logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा, महाराष्ट्र यांच्या वर्धापन दिनानिमित्त, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे रविवार, २८ जून रोजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या उन्नती आणि प्रगतीसाठी सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यातील महनीय व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जे कार्यकर्ते समाजाचे देणे लागतो या भावनेतून सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, अध्यात्म, आरोग्य, पत्रकारिता, उद्योग, कृषी, योगा, शासकीय व निमशासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करतात, तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करतात, अशा कार्यकर्त्यांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल. यामध्ये समाज भूषण, समाज रत्न, आदर्श पत्रकार, आदर्श शिक्षक/शिक्षिका, कामगार भूषण, कामगार रत्न, सहकार भूषण, कला भूषण, कृषी रत्न, साहित्य भूषण, उद्योग भूषण, उद्योग रत्न, आदर्श योग शिक्षक/शिक्षिका, आदर्श माता अशा विविध श्रेणीतील पुरस्कारांचा समावेश आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये प्रभाकर कांबळे (कोल्हापूर रत्न), केरबा डावरे (शाहू पुरस्कार), कल्पना भाईगडे (आदर्श माता), संजीव चिकुर्डेकर (शाहू पुरस्कार), काळूराम लांडगे (शाहू पुरस्कार), भरत सकपाळ (समाजरत्न), विठ्ठल नाईक (समाज भूषण), बालाजी सक्करगे (कामगार भूषण), विजय रणखांब (जीवन गौरव), राजकुमार किर्दत (कामगार भूषण), विनय पिंपरकर (साहित्यरत्न), रविंद्र पाटील (कामगार भूषण), किरण नामजोशी (आध्यात्मिक कला भूषण), दत्तात्रय दिवेकर (कृषी भूषण), पांडुरंग उर्फ सर्जेराव पाटील ठाणेकर (शाहू पुरस्कार), विलास निकम (योगरत्न जीवनगौरव पुरस्कार), दत्तात्रय जाधव (कामगार भूषण), उदय रोटे (आदर्श कामगार), एकनाथ कंदले (शाहू पुरस्कार), मनोज पवार (कृषी भूषण), अभिजीत बिडकर (उद्योग रत्न), संतोष नातू (कृषी भूषण), लीलावती पाटील (समाजरत्न), राम सारंग (समाजभूषण), संतोष शिंदे (समाजभूषण), चंद्रकांत लव्हटे (उद्योगरत्न), अनंतराव घोगरे पाटील (शाहू पुरस्कार), पोपट देसाई (समाज रत्न), हिरालाल चौधरी (समाज भूषण), प्रदीप हसबे (आदर्श शिक्षक), पांडुरंग पाटील (आदर्श शिक्षक), राजेंद्र जाधव (समाजरत्न), अरुण सूरकर (समाजभूषण), अशोक मासाळे (समाजरत्न), गीता पवार (समाजभूषण), शामराव बोडके (उद्योग भूषण), राजेंद्रकुमार पाटील (समाजरत्न) यांचा समावेश आहे. राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांमध्ये रेवती जरग (समाजरत्न), भार्गवी कुलकर्णी (प्राणी मित्र), राहुल पाटील (कामगार रत्न), लता दुधाळे (कामगार रत्न), प्रज्ञा शिंदे (आदर्श परिचारिका), प्रदीप जाधव (कामगार भूषण), सुनील कुचेकर (शाहू पुरस्कार), शिवाजी दिंडे (समाजभूषण), गणेश भोसले (समाजभूषण), रमेश नाईक (महाराष्ट्र रत्न), संगीता चव्हाण (आदर्श समाजसेविका), शिवानी हिंगोणीकर (समाजभूषण), स्वाती दिवाण (आदर्श माता), नरहरी माळी (समाजभूषण), राहुल राजापुरे (साहित्य भूषण), मेघा शिवगुंडे (आदर्श महावितरण अभियंता), विलास पाटील (अध्यात्मिक कला भूषण), विद्याधर राणे (कामगार भूषण), किशोर बिंद (सहकार भूषण), हर्षल बनसोड (शाहू पुरस्कार), पंडित निंबाळकर (समाजभूषण), चंद्रकांत पाटील (क्रीडारत्न), दीपक शिंगारे (सहकार रत्न), मनीषा सुतार (आदर्श शिक्षिका), प्रशांतकुमार शेरवेगार (सहकार भूषण), तुळसीदास सन्नके (कोल्हापूर भूषण), रेहाना मुल्ला (समाजरत्न), वसंत पाटील (कामगार व कवी भूषण), बाळकृष्ण तावडे (सहकार भूषण), राजीव सोनकांबळे (सहकार भूषण), वैशाली कांबळे (कामगार भूषण), उत्तम जगताप (आदर्श पत्रकार), आकाश शिंदे (कृषी भूषण) यांचा उल्लेख आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना केले. यावेळी प्रभाकर कांबळे, अनिता काळे, रूपाली निकम, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, शिवाजी चौगुले, किशोर तळेले, महादेव चक्के, विजय रणखांब, शैलेंद्रनाथ इंगळे, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, केरबा डावरे, भरत सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

