logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबिर तालुक्यातील मौजे तोंडार येथे संपन्न उदगीरच्या पशुवैद्यक महावियालयाचे  रासेयो शिबीर तोंडार येथे उत्साहात संपन्न उदगीर(प्रतिनिधी) पशुवैद्यक व पशुविज्ञान महावियालय, उदगीर तर्फे आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष कार्यक्रम शिबीर तोंडार (ता. उदगीर) येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या  शिबीरामध्ये चतुर्थ वर्षाच्या ५७ विद्यार्थी स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल भिकाने, माजी संचालक विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजश्री गंदगे या उपस्थित होत्या. उद्घाटनप्रसंगी मंचावर गावचे सरपंच भरत कोचेवाड, नीळकंठ बिरादार (ग्रामपंचायत सदस्य),  राजेंद्र पाटील (माजी पंचायत समिती सदस्य),  रामेश्वर बिरादार (ग्रामपंचायत सदस्य), माधव पाटील इत्यादी उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अनिल भिकाने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये हवामान बदलाच्या  काळात शाश्वत शेतीतून  शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व पर्यायाने शाश्वत ग्रामविकासासाठी  जलसंधारण, मृदासंधारण, वृक्ष संवर्धन, पशुपालन व दुग्धव्यवसायाचे अनन्यसाधारण महत्व असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजश्री गंदगे यांनी पशुपालकांच्या उन्नतीसाठी महाविद्यालय देत असलेल्या योगदानाबद्दल उपस्थिताना माहिती दिली.  सात दिवसीय विशेष कार्यक्रम शिबिरादरम्यान जनावरांसाठी गोचीडनाशक औषधाची फवारणी, जंतनाशक औषधाचे वाटप, पाळीव श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण, तणावमुक्त जीवनशैली, घरगुती पद्धतीने दुग्धजन्य पदार्थनिर्मिती, मुरघास निर्मिती, जलसंधारण व नैसर्गिक शेती इत्यादी विषयांवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये पाळीव पशुंसाठी मोफत पशुरोगनिदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले. या सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष कार्यक्रम शिबीरादरम्यान विविध कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी श्री. महादेव गोमारे, डॉ. अनिल पाटील, डॉ. सुरेश घोके, डॉ. गोपाल भारकड, डॉ. अशोक भोसले, डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. प्रशांत मसारे, डॉ. मत्स्यगंधा पाटील, डॉ. संतोष चोपडे, डॉ. प्रवीण सावळे, डॉ. विवेक खंडाईत, डॉ. नरेंद्र खोडे, डॉ. शरद आव्हाड, डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. बालाजी कोंडरे व डॉ. अनिकेत नावकर तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संभाजी चव्हाण यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.

20 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
20 hrs ago
072e5b24-0888-44ee-bd4a-3f7596b86d13

More news from Maharashtra and nearby areas
  • ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    1
    ये सारी बात का जिम्मेदार कोण है?
चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो.
बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है.
मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. 
और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    11 hrs ago
  • लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली.
घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    1
    शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    12 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    1
    हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका
हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे.
निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे.
👉 नागरिकांची मागणी:
✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
✔️ देयके तात्काळ थांबवा
✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा
सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    मंठा, 
पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे.
या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    1
    खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा
हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो 
आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे 
दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो 
#RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.