logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदगावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रदीप भोगावार यांची फेरनिवड नांदगावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रदीप भोगावार यांची फेरनिवड मुल तालुका | विजय जाधव, नांदगाव प्रतिनिधी मुल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नांदगाव येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष तथा पद्मशाली समाजाचे नेते आणि समाजसेवक प्रदीप भोगावार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रारंभी प्रदीप भोगावार, याराना कडवे, कल्पना तुरकीवार आणि संदीप उमक यांनी आपली नावे नोंदविली होती. मात्र, निवडणुकीच्या ऐनवेळी कल्पना तुरकीवार आणि संदीप उमक यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अध्यक्षपदासाठी प्रदीप भोगावार आणि याराना कडवे यांच्यात थेट लढत झाली. ग्रामसभा सदस्यांमध्ये झालेल्या मतदानात विद्यमान अध्यक्ष प्रदीप भोगावार यांच्या बाजूने स्पष्ट कौल मिळाला. प्रदीप भोगावार यांना १२० मते, तर याराना कडवे यांना ४८ मते मिळाली. त्यामुळे तब्बल ७२ मतांच्या फरकाने प्रदीप भोगावार विजयी झाले. त्यांच्या फेरनिवडीमुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा प्रशासक कुमारी हिमानी वाकुडकर होत्या. त्यांनी ग्रामसभेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले. यावेळी गावातील विविध शासकीय योजना व विषयांची माहिती ग्रामसभा सदस्यांना देण्यात आली. तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या संभाव्य यादीचे वाचन करण्यात आले. गावातील अतिक्रमण, नालीसफाई, स्वच्छता तसेच इतर स्थानिक प्रश्नांवरही ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी विविध समस्या आणि सूचना मांडल्या. यावेळी माजी सरपंच प्रशांत बांबोडे, माजी उपसरपंच सागर देऊरकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसेच ग्रामसभा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदगाव ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रदीप भोगावार यांच्या फेरनिवडीमुळे गावातील तंटे सामोपचाराने सोडविणे, गावात शांतता व सलोखा कायम ठेवणे आणि सामाजिक एकोपा वाढविण्याच्या समितीच्या कार्याला पुढे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

2 hrs ago
user_Vainganga News Live Network
Vainganga News Live Network
Press advisory पोंभुर्णा, चंद्रपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
55ad290a-3131-4215-a656-8debc4a3f5ea

नांदगावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रदीप भोगावार यांची फेरनिवड नांदगावच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रदीप भोगावार यांची फेरनिवड मुल तालुका | विजय जाधव, नांदगाव प्रतिनिधी मुल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या नांदगाव येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष तथा पद्मशाली समाजाचे नेते आणि समाजसेवक प्रदीप भोगावार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली. दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तहकूब ग्रामसभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रारंभी प्रदीप भोगावार, याराना कडवे, कल्पना तुरकीवार आणि संदीप उमक यांनी आपली नावे नोंदविली होती. मात्र, निवडणुकीच्या ऐनवेळी कल्पना तुरकीवार आणि संदीप उमक यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने अध्यक्षपदासाठी प्रदीप भोगावार आणि याराना कडवे यांच्यात थेट लढत झाली. ग्रामसभा सदस्यांमध्ये झालेल्या मतदानात विद्यमान अध्यक्ष प्रदीप भोगावार यांच्या बाजूने स्पष्ट कौल मिळाला. प्रदीप भोगावार यांना १२० मते, तर याराना कडवे यांना ४८ मते मिळाली. त्यामुळे तब्बल ७२ मतांच्या फरकाने प्रदीप भोगावार विजयी झाले. त्यांच्या फेरनिवडीमुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा प्रशासक कुमारी हिमानी वाकुडकर होत्या. त्यांनी ग्रामसभेचे कामकाज सुरळीतपणे पार पाडले. यावेळी गावातील विविध शासकीय योजना व विषयांची माहिती ग्रामसभा सदस्यांना देण्यात आली. तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या संभाव्य यादीचे वाचन करण्यात आले. गावातील अतिक्रमण, नालीसफाई, स्वच्छता तसेच इतर स्थानिक प्रश्नांवरही ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी विविध समस्या आणि सूचना मांडल्या. यावेळी माजी सरपंच प्रशांत बांबोडे, माजी उपसरपंच सागर देऊरकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तसेच ग्रामसभा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदगाव ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रदीप भोगावार यांच्या फेरनिवडीमुळे गावातील तंटे सामोपचाराने सोडविणे, गावात शांतता व सलोखा कायम ठेवणे आणि सामाजिक एकोपा वाढविण्याच्या समितीच्या कार्याला पुढे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गडचांदुरात पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरी, सीसीटीव्ही मध्ये कैद झाला चोरटा चंद्रपूर - गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असतानाच चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली तब्बल १ लाख २ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री ते २४ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास घडली. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील तीन कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने खिडकीतून कॅबिनमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, चोरटा कॅबिनमध्ये शिरून रोकड घेऊन पसार होत असताना तिथे झोपलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी एकालाही जाग आली नाही. दरम्यान, सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून, फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले असून, फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे गडचांदूर शहरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अशा घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    गडचांदुरात पेट्रोल पंपावर मध्यरात्री चोरी, सीसीटीव्ही मध्ये कैद झाला चोरटा
चंद्रपूर - गडचांदूर शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
