लातूरच्या वाहतूक समस्येच्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिकेच्या संबंधित विभागाची बैठक संपन्न वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी पोलीस अधीक्षकांची महानगरपालिकेत बैठक. लातूर (एल पी उगीले) शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवर कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज दिनांक ११ मार्च २०२६ रोजी लातूर महानगरपालिकेमध्ये महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीचे आयोजन पोलीस अधीक्षक अमोल तांबे व महापालिका आयुक्त मानसी मीना यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून बैठकीस महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, विरोधी पक्ष नेते देविदास काळे, आरटीओ विनोद चव्हाण यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लातूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनियंत्रित पार्किंग, चौकांमधील गर्दी, अतिक्रमण तसेच अपुरी वाहतूक शिस्त या समस्यांचा सखोल आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी व सुटसुटीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना सहाय्यभूत ठरतील अशा किमान १०० ट्राफिक वॉर्डनची नियुक्ती महानगरपालिके मार्फत करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. हे ट्राफिक वॉर्डन शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांसोबत कार्यरत राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत करतील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी शहरातील अनेक चौकांमधील कार्यरत नसलेले ट्राफिक सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे, ऑटो रिक्षा पॉईंटचे नियोजन, तसेच महानगरपालिकेच्या सिटी बस परिवहन व्यवस्थेचे प्रभावी नियोजन याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. लातूर पोलीस वाहतूक समस्येच्या निराकरणासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे सांगताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विविध महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविल्या. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्येक चौकापासून किमान ५० मीटर अंतरापर्यंत “नो पार्किंग झोन” घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच त्या पुढील भागात ऑटो रिक्षा पॉईंट, बस थांबे आणि सिटी बस स्टॉप निश्चित करून चौकातील अनावश्यक गर्दी टाळण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांवर फक्त परवानाधारक ऑटो रिक्षाच धावतील, यासाठी परिवहन विभागाने आवश्यक ती कारवाई करावी, अशी सूचना देण्यात आली. लातूर पोलीस आणि महानगरपालिकेच्या टोइंग व्हॅन समन्वयाने बेकायदेशीर पार्किंगविरोधात कारवाई करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. शहरातील अनेक ठिकाणी नो पार्किंग फलक, झेब्रा क्रॉसिंग मार्किंग आणि वाहतूक चिन्हे अंधुक झाली असून ती तात्काळ नूतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचेही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी विशेष “वर्किंग कमिटी” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ती समिती शहरातील विविध रस्त्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचविणार आहे. तसेच शहरातील काही प्रमुख रस्ते वन-वे करण्याबाबत अभ्यास करण्याचे, रस्त्यांवरील बदल आणि वाहतूक नियमांबाबत महानगरपालिकेने अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) काढण्याचे निर्देश देण्यात आले. "फ्री लेफ्ट टर्न" ही वाहतूक व्यवस्थापनातील एक महत्त्वाची संकल्पना असून चौकात सिग्नल असतानाही डावीकडे वळणाऱ्या वाहनांना सिग्नलची वाट न पाहता थेट डावीकडे वळण्याची मुभा देता येईल का या संदर्भात नियोजन करणे. वाहतुकीच्या अडथळ्यांचे एक प्रमुख कारण असलेल्या दुकानदार व वाहनधारकांकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची आवश्यकता बैठकीत अधोरेखित करण्यात आली. यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलिसांकडून आवश्यक ते बंदोबस्त पुरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रस्त्यावर लावलेले अनधिकृत साईनबोर्ड, फ्लेक्स आणि जाहिरातीचे फलक काढून टाकण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील मुख्य चौकांमध्ये किंवा रस्त्यावर एस.टी. बसेस थांबवून प्रवासी घेण्याच्या प्रकारांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने ते तात्काळ थांबविण्याची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले. काही चौकांमध्ये मध्यभागी बांधलेल्या संरचनांमुळे रस्ते अरुंद झाले असल्याने त्यावरही उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे मॉडेल तयार करण्यासाठी पीव्हीआर चौक येथे प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सिटी बस सेवा अधिक प्रभावीपणे राबविणे, तसेच प्रत्येक प्रभागामध्ये महिन्याला किमान चार चौकांमध्ये वाहतूक सुधारणा उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. राजीव गांधी चौकाजवळील राष्ट्रीय महामार्गावर भरत असलेल्या भाजी मार्केटमुळे निर्माण होणारी वाहतूक समस्या गंभीर असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. या ठिकाणी वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीस पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त मानसी मीना, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उडगे, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त पंजाब कानसोळे, वसुधा फड, उप पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे, तसेच आरटीओ विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, विधी अधिकारी, अतिक्रमण विभाग, झोनल अधिकारी आणि इतर विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य केल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी उद्यापासूनच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिका आयुक्त मानसी मीना तसेच बैठकीस उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी पीव्हीआर चौक येथे प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या पाहणीदरम्यान चौकातील प्रत्यक्ष वाहतूक परिस्थिती, अडचणी व समस्यांचा अभ्यास करून स्पॉटवरच योग्य आणि कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यात येणार आहे.

