स्थायी समितीच्या सभेत विविध महत्त्वाच्या विषयांना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची मंजुरी पिंपरी, दिनांक १६ सप्टेंबर २०२६: मा. स्थायी समितीची साप्ताहिक सभेत शहराच्या विकासाशी निगडित तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रस्तावांवर चर्चा करून स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी मंजुरी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य तसेच पालिकेतील विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्थायी समिती बैठकीत पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग भवन, बस डेपो व चार्जिंग स्टेशन, महिला वसतिगृह, स्वच्छता, रस्ते, शाळा, पशुवैद्यकीय सेवा तसेच विविध नागरी सुविधांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पाणीपुरवठा विभागांतर्गत नवी सांगवी परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. तसेच जलनिःसारण विभागांतर्गत जलनिःसारण नलिकांची आधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. मोरवाडी येथील सुमारे २४ हजार चौ. फूट क्षेत्रफळाच्या दिव्यांग भवनात विविध प्रकारच्या दिव्यांग नागरिकांसाठी थेरपी, समुपदेशन, फिजिओथेरपी, हायड्रोथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, कौशल्य व व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र, ऑडिटोरियम आणि लायब्ररी यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या दिव्यांग भवनाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी संचालक मंडळाच्या रचनेबाबतच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली. मौजे वाकड येथील पीएमपीएमएल बस डेपो आणि कार्यालयाची इमारत विकसित करणे तसेच बसेससाठी चार्जिंग स्टेशन प्रणाली उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या उच्चदाब भूमिगत विद्युत वाहिनी आणि वीजपुरवठ्याशी संबंधित कामांना मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. २५, वाकड येथे कार्यरत महिलांसाठी वसतिगृह बांधण्याच्या कामांतर्गत चालू आर्थिक वर्षातील जमा व खर्च लेखाशीर्षामध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. स्वच्छ महाराष्ट्र भारत अभियानांतर्गत क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महिला बचत गटाच्या माध्यमातून शून्य कचरा (Zero Waste) प्रकल्प राबविण्यास मुदतवाढ व मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ११ मधील मनपाच्या विविध कार्यक्रमांसाठी मंडप व्यवस्था करणे, तसेच प्रभाग क्र. २२, काळेवाडी आणि प्रभाग क्र. १८, चिंचवड येथील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील करारांना मंजुरी देण्यात आली. शिक्षण मंडळ विभागामार्फत प्राथमिक शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची वार्षिक तत्त्वावर देखभाल व दुरुस्ती करण्याच्या कामास मान्यता देण्यात आली. महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना मोफत बस पास देणे, तसेच ६० वर्षांवरील अंध व्यक्तींच्या सोबतीदारांना बस प्रवासाचा पास देण्याच्या योजनेअंतर्गत झालेल्या प्रत्यक्ष खर्चास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ०३, चऱ्होली येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी नवीन वीजमीटर घेण्यास आणि वीजपुरवठा कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या विविध पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये, ॲम्ब्युलन्सवर, डॉग व्हॅन आणि डॉग पार्क इत्यादी ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी एजन्सीची निवड करून कामाचे आदेश देण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांचे दैनंदिन कामकाज तसेच आगामी सार्वत्रिक निवडणूक कामकाजासाठी मतदार याद्या व इतर कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढण्याच्या कामाचा दरकरार निश्चित करून त्यास मान्यता देण्यात आली. महापालिकेतील सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी व पेन्शनविषयक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी अनुभवी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची मानधनावर पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी प्राप्त अनुदानातून शाळांमध्ये प्रयोगशाळा व वाचनालय विकसित करणे, जिम उपकरणे बसविणे आणि रुग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे यांसारख्या भांडवली कामांचा समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मोहिमेचा भाग म्हणून शहरातील विविध