पेट्रोल पंपावरील कर्मचारी कॅबिनमध्ये झोपलेले असतानाच चोरट्याने खिडकीतून आत प्रवेश केला आणि ड्रॉवरमध्ये ठेवलेली तब्बल १ लाख २ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
ही घटना २३ ऑगस्टच्या रात्री ते २४ ऑगस्टच्या पहाटेच्या सुमारास घडली. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर पेट्रोल पंपावरील तीन कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने खिडकीतून कॅबिनमध्ये प्रवेश केला.
विशेष म्हणजे, चोरटा कॅबिनमध्ये शिरून रोकड घेऊन पसार होत असताना तिथे झोपलेल्या तीन कर्मचाऱ्यांपैकी एकालाही जाग आली नाही.
दरम्यान, सकाळी चोरीचा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी गडचांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज तपासले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करणारा संशयित स्पष्टपणे कैद झाला असून, फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले असून, फरार आरोपीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
या धाडसी चोरीमुळे गडचांदूर शहरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी अशा घटनांना आळा घालण्यासाठी शहरातील पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_News34
    News34
    Media house चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली कोरपणा प्रतिनिधी : कोरपणा तहसील कार्यालयासमोर अन्यायाच्या विरोधात शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मौजा कोडशी खुर्द येथील गट क्रमांक ५८ मधील जमिनीच्या सीमावादासंदर्भात बोरडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासकीय भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोजणीनंतर तयार करण्यात आलेल्या नकाशातही जमिनीची हद्द स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, शासकीय मोजणी होऊनही संबंधित जमिनीवरील कथित कब्जा कायम असल्याचा आरोप नानाजी बोरडे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण सुरू असल्याने बोरडे यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनाकडे तहसील प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली
कोरपणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे तीन दिवसांपासून उपोषण; प्रकृती खालावली
कोरपणा प्रतिनिधी : कोरपणा तहसील कार्यालयासमोर अन्यायाच्या विरोधात शेतकरी नानाजी तुकाराम बोरडे यांचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
मौजा कोडशी खुर्द येथील गट क्रमांक ५८ मधील जमिनीच्या सीमावादासंदर्भात बोरडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. शासकीय भूमिअभिलेख कार्यालयाकडून जमिनीची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोजणीनंतर तयार करण्यात आलेल्या नकाशातही जमिनीची हद्द स्पष्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, शासकीय मोजणी होऊनही संबंधित जमिनीवरील कथित कब्जा कायम असल्याचा आरोप नानाजी बोरडे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, तीन दिवसांपासून अन्नत्याग करून उपोषण सुरू असल्याने बोरडे यांची प्रकृती खालावली आहे. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची दखल घेऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
या आंदोलनाकडे तहसील प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Manoj gore
    Manoj gore
    कोरपना, चंद्रपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड भिवापुर- (प्रतिनिधी ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे, सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचिवपदी राजेश जांभुळे यांची निवड
भिवापुर- (प्रतिनिधी )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे,  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे,  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत,  सदस्य - शरद मिरे,  अमर मोकाशी, जितेंद्र धोटे,  राम वाघमारे,  हर्षल राऊत,  निशा जांभुळे,
सुनील मैदीले तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_Nisha Jambhule
    Nisha Jambhule
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • गोंदिया - अर्जुनी मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन; पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन गोंदिया - अर्जुनी मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन; पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे. या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे. संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी. व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते : जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे तालुका सचिव – सुरेश जीभकाटे तालुका संघटक – चेतन समरित तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
    3
    गोंदिया - अर्जुनी मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन; पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
गोंदिया - अर्जुनी मोरगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन; पत्रकारावरील कथित हल्ल्यामुळे संताप, दोषींवर कठोर कारवाईची मागणी,धीरज कसारे प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी; गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अर्जुनी मोरगाव - पत्रकारांची सुरक्षा आणि निर्भीड पत्रकारितेच्या अधिकारासाठी गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी पत्रकार धीरज कसारे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. कारंजा, जिल्हा वर्धा येथील दैनिक महासागरचे प्रतिनिधी पत्रकार धीरज कसारे यांच्यासोबत कथित मारहाण, धमकी तसेच दबाव आणण्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा निषेध करत संघटनेने दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पत्रकार धीरज कसारे यांनी कारंजा तालुका परिसरातील भेसळखोरी आणि नागरिकांच्या जीविताशी कथित खेळ केला जात असल्यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर संबंधितांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे तसेच पत्रकाराला कथितरीत्या धमकी देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.