1 hr ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
c0dc2d7b-e44f-4a4e-b5ee-00120d72e410

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आज मुंबई शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. नागरिकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजधानीत विविध ठिकाणी सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांतर्गत, एका मुख्य कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेता शाहिद कपूर यांनी हजारो नागरिकांसोबत एकत्र येत योगासने केली. 'दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी योग' हा जागतिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवून दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे हा या भव्य आयोजनाचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    1
    आज मुंबई शहरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. नागरिकांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राजधानीत विविध ठिकाणी सामूहिक योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यांतर्गत, एका मुख्य कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेता शाहिद कपूर यांनी हजारो नागरिकांसोबत एकत्र येत योगासने केली.

'दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी योग' हा जागतिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवून दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करणे हा या भव्य आयोजनाचा मुख्य उद्देश होता. या सोहळ्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम मतमोजणीच्या प्रक्रियेत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
    1
    भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम मतमोजणीच्या प्रक्रियेत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • वडूज ते गणेशवाडी रस्त्यावर असलेल्या सेवालाल मंदिरासमोरच्या दुकानदारांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या दुकानांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचा आरोप असून, नागरिकांनी संबंधित दुकानदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    1
    वडूज ते गणेशवाडी रस्त्यावर असलेल्या सेवालाल मंदिरासमोरच्या दुकानदारांकडून वारंवार कचरा टाकला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या दुकानांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असल्याचा आरोप असून, नागरिकांनी संबंधित दुकानदारांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
    user_Shekhar chavan साहेब
    Shekhar chavan साहेब
    खटाव, सातारा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • सांगोला तालुक्यातील राजुरी ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरात झालेल्या चोरी आणि मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ सोमवार, २२ जून रोजी राजुरी गावातील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी ग्रामस्थांनी चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली, तसेच आठवड्याचा बाजारही बंद ठेवण्यात आला. चोरट्यांनी मूर्तीची विटंबना करून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी राजुरी बंद दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने आत्माराम काटे यांनी केली. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर पोलिसांनी तात्काळ चोरांना अटक केली नाही, तर सर्व राजुरी ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसतील. माजी सरपंच रामभाऊ दबडे, पाणी साठवून समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब व्हळगळ आणि पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगोला पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली. लक्ष्मीदेवीच्या मंदिरासमोरील पटांगणात एकत्र येऊन सर्व राजुरी ग्रामस्थांनी चोरट्यांनी केलेल्या मूर्तीच्या विटंबनेचा निषेध केला आणि सर्वांच्या वतीने चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.
    1
    सांगोला तालुक्यातील राजुरी ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरात झालेल्या चोरी आणि मूर्तीच्या विटंबनेच्या निषेधार्थ सोमवार, २२ जून रोजी राजुरी गावातील ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी ग्रामस्थांनी चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली, तसेच आठवड्याचा बाजारही बंद ठेवण्यात आला.

चोरट्यांनी मूर्तीची विटंबना करून ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी राजुरी बंद दरम्यान ग्रामस्थांच्या वतीने आत्माराम काटे यांनी केली. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर पोलिसांनी तात्काळ चोरांना अटक केली नाही, तर सर्व राजुरी ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसतील. माजी सरपंच रामभाऊ दबडे, पाणी साठवून समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब व्हळगळ आणि पंचायत समिती सदस्य डॉ. सदाशिव दबडे यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगोला पोलिसांनी चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली.

