राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कार्यशाळा संपन्न.. कोल्हापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP) अंतर्गत FCTC च्या कलम 5.3 (तंबाखूमुक्त संस्था) या विषयावर असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक आणि स्टाफ नर्स यांच्यासाठी क्षमता बांधणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी तंबाखू नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणी आणि विविध विभागांमधील समन्वयाची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यशाळेत जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी एनटीसीपी कार्यक्रमाची रचना, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच FCTC च्या कलम 5.3 अंतर्गत तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून सार्वजनिक आरोग्य धोरणांचे संरक्षण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पाटील यांनी तोंडाचा कर्करोग, त्याची लक्षणे तसेच मौखिक आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. भूमिका फतेवाड यांनी मौखिक आरोग्य तपासणीची पद्धत आणि सामान्य तोंडी आजारांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे यांनी कोटपा अधिनियम 2003 अंतर्गत असलेल्या तरतुदी आणि त्याची अंमलबजावणी याबाबत माहिती दिली. तसेच मानसशास्त्रज्ञ चारुशीला कणसे यांनी FGD (फोकस ग्रुप डिस्कशन) संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक आणि स्टाफ नर्स यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तंबाखूमुक्त संस्था व परिसर निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी ट्रेनिंग सेंटरचे डॉ. सुनील कुरुंदवाडे, प्रमोद ढाले आणि राजश्री साबळे उपस्थित होते.

- कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला. दर्शनासोबतच जनसंवाद आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.1
- Post by Madan petkar1
- कोल्हापूर : रविराज कांबळे आरक्षणाची जनभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या होतात. अशा या पवित्र भूमीत असल्याचा अभिमान व्यक्त करत Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळेच आपल्या खांद्यावरचे स्टार आहेत, असे मनोगत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. विश्वरत्न बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात अभिवादनासाठी उपस्थित राहून त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला.2
- Post by E city news network1
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य : डॉ.प्रविण दबडघाव विक्रम शिंदे /भोर दि.१४ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प.महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडघाव यांनी केले.कापूरहोळ येथील विराट हिंदू मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रवीण दबडघाव बोलत होते. यावेळी मेळाव्याला कापूरहोळ, हरिश्चंद्री ,दिवळे ,केतकावळे, कुंभोशी ,चिव्हेवाडी, खडकी कामथडी , उंबरे या गावातून हिंदू राम भक्त उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सुरू असलेल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी बालांनी रामरक्षा गणपती स्तोत्र मनाचे श्लोक सर्वांसमोर सादर केले जानुबाई ढोल लेझीम पथक कामथडी या गावाने ढोल लेझीमच्या वाद्य पथकाने नेत्रदीपक खेळ सादर करत लक्ष वेधून घेतले.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत असतानाच, आता ऐतिहासिक पंचगंगा घाट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रंकाळा आणि के.एम.बी.पी. पार्क येथील कारवाईनंतर महापालिकेने आपला मोर्चा पंचगंगा घाटाकडे वळवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सध्या घाट परिसरात अनधिकृत दुकाने, गाळे आणि खाऊ गल्ली मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहे. यामुळे घाटाचे ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्य लोप पावत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नदी प्रदूषणमुक्तीचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात घाटावर वाढलेली खाऊ गल्ली आणि पूजेच्या साहित्यांच्या स्टॉल्समुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. गणेशोत्सव आणि जोतिबा यात्रेच्या काळात येथे मोठी गर्दी असते, अशा वेळी या अतिक्रमणांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिकेने केवळ रस्त्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हापूरकरांमधून होत आहे.1