logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांदेड येथील मुजीब भाई मित्र मंडळाच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ११ जुलै २०२६ रोजी मा. श्री. केशव जळबा सदावर्ते यांची अर्धापूर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळी त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आणि अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मुजीब भाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. सय्यद मुजीब भाई यांनी केशव जळबा सदावर्ते यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी अर्धापूर तालुक्यात मुजीब भाई मित्र मंडळ अधिक मजबूत करून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात मुख्य सल्लागार मा. प्रभू सावंत, जिल्हाध्यक्ष मा. गंगाधर वडणे, जिल्हा सचिव मा. शंकर सिंह ठाकुर, जिल्हा कार्याध्यक्ष मा. मारोती बा. शिकारे, मुख्य प्रवक्ता प्रा. अविनाश नाईक, सहसचिव रवींद्र सोनकांबळे (कल्हाळीकर) तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त अर्धापूर तालुका अध्यक्ष मा. केशव जळबा सदावर्ते यांनी मित्र मंडळाने दिलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, तालुक्यात सामाजिक सलोखा, जनजागृती, शिक्षण, आरोग्य आणि जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे कार्य करून मित्र मंडळाचे कार्य गावागावात पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अर्धापूर तालुक्यात मित्र मंडळाचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

1 hr ago
user_Mohammad Rafikh
Mohammad Rafikh
Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
1 hr ago
c8455bf0-ca0f-4047-9209-f3ecd56d2114

नांदेड येथील मुजीब भाई मित्र मंडळाच्या मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ११ जुलै २०२६ रोजी मा. श्री. केशव जळबा सदावर्ते यांची अर्धापूर तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळी त्यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आणि अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मुजीब भाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. सय्यद मुजीब भाई यांनी केशव जळबा सदावर्ते यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी अर्धापूर तालुक्यात मुजीब भाई मित्र मंडळ अधिक मजबूत करून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात मुख्य सल्लागार मा. प्रभू सावंत, जिल्हाध्यक्ष मा. गंगाधर वडणे, जिल्हा सचिव मा. शंकर सिंह ठाकुर, जिल्हा कार्याध्यक्ष मा. मारोती बा. शिकारे, मुख्य प्रवक्ता प्रा. अविनाश नाईक, सहसचिव रवींद्र सोनकांबळे (कल्हाळीकर) तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्षांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त अर्धापूर तालुका अध्यक्ष मा. केशव जळबा सदावर्ते यांनी मित्र मंडळाने दिलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, तालुक्यात सामाजिक सलोखा, जनजागृती, शिक्षण, आरोग्य आणि जनहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे कार्य करून मित्र मंडळाचे कार्य गावागावात पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अर्धापूर तालुक्यात मित्र मंडळाचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील रेणुका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले सरकारी डॉक्टर नीलेश बाष्ठेवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही, मात्र संबंधित डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील रेणुका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले सरकारी डॉक्टर नीलेश बाष्ठेवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही, मात्र संबंधित डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • महेश बिडगर मारहाण प्रकरणी परभणीच्या गंगाखेड शहरात सकल धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. महेश बिडगर यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सकल धनगर समाजाने एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला.
    1
    महेश बिडगर मारहाण प्रकरणी परभणीच्या गंगाखेड शहरात सकल धनगर समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. महेश बिडगर यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सकल धनगर समाजाने एकत्र येत हा मोर्चा आयोजित केला.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथे कुंडलवाडी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५७ हजार ८४० रुपये रोख रक्कम आणि सात मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या एकूण १२ जणांविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथे कुंडलवाडी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली आहे. १० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही धाड टाकली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी ५७ हजार ८४० रुपये रोख रक्कम आणि सात मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या एकूण १२ जणांविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_आपली बिलोली नगरी
    आपली बिलोली नगरी
    Social worker बिलोली, नांदेड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.
    1
    नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे परदेशी समितीची बैठक रद्द झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारचा जोरदार निषेध केला असून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हा एल्गार पुकारण्यात आला आहे.

