logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

दिल्लीत महिला साहित्य संमेलन; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल नांदेड, दि. 30 : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे दि. 11 व 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात नांदेड जिल्ह्याच्या डॉ. शारदा चोंडेकर यांनी आपल्या काव्यप्रतिभेने ठसा उमटवला. महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या या संमेलनात विविध राज्यांतील महिला अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. ‘जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा’ या ब्रीदाखाली झालेल्या या उपक्रमात साहित्य आणि प्रशासन यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. किनवट सारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शारदा चोंडेकर या संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या. बहिणाबाई चौधरी सभागृहात त्यांनी सादर केलेल्या काव्यमय अभिव्यक्तीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या साहित्यकृतीतून उमटलेले संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले विचार विशेष लक्षवेधी ठरले. त्यांच्या सहभागामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर ठळकपणे अधोरेखित झाले. या संमेलनात देशभरातील महिला शासकीय अधिकारी सहभागी झाल्या होत्या. प्रशासनात कार्यरत असलेल्या महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सरहद संस्था व नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त सचिव श्रीमती आर विमला यांनी केले होते. ग्रंथदिंडी, चर्चासत्रे, प्रकट मुलाखती आणि कविसंमेलने अशा विविध उपक्रमांद्वारे उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सरहद, पुणे’ आणि सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या पुढाकारात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्त्री-अधिकाऱ्यांच्या साहित्य निर्मितीतून प्रशासन अधिक संवेदनशील, सृजनशील आणि लोककल्याणकारी होऊ शकते, हा विचार केंद्रस्थानी होता. सरकारी कामाच्या धकाधकीतही सर्जनशीलता जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरले. ग्रंथदिंडीपासून कविसंमेलनांपर्यंत विविध कार्यक्रमांनी या साहित्यिक मेळाव्याला वेगळी उंची दिली. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने मराठी वाङ्मय इतिहासात त्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. *नांदेडचे प्रतिनिधित्व ठरले लक्षवेधी* डॉ. शारदा चोंडेकर यांच्या प्रभावी काव्यसादरीकरणामुळे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विशेष लक्षवेधी ठरले. प्रशासन आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी साधलेला समतोल हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

13 hrs ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer Nanded, Maharashtra•
13 hrs ago

दिल्लीत महिला साहित्य संमेलन; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल नांदेड, दि. 30 : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे दि. 11 व 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित पहिल्या अखिल भारतीय महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनात नांदेड जिल्ह्याच्या डॉ. शारदा चोंडेकर यांनी आपल्या काव्यप्रतिभेने ठसा उमटवला. महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या या संमेलनात विविध राज्यांतील महिला अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला. ‘जागर कर्तृत्वाचा, उत्सव साहित्याचा’ या ब्रीदाखाली झालेल्या या उपक्रमात साहित्य आणि प्रशासन यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. किनवट सारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शारदा चोंडेकर या संमेलनाच्या निमंत्रित प्रतिनिधी होत्या. बहिणाबाई चौधरी सभागृहात त्यांनी सादर केलेल्या काव्यमय अभिव्यक्तीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या साहित्यकृतीतून उमटलेले संवेदनशील आणि सामाजिक भान असलेले विचार विशेष लक्षवेधी ठरले. त्यांच्या सहभागामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर ठळकपणे अधोरेखित झाले. या संमेलनात देशभरातील महिला शासकीय अधिकारी सहभागी झाल्या होत्या. प्रशासनात कार्यरत असलेल्या महिलांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात सरहद संस्था व नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त सचिव श्रीमती आर विमला यांनी केले होते. ग्रंथदिंडी, चर्चासत्रे, प्रकट मुलाखती आणि कविसंमेलने अशा विविध उपक्रमांद्वारे उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सरहद, पुणे’ आणि सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांच्या पुढाकारात राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. स्त्री-अधिकाऱ्यांच्या साहित्य निर्मितीतून प्रशासन अधिक संवेदनशील, सृजनशील आणि लोककल्याणकारी होऊ शकते, हा विचार केंद्रस्थानी होता. सरकारी कामाच्या धकाधकीतही सर्जनशीलता जपणाऱ्या महिला अधिकाऱ्यांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरले. ग्रंथदिंडीपासून कविसंमेलनांपर्यंत विविध कार्यक्रमांनी या साहित्यिक मेळाव्याला वेगळी उंची दिली. महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने मराठी वाङ्मय इतिहासात त्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. *नांदेडचे प्रतिनिधित्व ठरले लक्षवेधी* डॉ. शारदा चोंडेकर यांच्या प्रभावी काव्यसादरीकरणामुळे नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विशेष लक्षवेधी ठरले. प्रशासन आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी साधलेला समतोल हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    1
    महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    16 hrs ago
  • स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! #SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat
    1
    स्वयंरोजगाराला नवी दिशा! बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ 
नांदेड येथील विष्णू नगर भागातील श्री. शंकरराव चव्हाण सभागृहात इतर बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळावा’ उत्साहात पार पडला 
या मेळाव्यात अनेक गरजू व होतकरू लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज वाटप करण्यात आले. तसेच पालकमंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले 
या कार्यक्रमास नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते 
महापौर कविता मुळे यांनीही यावेळी आपले विचार मांडत शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे मराठवाड्यातील स्वयंरोजगाराला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला 
स्वावलंबी भारतासाठी अशा उपक्रमांची गरज! 
#SelfEmployment #LoanDistribution #Nanded #Marathwada #AtulSave KavitaMule GovernmentSchemes YouthEmpowerment ALMBharat
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    1
    साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news
    user_Janta police taims
    Janta police taims
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Latur 24
    1
    Post by Latur 24
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    8 min ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    1
    लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने  करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी  दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी  येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी  दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले.  शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले.
एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सतना सोशल मीडिया में सतना स्मार्ट सिटी और महापौर जी को मिल रहे लाखों न्यू, जमकर वायरल हो रही शहर की विकाश गाथा, रीवा से सतना हो गया आगे, महापौर जी के प्रयास की हर जगह हो रही वाहवाही
    1
    सतना 
सोशल मीडिया में सतना स्मार्ट सिटी और महापौर जी  को मिल रहे लाखों न्यू,  जमकर वायरल हो रही शहर की विकाश गाथा, रीवा से सतना हो गया आगे,
महापौर जी के प्रयास की हर जगह  हो रही वाहवाही
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Risod, Washim•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.