- प्रा. गणेश बिरादार राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालया तील प्रा. गणेश बिरादार यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन स्विफ्टन लिफ्ट एज्युकेशन मीडिया ग्रुपच्या वतीने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औंध, पुणे येथे झालेल्या पंडित भीमसेन जोशी सभागृहामध्ये इंडियन आर्मीच्या लेफ्टनंट कमांडर शीतलजी गायकवाड, येवले अमृततुल्यचे संस्थापक संचालक नवनाथ येवले, चाकण फेडरेशन इंडस्ट्रीज चे मुख्य कार्यकारी दिलीप बतवाल, भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा नेहा गोरे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस प्रियांका शेंडगे, स्विफ्टन लिफ्ट चे संस्थापक निलेश साबे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. प्रा. गणेश बिरादार हे मागील दहा वर्षापासून श्री हावगीस्वामी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक अभ्यासू विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ते अत्यंत संवेदनशील असून अशा विद्यार्थ्यांना नेहमीच मदत करत आलेले आहेत. स्वतःच्या यु टूब चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचेही काम ते करतात. महाविद्यालयातल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा विभागाचे ते चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे नी कनिष्ठ महाविद्यालयास बाह्य मूल्यांकनात अ+ दर्जा बहाल केला आहे. बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. *युवा क्रांती के शोले* या एकपात्री एकांकिकेतून लोकसंख्या नियंत्रण,बेटी बढाओ बेटी पढाओ, स्त्रीभ्रूणहत्या, महिला सबलीकरण इत्यादीसाठी जाणीव जागृती निर्माण करीत असतात. प्रा.गणेश बिरादार यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उमेश पाटील देवणीकर,उपाध्यक्ष राजकुमार हरकरे,रवींद्र हसरगुंडे, सचिव डॉ.सौ. मनीषाताई वडीयार, सहसचिव सुबोध आंबेसंगे, कोषाध्यक्ष संगमेश्वर जिरगे, सर्व कार्यकारणी सदस्य महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अप्पाराव काळगापुरे, उपप्राचार्य डॉ. नामदेव येमेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षक प्रा.महेश बोळेगावे, एच एस व्ही सी विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुजित गायकवाड, ग्रंथपाल प्रा अजित रंगदळ, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, स्टाफ सचिव प्रा वसंत पवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.2
- *देगलूर तालुक्यातील येथे सुगाव* अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर जि नांदेड येते भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजारो भाविकांनी कार्यक्रमातील दैनिक आमची शोभा व चांगल्या पद्धतीचे कार्य अतिशय उत्तम पाडत आहे दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, गायनाचार्य रत्न सगितरत्न कैलास महाराज पौळ परभणी,ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली, बंडू गुरुजी ईब्राहिमपुर , उमाकांत महाराज केरळे. निळकंठ महाराज ईब्राहिमपुर गिरीधर महाराज इंगळे , ईब्राहिमपुर नगरीचे सरपंच बालाजी पाटील बामणे यांनी पण महाराजांचे सन्मान करण्यात आले भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित मुसलिम समाजातील ह भ प डॉ.जलाल महाराज त्यांचे मुस्लिम बांधवाने महाराजांचे सन्मान शिल्पक देऊन सन्मान करण्यात आले भाविका भाविकांनी भक्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील भाविकांनी महाराजांच्या समोर येऊन ते कीर्तनाचा लाभ घेतलेला आहे, कीर्तनात व समोर बसून त्यांनी स्वतः कीर्तन प व ऐकले भाविक भक्त हजार भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व कीर्तनाचे आवश्यक लाभ घेतले भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व भजनी मंडळ आजूबाजूचा पंचशीतील भाविक भक्ता मोठ्या संख्येनेक्ष उपस्थित होते , किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर, महाराजांनी अभंगाच्या भावातून भाविक भक्तांना हजार भाविक भक्तांना त्याने मंत्रमुक्त केले GS24X7 मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार न्यूज मो 95610623693
- मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते2
- Post by अखंड भारत1
- भाजपा जिल्हा महामंत्री संजय गिरी यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तात्काळ भाजप जिल्हा शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर दखल घेत संजय गिरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची केली मनधरणी, पक्ष मोठा आहे इच्छुकांची संख्या ही मोठी आहे, पण पक्ष आणि पक्षश्रेष्ठी कायम सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे आहेत, येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी नक्कीच संजय गिरी यांच्या बाबतीत विचार करतील आणि एक चांगली संधी येणाऱ्या काळात त्यांना मिळेल, असे यावेळी अजित पाटील कव्हेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. #CMOMaharashtra #abhimanyupawar #sambhajinagarkar #bavnkule #pankajmunde1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- Post by Nanded_71
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4