कुही तालुक्यातील चिखलाबोडी येथे वनव्यामुळे आग, लाखो चे नुकसान *कुही तालुक्यातील चिखलाबोडी येथे वनव्यामुळे शेतशिवारात भीषण आग*; *शेतकऱ्याचे २.८७ लाखांचे नुकसान* *एका गंभीर जखमी बैलासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक; मदतीची आर्त हाक* कुही- कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कल परिसरात मौजाः चिखलाबोडी शिवारात १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या वनव्याने रौद्ररूप धारण केल्याने शेतातील गोठा आणि झोपडी जळून खाक झाली. या आगीत शेतकरी ईश्वर संपतजी गजभिये,यांचे सुमारे २ लाख ८७ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, एक बैल ६० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिखलाबोडी प.ह.नं. ५६, गट क्र. १८/१ मधील शेतात ईश्वर गजभिये यांचा बैलाचा गोठा व शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी झोपडी आहे. दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास अचानक वनव्याने या गोठ्याला विळखा घातला. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, झोपडीत ठेवलेले संपूर्ण साहित्य काही वेळातच जळून खाक झाले. या साहित्याचे झाले नुकसान: या भीषण आगीत १० क्विंटल कापूस, डिझेल इंजिन, पीव्हीसी पाईप, रासायनिक खते, कीटकनाशके, ६ बंडल केबल, २ इलेक्ट्रीक फवारे आणि नागर, वखर, डवरे यांसारखी महत्त्वाची शेती अवजारे जळाली आहेत. तसेच गोठ्यातील दोन बैलांपैकी एक बैल ६० टक्के जळाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. साळवा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबावर उपासमारीची वेळ: ईश्वर गजभिये यांचे कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि साठवलेला कापूस जळाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. "वनव्यामुळे माझ्या कष्टाचे पीक आणि संसार डोळ्यादेखत खाक झाला," अशी भावना पीडित शेतकऱ्याने व्यक्त केली. *प्रतिक्रीया* या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी तहसीलदार,व पोलीस स्टेशन कुही यांच्याकडे रीतसर अर्ज सादर केला आहे. आता शासन या गरीब शेतकऱ्याला किती लवकर मदत करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. *पिडीत शेतकरी ईश्वर गजभिये चिखलांबोडी*
कुही तालुक्यातील चिखलाबोडी येथे वनव्यामुळे आग, लाखो चे नुकसान *कुही तालुक्यातील चिखलाबोडी येथे वनव्यामुळे शेतशिवारात भीषण आग*; *शेतकऱ्याचे २.८७ लाखांचे नुकसान* *एका गंभीर जखमी बैलासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक; मदतीची आर्त हाक* कुही- कुही तालुक्यातील राजोला जिल्हा परिषद सर्कल परिसरात मौजाः चिखलाबोडी शिवारात १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या वनव्याने रौद्ररूप धारण केल्याने शेतातील गोठा आणि झोपडी जळून खाक झाली. या आगीत शेतकरी ईश्वर संपतजी गजभिये,यांचे सुमारे २ लाख ८७ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, एक बैल ६० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिखलाबोडी प.ह.नं. ५६, गट क्र. १८/१ मधील शेतात ईश्वर गजभिये यांचा बैलाचा गोठा व शेती उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी झोपडी आहे. दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास अचानक वनव्याने या गोठ्याला विळखा घातला. आगीची तीव्रता एवढी मोठी होती की, झोपडीत ठेवलेले संपूर्ण
साहित्य काही वेळातच जळून खाक झाले. या साहित्याचे झाले नुकसान: या भीषण आगीत १० क्विंटल कापूस, डिझेल इंजिन, पीव्हीसी पाईप, रासायनिक खते, कीटकनाशके, ६ बंडल केबल, २ इलेक्ट्रीक फवारे आणि नागर, वखर, डवरे यांसारखी महत्त्वाची शेती अवजारे जळाली आहेत. तसेच गोठ्यातील दोन बैलांपैकी एक बैल ६० टक्के जळाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. साळवा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कुटुंबावर उपासमारीची वेळ: ईश्वर गजभिये यांचे कुटुंब पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर शेतीची अवजारे, बी-बियाणे आणि साठवलेला कापूस जळाल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. "वनव्यामुळे माझ्या कष्टाचे पीक आणि संसार डोळ्यादेखत खाक झाला," अशी भावना पीडित शेतकऱ्याने व्यक्त केली. *प्रतिक्रीया* या घटनेचा पंचनामा करून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी तहसीलदार,व पोलीस स्टेशन कुही यांच्याकडे रीतसर अर्ज सादर केला आहे. आता शासन या गरीब शेतकऱ्याला किती लवकर मदत करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. *पिडीत शेतकरी ईश्वर गजभिये चिखलांबोडी*
- बकरी करते मिरचीची दंडीकट ! भिवापूर । उमरेड सध्या उन्हाळा सुरू आहे. अशातच वाळवणीचे पदार्थ वर्षभर पुरेल या बेताने नागरीकांची लगबग पहावयास मिळत आहे. अशातच तेलीपुरा येथील राजु अहिरकर यांच्या मिरची कांडप मध्ये त्यांच्या घरची एक बकरी मोठया सफाईने मिरची कटाई करीत असल्याचे दृश्य ये - जा करणाऱ्यास दिसत आहे. प्रथम दर्शनी ही बकरी मिरची खात आहे असे वाटते. परंतू ही बकरी मोठया चपळकतेने फक्त मिरचीची देट खाते व मिरची तशीच शाबुत असते. त्यामुळे परिसरात या बकरीच्या नवलाईची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर बकरी 3 वर्षाची असून मागील दोन वर्षापासून ही बकरी 3 ते 4 किलो मिरची चे देठ खुळत असल्याची माहिती राजु हरीभाऊ अहिरकर यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- Post by कु सुषमा डबराल1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- मुजफ्फरपुर जिले के अहियापुर थाना क्षेत्र स्थित जीरो माइल-दादर रोड पर डिलीवरी कंपनी फ्लिपकार्ट के कार्यालय में रविवार देर रात भी/षण चोरी की वार/दात सामने आई है #viralreels #viralvideos #BreakingNews #BiharPolice #bihar #Muzaffarpur1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1