प्रभागांमध्ये नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी संदेश, घोषवाक्ये आणि बोलकी चित्रे रंगविण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली. प्रतिक्रिया... “पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि वेळेत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्रमुख जबाबदारी आहे. आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणीपुरवठा, जलनिःसारण, दिव्यांग कल्याण, सार्वजनिक वाहतूक, महिला सुविधा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी होऊन त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अशाच प्रकारे सकारात्मक आणि लोकाभिमुख निर्णय घेण्यास स्थायी समिती कटिबद्ध आहे. - अभिषेक बारणे, सभापती - स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

- फोनवर बुकिंग, लॉजवर महिलांचा पुरवठा; येरवड्यात अनैतिक मानवी व्यापारावर पोलिसांचा मोठा घाव1
- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर मराठा आंदोलकांनी केली घोषणाबाजी.! पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी1
- बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! “पुण्यातील बावधनमध्ये स्कूल बसचालकाच्या वयावरून प्रश्न उपस्थित झाले आहेत. चालकाचे वय १८ वर्षे असल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकाचे वय, वैध परवाना आणि आवश्यक नियमांचे पालन झाले आहे का, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.”1
- "हे नाकर्त्यांचं आंदोलन.. ज्यांनी आपल्या जीवनात काहीच केलेले नाही..!"1
- गोल्डन कार’चा रुबाब पडला महागात; पोलिसांची कारवाई.....! पिंपरी-चिंचवड : गोल्डमॅनच्या ‘गोल्डन कार’वर पोलिसांची कारवाई..! हिंजवडी वाहतूक पोलिसांकडून वाहन नियमभंगाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. याच कारवाईदरम्यान एका गोल्डमॅनची गोल्डन कार पोलिसांच्या नजरेस पडली.कारच्या काचांवर काळी फिल्म आणि HSRP नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबर प्लेट आढळून आली. पोलिसांनी तात्काळ काळी फिल्म हटवली आणि नियमभंगाप्रकरणी कारवाई केली.नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा कडक बडगा कायम आहे... #PimpriChinchwad #Hinjewadi #TrafficPolice #PoliceAction #GoldenCar #Goldman #CarAction #BlackFilm #FancyNumberPlate #HSRP #TrafficRules #VehicleRules #PimpriChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #TheNayakNews1
- भोरच्या राजा रघुनाथराव विदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 17 भोर येथील राजा रघुनाथराव विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात गणपती उत्सवानिमित्याने सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी सहभाग घेत विविध कार्यक्रम सादर करत वाहवा मिळवली.1
- ब्रेकिंग न्यूज़ | मुरुड जंजिरा, रायगड रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। ब्रेकिंग न्यूज़ | रायगड जिले के मुरुड जंजिरा शहर के सिद्धि मोहल्ले में स्मार्ट मीटर लगाने को लेकर विवाद सामने आया है। स्थानीय नागरिकों का आरोप है कि बिना किसी पूर्व सूचना या नोटिस के उनके घरों पर स्मार्ट मीटर लगाए जा रहे थे। इतना ही नहीं, नागरिकों का कहना है कि उनकी आपत्ति के बावजूद जबरदस्ती स्मार्ट मीटर लगाने का प्रयास किया जा रहा था। इस पूरे मामले में स्थानीय नागरिक ताबीश ढाकम ने भी लोगों का साथ देते हुए उनकी आपत्तियों और समस्याओं को सामने रखने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। स्थानीय लोगों के अनुसार, ताबीश ढाकम ने नागरिकों की बात संबंधित कर्मचारियों और प्रशासन तक पहुंचाने का प्रयास किया और बिना उचित जानकारी के मीटर लगाए जाने पर सवाल उठाए। इस घटना को लेकर स्थानीय लोगों में नाराजगी देखी जा रही है। नागरिकों का सवाल है कि आखिर बिना सूचना दिए मीटर क्यों लगाए जा रहे हैं? अगर किसी नागरिक को आपत्ति है, तो उसकी बात क्यों नहीं सुनी जा रही है? स्थानीय लोगों ने संबंधित बिजली विभाग और प्रशासन से पूरे मामले की जांच करने, नागरिकों को स्मार्ट मीटर की पूरी जानकारी देने और उनकी शिकायतों का समाधान करने की मांग की है। अब सवाल यह है कि क्या स्मार्ट मीटर लगाने से पहले नागरिकों को उचित सूचना दी गई थी या नहीं? इस मामले में बिजली विभाग का आधिकारिक पक्ष सामने आना भी जरूरी है। राहील शाह की रिपोर्ट मुरुड जंजिरा से1
- अधिकाऱ्यांची दिवाळी आधीच? PMC मध्ये १० हजारांचे २२ गिफ्ट बॉक्स जप्त, चौकशी सुरू!1