संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेमधूनच सर्वप्रथम आम्ही भारताचे लोक असा उल्लेख करुन भारतातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देत राष्ट्रनिर्मितीची घोषणा केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, दर्जा, बंधुता, समानसंधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या तत्वावर उद्देशिकेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यांनाही संविधानाने मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत व मूलभूत हक्काशिवाय लोकशाही यशस्वी होणार नाही, त्यामुळे आता राष्ट्र घडविण्याची जबाबदारी नागरिकांचीच आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील सुप्रसिध्द व्याख्याते डॉ. देविदास घोडेस्वार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये ‘संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते. डॉ. घोडेस्वार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक, भाषिक बाबी कायम ठेवून राष्ट्रनिर्मिती केली. सर्वोच्च न्यायालयाने देखील संविधानाच्या उद्देशिकेला अतिशय महत्व दिले आहे. उद्देशिकेमधील प्रत्येक शब्द, क्रम, महत्व, अर्थपूर्ण आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी उद्देशिकेचे अऩन्यसाधारण महत्व आहे. सर्वसमावेशक अशी उद्देशिका असून संविधान निर्मितीवेळी जी परिस्थिती होती, ती पूर्णपणे बदलली असे म्हणता येणार नाही, अशी प्रासंगिकताही डॉ. घोडेस्वार यांनी सांगितली. प्रमुख अतिथी डॉ. भैय्यासाहेब मेटकर म्हणाले, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य होत आहे, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अभ्यास केंद्र निर्मितीचा उद्देश सफल होत आहे, असेही ते म्हणाले. संविधानामुळे आपण एकत्र आहोत - प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू म्हणाले, संविधानामुळेच आपण एकत्र आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही आपल्याला निर्माण करावी लागेल. व्याख्यात्यांनी अतिशय सुंदररित्या संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि प्रासंगिकता या विषयाला अनुसरुन मार्गदर्शन केले आहे. विद्यापीठात संविधान शिल्प उभारण्यासाठी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत, असेही ते म्हणाले. संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. याप्रसंगी दिवंगत डॉ. बी.जी. खोब्राागडे यांना दोन मिनिटे मौन पाळून सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संचालन डॉ. अभिजित इंगळे यांनी तर आभार डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, शिक्षक, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. -------------------------------------
संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेमधूनच सर्वप्रथम आम्ही भारताचे लोक असा उल्लेख करुन भारतातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देत राष्ट्रनिर्मितीची घोषणा केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, दर्जा, बंधुता, समानसंधी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या तत्वावर उद्देशिकेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यांनाही संविधानाने मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत व मूलभूत हक्काशिवाय लोकशाही यशस्वी होणार नाही, त्यामुळे आता राष्ट्र घडविण्याची जबाबदारी नागरिकांचीच आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील सुप्रसिध्द व्याख्याते डॉ. देविदास घोडेस्वार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृति संशोधन केंद्राच्या सभागृहामध्ये ‘संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते. डॉ. घोडेस्वार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धार्मिक, भाषिक बाबी कायम ठेवून राष्ट्रनिर्मिती केली. सर्वोच्च न्यायालयाने देखील संविधानाच्या उद्देशिकेला अतिशय महत्व दिले आहे. उद्देशिकेमधील प्रत्येक शब्द, क्रम, महत्व, अर्थपूर्ण आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी उद्देशिकेचे अऩन्यसाधारण महत्व आहे. सर्वसमावेशक अशी उद्देशिका असून संविधान निर्मितीवेळी जी परिस्थिती होती, ती पूर्णपणे बदलली असे म्हणता येणार नाही, अशी प्रासंगिकताही
डॉ. घोडेस्वार यांनी सांगितली. प्रमुख अतिथी डॉ. भैय्यासाहेब मेटकर म्हणाले, डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य होत आहे, ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे. अभ्यास केंद्र निर्मितीचा उद्देश सफल होत आहे, असेही ते म्हणाले. संविधानामुळे आपण एकत्र आहोत - प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू म्हणाले, संविधानामुळेच आपण एकत्र आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित लोकशाही आपल्याला निर्माण करावी लागेल. व्याख्यात्यांनी अतिशय सुंदररित्या संविधानाची उद्देशिका, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि प्रासंगिकता या विषयाला अनुसरुन मार्गदर्शन केले आहे. विद्यापीठात संविधान शिल्प उभारण्यासाठी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत, असेही ते म्हणाले. संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. याप्रसंगी दिवंगत डॉ. बी.जी. खोब्राागडे यांना दोन मिनिटे मौन पाळून सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संचालन डॉ. अभिजित इंगळे यांनी तर आभार डॉ. रत्नशील खोब्राागडे यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, शिक्षक, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक, महिलावर्ग, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. -------------------------------------
- डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल मध्ये मॅनेजमेन्ट च्या बेजबाबदारपणाने असे गरिबांचे जीव जाते यावर कोणी आवाज उठवत नाही...1
- 11/100 Day challenge 10kfollowers1
- Let your feet do the talking Don't think, just dance ✨️ Take more chances, dance more dances 💃🕺1
- Follow psi_arun_nagargoje1
- अमरावती जिल्ह्याची माहिती मराठी / amaravati district information in marathi in short1
- यवतलाम -वासिम महाराष्ट्र विधानसभा चुनाव परिणाम 2024||1
- #mln | महाराष्ट्र लाईव्ह न्युज च्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आ.अडसड यांनी घेतली दखल |1
- अमरावती वाले युसूफ चाचा ने कॉल को लेकर पुलिस कंप्लेंट की #महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन 20241