्यक्षपदी पुन्हा विराजमान होण्याची संधी दयावी असे मुखेड मायनॉरिटीचे अध्यक्ष शौकतखाँ पठाण यांनी आपल्या भावुक शब्दातून व्यक्त झाले. काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडी संदर्भात पक्ष निरीक्षकांनी चाचपणी करण्यासाठी मुखेड येथे आलेले असून जिल्हाध्यक्ष कोणाला करायचे याबाबत प्रत्येक पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मुलाखत घेण्यात आली,या मुलाखतीबाबत पक्षनिरीक्षकांनी अत्यंत गोपनीयता बाळगलेली असून मुलाखतीत आलेल्या नावासंदर्भात कुणाच्याही नावाची वाच्यता न करता वरिष्ठांकडे शिफारस करण्यात येईल सदरची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून लोकातून आलेल्या व्यक्तीच्या नावालाच जिल्ह्याचे अध्यक्षपद दिले जाईल असे पक्ष निरीक्षक वेणूगोपालजींनी आपल्या भाषणातून पक्षाची भूमिका विषद केली. मुखेड येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षनिरीक्षक ना. वेणूगोपालजी यांचा सत्कार शहर काँग्रेसच्या वतीने हणमंत नारनाळीकर यांनी केला.तर प्रमुख मान्यवरांचा सत्कार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला.या संघटन सृजण अभियानासाठी शहरातून व ग्रामीण भागातून पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.*या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हणमंत नारनाळीकर यांनी केले प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष संभाजी पाटील उन्द्रीकर तर आभार जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आकाशपाटील ऊंद्रीकर यांनी मानले.* या कार्यक्रमास खरेदी विक्री संघाचे माधवराव पाटील वडजे उंद्रीकर,अच्युत पाटील बिल्लाळीकर,पांडुरंग भिकनर सकनुरकर,रमेश तेलंग,मैनुसाब येवतीकर,पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत पाटील येवतीकर,शादुल पाटील रावणगावकर बालाजी देशमुख भाटापूरकर,गोविंदराव पाटील सुगावकर,गंगाधर गंडमळे मांजरी,अजित वडजे कबनूरकर महादेव सोनकांबळे,माधव हुरजळ शिकारेकर,बेगबाबु धामणगावकर,बाबू पाटील पोले पैसमाळकर,माधव कदम बिल्लाळीकर,प्रवीण मंगसुळी नागराळ,दत्तात्रय पंताडे सुगाव,विठ्ठल बाजगीरे कुंदराळा,विलास पाटील ईमडे शिकारा,सयाजी गजेले चिवळी,बालाजी ठावरे,शिरूर चंद्रकांत जारीकोटे मंग्याळ,मुरलीधर देशमुख कबनूर,लक्ष्मण पाटील बेळीकर,सुरेश नवले,बेटमोगरा,बालाजी बोडके धनज,प्रकाश पाटील लिंगापूर,मारुती टेकाळे खतगाव,सय्यद मुजीप जांब,मारुती पाटील,अविनाश इंगळे पाटील बिल्लाळी,इरफान मोमीन सावरगावकर, माधव गवळे कर्णा,ब्रह्मानंद बोडके धनज,बालाजी बोडके धनज,संजय नुक्कुलवार उच्चा,व्यंकटेश कुणके पाटील जांभळी,जिल्हा काँग्रेसचे सहसचिव विश्वंभर पाटील मसलगेकर,भानुदास पाटील बेटमोगरा,उपसरपंच सचिन गुद्दे, धनराज पाटील बेटमोगरेकर,मंगेश पाटील येल्लुरकर,सरपंच नयुम दफेदार,सोशल मिडीया काँग्रेस अध्यक्ष तिपणे,शेख रफिक बामणीकर,वृत्तपत्र छायाचित्रकार हाफीजभाई पठाण सह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नारनाळीकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील बेळीकर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष एम.आर.गोपणर,युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील आरगीळे,जिल्हा सेवा दलाचे उपाध्यक्ष विद्याधर साखरे,काँग्रेस उपाध्यक्ष बालाजी वाडेकर,उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष केतन मामडे यांनी परिश्रम घेतले.3
- Post by Mohsin ahmed khan1
- महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य व्याख्यान व भिम गीतांचा कार्यक्रम आयोजन बाबाळासाहेब लाखे यांनी केले आहे दि.१६ एप्रिल २०२६ रोजी गुरुवार सायं. ०६:३० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे1
- Post by Today One Live1