या प्रकरणी अर्जुनी मोरगाव तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कमिटी आणि जिल्हा कमिटीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात आरोप करण्यात आला आहे की, पोलीस ठाण्याच्या परिसरातच पत्रकार कसारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नव्हे, तर त्यांना कथितरीत्या जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. एखाद्या पत्रकाराने वृत्त प्रकाशित केल्यामुळे पोलीस ठाण्यासारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील परिसरातच धमकी किंवा दबावाला सामोरे जावे लागणे, ही स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेसाठी गंभीर चिंतेची बाब आहे.
या घटनेबाबत गोंदिया जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने निवेदन सादर केले आहे. हे निवेदन गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
संघटनेने मागणी केली आहे की, या प्रकरणातील संबंधित आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेची सत्यता समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पत्रकार धीरज कसारे यांना आवश्यक सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
व्हॉईस ऑफ मीडियाचे स्पष्ट म्हणणे आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा प्रहरी आहे. जनहिताचे प्रश्न समाजासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना धमकी, दबाव अथवा हिंसाचाराला सामोरे जावे लागणे, हे लोकशाही व्यवस्थेसाठी गंभीर आव्हान आहे. त्यामुळे पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि अशा प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
आता या निवेदनानंतर प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते आणि आरोपांच्या चौकशीत कोणती तथ्ये समोर येतात, याकडे पत्रकारिता क्षेत्रासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा कमिटी / अर्जुनी मोरगाव तालुका कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते :
जिल्हाध्यक्ष – रामलाल शहारे
जिल्हा सचिव – अरुण वाय. बन्नाटे
जिल्हा उपाध्यक्ष – सूर्यभान ठलाल
जिल्हा ग्रामीण अध्यक्ष – दिगंबर नंदेश्वर
अर्जुनी मोरगाव तालुका अध्यक्ष – बिंबिसार शहारे
तालुका उपाध्यक्ष – गुनाजी शहारे
तालुका सचिव – सुरेश जीभकाटे
तालुका संघटक – चेतन समरित
तालुका कोषाध्यक्ष – प्रशांत ऊके
सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
    user_CHETAN SAMRIT
    CHETAN SAMRIT
    Social worker अर्जुनी मोरगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    16 min ago
  • Fatty Liver? Best & Worst Foods You Need to Know ! 🚨🔥 In this video, Dr Meher Abbas reveals which everyday foods may be better choices for fatty liver—and which ones you may want to limit. From fruits and vegetables to nuts, seeds, flour and one popular drink, some of the answers may surprise you. Watch till the end if you have fatty liver, high cholesterol, belly fat, insulin resistance or metabolic health concerns. ************************ For Online Consultation: For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays) ************************** For Collaboration & Business Enquiries : What's ap:91-9125734374 ———————————————————————————— IMPORTANT DISCLAIMER - The information in the Video Content posted on the Nutexy YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel. Keywords : #DrMeherAbbas #NAFLD #FattyLiver #LiverFriendlyFoods #BestFruitInFattyLiver #BestVegetableInFattyLiver #BestNutInFattyLiver #BestSeedInFattyLiver #BlackCofeeInFattyLiver @TopFan
    1
    Fatty Liver? Best & Worst Foods You Need to Know ! 🚨🔥
In this video, Dr Meher Abbas reveals which everyday foods may be better choices for fatty liver—and which ones you may want to limit. From fruits and vegetables to nuts, seeds, flour and one popular drink, some of the answers may surprise you.

Watch till the end if you have fatty liver, high cholesterol, belly fat, insulin resistance or metabolic health concerns.