या आंदोलनादरम्यान सभेने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफीवरील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात आणि परदेशी समितीची बैठक त्वरित घेण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना, "आमदारांनो, विधानभवनात शेतकऱ्यांसाठी आवाज उठा; अन्यथा शेतकरीच उत्तर देतील!" असा थेट आणि इशारावजा इशारा कॉ. अर्जुन आडे यांनी दिला आहे.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपले मतदान पुनर्निरिक्षण करून घेण्याचे आवाहन केले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी नागरिकांनी आपल्या भागातील बीएलओ (BLO) यांना पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती जिल्हाधिकारी महोदयांनी केली आहे.
    1
    यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपले मतदान पुनर्निरिक्षण करून घेण्याचे आवाहन केले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी नागरिकांनी आपल्या भागातील बीएलओ (BLO) यांना पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती जिल्हाधिकारी महोदयांनी केली आहे.
    user_Firoz Ahemad Noor khan
    Firoz Ahemad Noor khan
    उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भागवत एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या पुढाकारातून मेंढपाळांच्या मुलांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या नरसी नामदेव येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी सर्व मुलांनी अत्यंत भक्तिभावाने संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता. वैजनाथ पावडे यांनी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मेंढपाळांच्या मुलांसाठी स्वतःच्या निवासस्थानी राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची निवासी सोय उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत ते मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना धार्मिक व सांस्कृतिक संस्कार देण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. या उपक्रमामुळे मुलांमध्ये भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा सुंदर संगम घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. या उपक्रमाबद्दल बोलताना वैजनाथ पावडे म्हणाले की, मेंढपाळांच्या हातातील काठीऐवजी त्यांना पुस्तक आणि पेन देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे परिसरातून तसेच धनगर समाजातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.
    1
    भागवत एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या पुढाकारातून मेंढपाळांच्या मुलांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या नरसी नामदेव येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी सर्व मुलांनी अत्यंत भक्तिभावाने संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून येत होता.

वैजनाथ पावडे यांनी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मेंढपाळांच्या मुलांसाठी स्वतःच्या निवासस्थानी राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची निवासी सोय उपलब्ध करून दिली आहे. सामाजिक बांधिलकी जपत ते मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना धार्मिक व सांस्कृतिक संस्कार देण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. या उपक्रमामुळे मुलांमध्ये भक्ती, संस्कार आणि शिक्षणाचा सुंदर संगम घडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना वैजनाथ पावडे म्हणाले की, मेंढपाळांच्या हातातील काठीऐवजी त्यांना पुस्तक आणि पेन देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यांच्या या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचे परिसरातून तसेच धनगर समाजातून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    2
    नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर देगलूर नगर परिषदेचे काँग्रेस नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे मराठवाडा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा ठाणेकर यांच्या वतीने करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. भिमराव माळगे सर, रिपाइंचे युवा नांदेड जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. प्रकाश चंद्रकांत ठाणेकर, प्रा. अभिनंदन सिताफुले सर, बहुजन सेना तालुकाध्यक्ष रमेश भायेगावकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष किशोर आडेकर, भिमशक्ती सामाजिक संघटना तालुका उपाध्यक्ष भिमराव भुतनरे, मोहनराव भुताळे, आनंदा दिंडे आणि अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
    user_जयपाल चांदोबा दावनगीरकर
    जयपाल चांदोबा दावनगीरकर
    Social worker देगलूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नांदेडमध्ये बल्लारशाह–मुंबई नांदिग्राम एक्स्प्रेसच्या (गाडी क्र. 11002) फर्स्ट एसी डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करून सजावट केल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. ६ जुलै २०२६ रोजी जालना स्थानकावरून एका खासगी डेकोरेटरने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता रेल्वेच्या आरक्षित प्रथम वातानुकूलित कूपेमध्ये प्रवेश करून सजावट केली होती. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानण्यात आला असून, अशा डब्यांमध्ये केवळ अधिकृत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असतो. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने संबंधित तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला कर्तव्यातील निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे दोषींवर पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, जालना येथील अझहर शेख वाहेद डेकोरेटरविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात अनधिकृत प्रवेश, विनातिकीट प्रवास आणि रेल्वे परिसरात अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये खासगी व्यक्तींना प्रवेश करण्यास सक्त मनाई असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
    1
    नांदेडमध्ये बल्लारशाह–मुंबई नांदिग्राम एक्स्प्रेसच्या (गाडी क्र. 11002) फर्स्ट एसी डब्यात अनधिकृतपणे प्रवेश करून सजावट केल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. ६ जुलै २०२६ रोजी जालना स्थानकावरून एका खासगी डेकोरेटरने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता रेल्वेच्या आरक्षित प्रथम वातानुकूलित कूपेमध्ये प्रवेश करून सजावट केली होती. रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानण्यात आला असून, अशा डब्यांमध्ये केवळ अधिकृत प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश असतो.

या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने संबंधित तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला कर्तव्यातील निष्काळजीपणाबद्दल निलंबित केले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवालाच्या आधारे दोषींवर पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, जालना येथील अझहर शेख वाहेद डेकोरेटरविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात अनधिकृत प्रवेश, विनातिकीट प्रवास आणि रेल्वे परिसरात अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये खासगी व्यक्तींना प्रवेश करण्यास सक्त मनाई असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    उमरी, नांदेड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.