logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हल्ल्यानंतर लपून बसलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात..... जामखेड अहिल्या नगर (दि. १८ फेब्रुवारी २०२६): एका नर्तिकेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला जामखेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने भूम (जि. धाराशिव) येथून अटक केली आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडित नर्तिकेने जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड; सध्या रा. मिलिंदनगर, जामखेड) याने फिर्यादीला फोन का उचलत नाहीस व नंबर ब्लॉक का केला, या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या दोन्ही हातांवर तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. ६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५२, ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी भूम बसस्थानक परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिस पथकाने तातडीने तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. रात्री सुमारे ९ वाजता आरोपी संशयास्पदरीत्या एका झाडाखाली लपून उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि जाधव मॅडम, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, नितीन शिंदे व राहुल गुंडू यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

2 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer Nagar, Ahmednagar•
2 hrs ago
5540be87-080a-430d-9da4-06e6059dd0a6

हल्ल्यानंतर लपून बसलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात..... जामखेड अहिल्या नगर (दि. १८ फेब्रुवारी २०२६): एका नर्तिकेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला जामखेड पोलिसांनी मोठ्या शिताफीने भूम (जि. धाराशिव) येथून अटक केली आहे. दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पीडित नर्तिकेने जामखेड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार आरोपी राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव, ता. गेवराई, जि. बीड; सध्या रा. मिलिंदनगर, जामखेड) याने फिर्यादीला फोन का उचलत नाहीस व नंबर ब्लॉक का केला, या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या दोन्ही हातांवर तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी गुन्हा रजि. नं. ६५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५२, ३५१(२) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी घटनेनंतर फरार झाला होता. दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी भूम बसस्थानक परिसरात येणार असल्याचे समजताच पोलिस पथकाने तातडीने तेथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. रात्री सुमारे ९ वाजता आरोपी संशयास्पदरीत्या एका झाडाखाली लपून उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि जाधव मॅडम, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, आकाश शेवाळे, नितीन शिंदे व राहुल गुंडू यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    1
    झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता
अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. 
हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष
नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.
या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर,
आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.
    1
    रांजणगाव गणपती येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) कार्यालयात महापुरुषांचे फोटो भिंतीवर लावण्याऐवजी एका बॉक्समध्ये धुळखात पडले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित फोटोंचा व्हिडिओ काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यालयात महापुरुषांचे फोटो सन्मानाने प्रदर्शित करण्याऐवजी ते बॉक्समध्ये ठेवून दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.महापुरुषांविषयी आदर राखणे ही प्रत्येक शासकीय कार्यालयाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे फोटो धुळखात टाकणे ही गंभीर बाब आहे, असे त्यांनी म्हटले.रांजणगाव औद्योगिक वसाहत ही राज्यातील महत्त्वाची आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते.येथे विविध नामांकित उद्योग कार्यरत आहेत. अशा प्रतिष्ठित औद्योगिक क्षेत्रातील कार्यालयातच महापुरुषांच्या प्रतिमांकडे दुर्लक्ष होत असल्याने  सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच महापुरुषांचे फोटो तात्काळ सन्मानपूर्वक कार्यालयात लावावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी प्रशासनाशी संपर्क साधला असता यावरती आम्हाला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नाही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा लागेल असे सांगितले.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    1 hr ago
  • Post by AMINIYA COURIER
    1
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by शहादेव काशिनाथ वैद्य
    3
    Post by शहादेव काशिनाथ वैद्य
    user_शहादेव काशिनाथ वैद्य
    शहादेव काशिनाथ वैद्य
    शेवगाव, अहमदनगर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
    1
    मुले चोरणारी टोळी डोंगरगाव मध्ये, सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे मुले चोरणारे टोळीचा परदापाष करण्यात आला आहे, डोंगरगाव गावामध्ये दोन दिवसापासून मुले चोरणारी टोळीची अफावा वाऱ्यासारखी पसरत होती 
अशातच एका संशयित महिलांना गावकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    1
    भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड! ​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार.... शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ​निवडणूक प्रक्रिया व घोषणा ​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. ​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा ​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. ​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे ​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू." ​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ ​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. ​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    4
    येवला मर्चंट्स बँकेच्या चेअरमनपदी महेश भांडगे, तर व्हाईस चेअरमनपदी सुभाष गांगुर्डे यांची बिनविरोध निवड!
​बँकेच्या प्रगतीसाठी आणि पारदर्शक कारभारासाठी कटिबद्ध : नूतन चेअरमन महेश भांडगे यांचा निर्धार....
शहरातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या 'दि येवला मर्चंट्स को-ऑप बँक लि.' च्या रिक्त पदांसाठी झालेली निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पडली. यामध्ये महेश (पप्पू) शांतीलाल भांडगे यांची चेअरमनपदी, तर सुभाष भाऊसाहेब गांगुर्डे यांची व्हाईस चेअरमनपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
​निवडणूक प्रक्रिया व घोषणा
​बँकेच्या मुख्य कार्यालयात सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
​मान्यवरांकडून सत्कार व शुभेच्छा
​नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होताच शहराच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये मनीष काबरा, शैलेश देसाई, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, मारुती पवार, यती भाई गुजराथी, डॉ. पटेल, रवी दाणेज, शांतीलाल भांडगे, मुकुंद वडे, राजेंद्र चिंगी, संतोष खैरनार, विनोद कोकणे यांच्यासह एस.एम.व्ही. ग्रुपच्या सदस्यांनी पुष्पहार घालून नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले.
​विश्वास सार्थ ठरू - महेश भांडगे
​निवडीनंतर बोलताना नूतन चेअरमन महेश भांडगे म्हणाले की, "बँकेच्या सर्व ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवून आणि संपूर्ण संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी व पारदर्शक कारभारासाठी आम्ही कटिबद्ध राहू."
​उपस्थित मान्यवर व संचालक मंडळ
​यावेळी बँकेचे संचालक पुजा काबरा, सारीका दिवटे, विकर्णसिंग (बालुशेठ) परदेशी, सोनल पटणी, सुहास भांबारे, महेश्वर तगारे, चंद्रकांत कासार, छाया देसाई, सोनल राजपुत, प्रज्वल पटेल, नितीन काबरा, प्रमोद (पप्पू) सस्कर, राहुल गुजराथी यांच्यासह क्षत्रिय समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
​- रिपोर्ट: सचिन वखारे, येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे
    1
    पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवाची कशी तयारी सुरू आहे त्यासोबतच शिवनेरी महोत्सवात वेगवेगळे रांगडे खेळ यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे शासनाने याकरिता भरीव असा निधी दिलेला आहे एकूणच शिवभक्तांचा उत्साह यामुळे वाढलेला दिसून येत आहे राज्यभरामधून लाखो शिवभक्त हे शिवजयंतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे यासंदर्भात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माहिती दिली आहे
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.