महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षा *बबिता पाटील (वास्तव्य..कुवेत देश)यांचे महाविद्यालयात प्रेरणादायी व्याख्यान संपन्न कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क येथील मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे भुदरगड तालुक्यातील गंगापूर या डोंगराळ ग्रामीण भागात जन्मलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कुवेतसारख्या परदेशात महाराष्ट्राच्या संस्कृतीची पताका अभिमानाने फडकविणाऱ्या बबिता पाटील यांचे महाविद्यालयात प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या त्या कुवेत महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समितीच्या २०२६ च्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. बबिता पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थिनी, पालक तसेच समाजातील विविध घटकांना आपल्या जीवनातील अनुभव, प्रसंग आणि विविध दाखल्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातून आलेल्या व्यक्तीने जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाच्या बळावर परदेशातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, हे त्यांनी आपल्या जीवनप्रवासातून स्पष्ट केले. कुवेतमध्ये वास्तव्य करत असतानाही भारतीय संस्कृती, मराठी परंपरा, सण-उत्सव आणि संस्कारांचे जतन व संवर्धन कशा पद्धतीने केले जाते, याविषयी त्यांनी विद्यार्थिनींना माहिती दिली. परदेशात राहूनही आपल्या मातृभूमीशी आणि संस्कृतीशी असलेली नाळ कायम ठेवूया. युद्धजन्य परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी केलेले सहकार्य करताना संकटाच्या काळात माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व त्यांच्या अनुभवातून अधोरेखित झाले. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहावीत, शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असा प्रेरणादायी संदेश बबिता पाटील यांनी मुलींना दिला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी बबिता पाटील यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, महाराष्ट्रातील डोंगराळ भागात जन्मलेली व्यक्ती आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कुवेतसारख्या देशात यशस्वीपणे आपले नाव कोरते, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आजच्या विद्यार्थ्यांसमोरही देशाच्या सीमा ओलांडून काम करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षण, कौशल्य, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर या संधींचा लाभ घेत जगाच्या कोणत्याही भागात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्या प्रा. वनिता खडके यांनी पाहुण्यांचा परिचय प्रा भाऊसाहेब धराडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुषमा पाटील यांनी तर आभार प्रा. अयोध्या धुमाळ यांनी मानले. प्रमुख अतिथी बबिता पाटील यांचे महाविद्यालयाच्या वतीने सडा-रांगोळी काढून पारंपरिक पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बबिता पाटील यांची पुतणी ऋतुजा पाटील,प्रा बी पी माळवे,प्रा दिपा लोहार,प्रा प्रमिला मळगे, डॉ संतोष माने,प्रा संजय कुंभार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

- विषय फक्त असा आहे की बालाजी चौक शहापूर रोड गायबान पंपाजवळ जे रस्त्याचे खोदकाम चालू होते त्याच्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्यात प्रॉब्लेम होत आहे इचलकरंजी बालाजी चौक शहापूर रोड गायबान पेट्रोल पंप जवळ चार दिवस झाले रस्त्याचे खोदकाम चालू आहे त्या खोदकामासाठी रस्त्यात रस्त्याला येण्या-जाण्यासाठी जनतेला अडथळा होतो फक्त म्हणणं एवढंच आहे की जनतेचा प्रश्न मिटवायला पाहिजे प्रशासनाची लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे.1
- राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न! 🚩 वर्धापन दिन सोहळा २०२६! 🚩 राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य आयोजित २३ वा वर्धापन दिन सोहळा पुणे येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती! 🔹 दिनांक: शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ 🔹 वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता 🔹 स्थळ: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (महात्मा फुले वाडा जवळ), पुणे. चला, एकत्र येऊया आणि पक्षाच्या विचारसरणीला अधिक बळ देऊया! तुमच्या उपस्थितीची आणि शुभेच्छांची आम्हाला प्रतीक्षा राहील. राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्य1
- पेणमध्ये संभाजी महाराजांच्या लो-पॉली शिल्पावरून संताप; अभियंत्याच्या निलंबनाची मागणी1
- भोर शहरातील नागोबा आळी येथे मध्यरात्री वाहनातून पेट्रोल चोरी ;घटना सिसिटीव्हीत कैद विक्रम शिंदे /भोर दि. 26 भोर शहरात दुचाकीमधून मध्यरात्री पेट्रोल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून चोरटे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. शहरातील नागोबा आळी येतील घटना समोर आली आहे.1
- बारामती तालुक्यातील खांडज गावामध्ये बिबट्याचा वावर असल्याने वन विभागा विरुद्ध प्रशासकीय भवन समोर आंदोलन1
- अग्निसुरक्षेची यंत्रणा २४ तास सज्ज; ICU-SNCU मात्र अजूनही कागदावर..! मावळ, पुणे : अमरावती रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेनंतर मावळच्या वडगाव उपजिल्हा रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा आढावा समोर आला आहे. रुग्णालयात स्मोक डिटेक्टर, ऑटोमेटेड स्प्रिंकलर्स, फायर एक्स्टिंग्विशर आणि सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा राखीव साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टर रोहित काळे यांनी दिली.सध्या रुग्णालयात ५० बेड आणि ट्रॉमा केअर सेंटरचे २० बेड, अशी एकूण ७० बेडची क्षमता आहे. मात्र अतिगंभीर रुग्णांसाठी ICU आणि नवजात बालकांसाठी SNCU सुविधा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.या दोन्ही सुविधांना तात्पुरती मान्यता मिळाली असून काम सुरू आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा सज्ज असल्याचा दावा होत असला, तरी ICU आणि SNCU कधी कार्यान्वित होणार, याकडे आता मावळकरांचे लक्ष लागले आहे... : डॉक्टर रोहित काळे #Maval #Vadgaon #SubDistrictHospital #FireSafety #HospitalSafety #ICU #SNCU #Healthcare #PuneNews #MaharashtraNews #FireSafetyAudit #TheNayakNews1
- पुण्यामध्ये सध्या तात्या विंचू गोरिला यांचे क्रेज पाहायला मिळत आहे1
- पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे : पाषाण रोडवरील सुतारवाडी परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर एक कार अडकल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच वाहन अडकल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम योग्य पद्धतीने करण्यात आले आहे का, तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षितपणे खुला करण्यात आला होता का, याबाबत नागरिकांकडून चर्चा सुरू आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची पाहणी करून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1