“वेळीच उपाययोजना करा, अन्यथा मुंबई-पुण्यातही गंभीर परिणाम” : रोहिणी खडसे सूरतच्या परिस्थितीवरून सरकारला इशारा जळगाव : प्रतिनिधी गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्यातील राजकारणात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्र सरकारला इशारा देत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. “सूरतच्या घटनेतून धडा घ्या, अन्यथा मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांनाही याचा फटका बसू शकतो,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. सुरत येथे स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण झाल्याने स्ट्रीट फूड व्यवसाय, छोटे हॉटेल्स व ढाबे मोठ्या प्रमाणावर बंद पडत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हजारो व्यावसायिक आणि कामगार बेरोजगार होत असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कामगार तसेच विद्यार्थी आपल्या गावी परतण्याचा निर्णय घेत आहेत. परिणामी, सूरत रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत खडसे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “ही दृश्य काळजाला चटका लावणारी आहेत. रोजगार आणि अन्न या दोन्ही मूलभूत गरजा हिरावल्या गेल्याने मजूर गावाकडे परतण्यास मजबूर झाले आहेत,” असे त्या म्हणाल्या. खडसे यांनी स्पष्ट केले की, काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्येही हॉटेल्स, खानावळी बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गावाकडून शिक्षण व रोजगारासाठी शहरांकडे आलेल्या युवकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. “ही परिस्थिती जर वेळीच नियंत्रित केली नाही, तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही सूरतसारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य सरकारवर टीका करत त्यांनी म्हटले की, परिस्थिती गंभीर असतानाही प्रशासन योग्य ती पावले उचलताना दिसत नाही. “सरकार झोपेत आहे का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, गरिब, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी विशेष धोरण राबवावे, असेही त्यांनी नमूद केले. सूरतमधील सद्यस्थिती ही केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून, ती देशातील शहरी व्यवस्थेतील कमकुवत दुव्यांची जाणीव करून देणारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेळ न दवडता योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by Raju Bawdiwale1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- विक्रम शिंदे /भोर दि.20तालुक्याच्या भाटघर धरण क्षेत्रातील पसुरे मधील टोंगेवाडी येथे पुणे येथील आदिनाथ भक्तामर हीलिंग सेंटरच्या वतीने नागरिकांना आरोग्यहितकारक थंडगार पाण्यासाठी माठ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे गौरव मुनोत,सुरेशनाना धुमाळ,दत्तात्रेयदादा धुमाळ,संतोष धुमाळ,मनोज धुमाळ तसेच महिला भगिनी,युवक उपस्थित होते. प्रति कुटुंब एक असे माठ वितरित करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी व महिलांनी माठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1