************************
For Online Consultation: 
For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays)
**************************
For Collaboration & Business Enquiries : What's ap:91-9125734374
————————————————————————————
IMPORTANT DISCLAIMER - 
The information in the Video Content posted on the Nutexy YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. 

The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. 
Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel.



Keywords :
#DrMeherAbbas
#NAFLD
#FattyLiver
#LiverFriendlyFoods
#BestFruitInFattyLiver
#BestVegetableInFattyLiver
#BestNutInFattyLiver
#BestSeedInFattyLiver
#BlackCofeeInFattyLiver




@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    3 hrs ago
  • पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    1
    पिपंळगाव मा येथील वार्ड 3 मध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय गंभीर अवस्था 
पिपंळगाव मा येथील वार्ड न 3 मध्ये नागरिकांना येण्या ज्याण्याचा रस्था अतिशय गंभीर अवस्थेत असल्या मुळे नागरिक अतिशय संस्तप्त झाले तरी त्यांना लवकरात लवकर ग्रामपंचायत ने जाण्या योग्य रस्ता करून द्यावा गावा मध्ये अनेक विकास कामा करिता दरवर्षी निधी येतो तर तो कुठे खर्च केला जातो असे आवश्यक असलेले काम जर होत नसेल
    user_Naresh prabhakar harne
    Naresh prabhakar harne
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे shuru ॲप (उमरेड ) अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष  सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची  अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    1
    भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी पंढरी हिवसे तर सचीव पदी राजेश जांभुळे
shuru ॲप (उमरेड )
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष 
सुभाष वराडे यांच्या सुचनेनुसार भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे नुकतेच
गठण करण्यात आले. यामध्ये पंढरी हिवसे ( दै.नवभारत )यांची 
अध्यक्षपदी तर राजेश जांभुळे दै.महासागर, दै. तरुणभारत )यांची सचीव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाशी संलग्न भिवापूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद
मिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच घेण्यात आलेल्या
सभेत साधक बाधक चर्चा करुन खालील प्रमाणे नवीन कार्यकारीणी सर्वानुमते गठीत करण्यात आली.
अध्यक्ष - पंढर हिवसे, उपाध्यक्ष - समीर पडोळे पाहमी चिचाळा ( लोकमत ),  सचीव- राजेश जांभुळे,   सहसचीव- नरेंद्र ढोणे, (पुण्यनगरी ) कोषाध्यक्ष गोकुल वैरागडे ( सकाळ ) नांद  जिल्हा प्रतिनिधी - प्रदीप  राऊत ( नवराष्ट्र, द हितवाद )  सदस्य - शरद मिरे, (लोकमत ) अमर मोकाशी (सकाळ , लोकशाही वार्ता), जितेंद्र धोटे बेसूर ( लोकमत ) , राम वाघमारे (नवराष्ट्र ) नांद  ,हर्षल राऊत, ( दै.राष्ट्रबाण )  निशा जांभुळे, ( साप्ताहीक संघर्ष ज्योती, युवाराष्ट्र दर्शन ) भिवापूर
सुनील मैदीले ( साप्ताहिक भिवापूरी मिरची ) तर मार्गदर्शक म्हणून जोगेंद्र सरदारे, सदाशिव नान्ने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* ​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. ​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. ​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. ​#SalwaCrime ​#KuhiPolice ​#SuperstitionNews ​#MaharashtraNews ​#NagpurNews ​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): ​#अंधश्रद्धा ​#साळवा ​#कुही ​#अघोरीपूजा ​#भानामती ​#स्मशानभूमी ​#महाराष्ट्रबातम्या ​#जादूटोणाविरोधीकायदा ​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): ​#BlackMagicNews ​#StopSuperstition ​#CrimeUpdate ​#PoliceInvestigation ​#LocalNews
    1
    साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू*
*साळवा*
​ स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
​घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य
घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले.
​कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू
नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
​विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
*प्रतिक्रीया*
कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये.
-राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही.
​#SalwaCrime
​#KuhiPolice
​#SuperstitionNews
​#MaharashtraNews
​#NagpurNews
​विषयानुरूप हॅशटॅग (मराठी):
​#अंधश्रद्धा
​#साळवा
​#कुही
​#अघोरीपूजा
​#भानामती
​#स्मशानभूमी
​#महाराष्ट्रबातम्या
​#जादूटोणाविरोधीकायदा
​विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी):
​#BlackMagicNews
​#StopSuperstition
​#CrimeUpdate
​#PoliceInvestigation
​#LocalNews
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Local News Reporter कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.