लक्ष्मीदेवीच्या मंदिरासमोरील पटांगणात एकत्र येऊन सर्व राजुरी ग्रामस्थांनी चोरट्यांनी केलेल्या मूर्तीच्या विटंबनेचा निषेध केला आणि सर्वांच्या वतीने चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पुन्हा एकदा करण्यात आली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ६.३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मौजे वेणुपुरी, तालुका भोर येथील नीरा देवघर धरणात लोणी काळभोर येथील चार तरुण पोहण्यासाठी गेले होते. या चार तरुणांपैकी देवेश राज मिश्रा (वय अंदाजे २८ वर्ष), जो लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील रहिवासी होता, तो धरणाच्या पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच भोईराज जलापती व्यवस्थापन आणि पोलीस स्टाफ यांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी देवेश राज मिश्रा यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोर येथे पाठवण्यात आला आहे.
    2
    पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी ६.०० ते ६.३० च्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. मौजे वेणुपुरी, तालुका भोर येथील नीरा देवघर धरणात लोणी काळभोर येथील चार तरुण पोहण्यासाठी गेले होते. या चार तरुणांपैकी देवेश राज मिश्रा (वय अंदाजे २८ वर्ष), जो लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील रहिवासी होता, तो धरणाच्या पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच भोईराज जलापती व्यवस्थापन आणि पोलीस स्टाफ यांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी देवेश राज मिश्रा यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोर येथे पाठवण्यात आला आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • रायगड जिल्हा भोई समाज कार्यकारिणीची एक महत्त्वाची सभा महाड येथील नांगलवाडी येथे श्री. राजेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेची सुरुवात दत्तगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली. या बैठकीचा मुख्य उद्देश जून महिन्यात शाळा-महाविद्यालये सुरू होत असताना, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी 'शिष्यवृत्ती' जाहीर करणे हा होता. सभेत अनेक सामाजिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजाची ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत मोलाची ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. सभेला सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सारंगे यांनी केले, तर सचिव श्री. अरविंद महाडिक यांनी सर्वांचे आभार मानून सभेची यशस्वी सांगता केली.
    1
    रायगड जिल्हा भोई समाज कार्यकारिणीची एक महत्त्वाची सभा महाड येथील नांगलवाडी येथे श्री. राजेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेची सुरुवात दत्तगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली.

या बैठकीचा मुख्य उद्देश जून महिन्यात शाळा-महाविद्यालये सुरू होत असताना, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी 'शिष्यवृत्ती' जाहीर करणे हा होता. सभेत अनेक सामाजिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजाची ही छोटीशी मदत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत मोलाची ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली. सभेला सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सारंगे यांनी केले, तर सचिव श्री. अरविंद महाडिक यांनी सर्वांचे आभार मानून सभेची यशस्वी सांगता केली.
    user_किशोर द. किर्वे
    किशोर द. किर्वे
    Local News Reporter महाड, रायगड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    1
    पुणे कमिशनर ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये अवैध दारूविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टी आणि राष्ट्रीय दलित अंतर सेनेने संयुक्तपणे ही धडक कारवाई करत अवैध दारूविक्रीचा अड्डा उघडकीस आणला.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची राज्यात '२४ तासांत कधीही फोन उचलणारे खासदार' अशी ख्याती आहे. ते महाराष्ट्रातून कितीही फोन आले तरी ते नेहमी उचलत असत, अशी त्यांची ओळख होती. मात्र, आता त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षबदलाच्या निर्णयानंतर ते आता खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलणार का, तसेच राज्यातील आणि आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे फोन यापुढेही उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल, असे म्हटले जात आहे.
    1
    धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची राज्यात '२४ तासांत कधीही फोन उचलणारे खासदार' अशी ख्याती आहे. ते महाराष्ट्रातून कितीही फोन आले तरी ते नेहमी उचलत असत, अशी त्यांची ओळख होती. मात्र, आता त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पक्षबदलाच्या निर्णयानंतर ते आता खऱ्या अर्थाने शिवधनुष्य पेलणार का, तसेच राज्यातील आणि आपल्या मतदारसंघातील नागरिकांचे फोन यापुढेही उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल, असे म्हटले जात आहे.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.