logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे यांच्या लॉजमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला रवींद्रचा मृतदेह लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात रवींद्रसोबत त्याच्या अल्पवयीन प्रेयसीनेही लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि अल्पवयीन प्रेयसीवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवरील एका लॉजमध्ये झालेल्या या घटनेत गिरड, ता. भडगाव येथील २५ वर्षीय रवींद्र मोरे याचा मृत्यू झाला, तर त्याची अल्पवयीन प्रेयसी दोरीचा फास तुटल्याने बचावली. रवींद्र मोरे याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात संबंधित लॉज चालकांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी पाचोरा शहरात तीव्र आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर, आंदोलकांनी थेट पाचोरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स हटवत आंदोलकांनी पोलीस ठाण्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे, जळगाव येथे शवविच्छेदन करून आणलेला रवींद्रचा मृतदेहही आंदोलकांनी पोलीस ठाण्यात आणल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते. नातेवाइकांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास आणि पंचनामा प्रक्रियेस झालेल्या विलंबाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेर, पोलिसांनी संबंधित लॉजचा मालक सूरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांना अटक केल्याची माहिती आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रवींद्र मोरे याचा महिन्याभरापूर्वीच साखरपुडा झाला असल्याने, दोघांनी गळफास का घेतला आणि रवींद्रच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून सर्व पैलूंचा तपास सुरू असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बाल सुधारगृहात रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

14 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
14 hrs ago
3547610a-feb8-45f9-8b2d-eb4037816a62

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे यांच्या लॉजमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला रवींद्रचा मृतदेह लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात रवींद्रसोबत त्याच्या अल्पवयीन प्रेयसीनेही लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि अल्पवयीन प्रेयसीवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवरील एका लॉजमध्ये झालेल्या या घटनेत गिरड, ता. भडगाव येथील २५ वर्षीय रवींद्र मोरे याचा मृत्यू झाला, तर त्याची अल्पवयीन प्रेयसी दोरीचा फास तुटल्याने बचावली. रवींद्र मोरे याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात संबंधित लॉज चालकांवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी पाचोरा शहरात तीव्र आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर, आंदोलकांनी थेट पाचोरा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड्स हटवत आंदोलकांनी पोलीस ठाण्यात प्रवेश केला. विशेष म्हणजे, जळगाव येथे शवविच्छेदन करून आणलेला रवींद्रचा मृतदेहही आंदोलकांनी पोलीस ठाण्यात आणल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले होते. नातेवाइकांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास आणि पंचनामा प्रक्रियेस झालेल्या विलंबाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अखेर, पोलिसांनी संबंधित लॉजचा मालक सूरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांना अटक केल्याची माहिती आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रवींद्र मोरे याचा महिन्याभरापूर्वीच साखरपुडा झाला असल्याने, दोघांनी गळफास का घेतला आणि रवींद्रच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून सर्व पैलूंचा तपास सुरू असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, संबंधित अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बाल सुधारगृहात रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जळगाव जिल्ह्यातील वाघ नगर, कोल्हे परिसर आणि जाणता राजा स्कूल परिसरात गेल्या १२ ते १३ दिवसांपासून पाणी आलेले नाही, ज्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. सध्या या भागात दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, पण नागरिकांची तीव्र मागणी आहे की, हा कालावधी कमी करून दर तीन दिवसांनी पाणी सोडावे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने आणि बोरिंगलाही पाणी नसल्याने, नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत, अन्यथा त्यांची नाराजी आणखी वाढेल असे म्हटले आहे.
    1
    जळगाव जिल्ह्यातील वाघ नगर, कोल्हे परिसर आणि जाणता राजा स्कूल परिसरात गेल्या १२ ते १३ दिवसांपासून पाणी आलेले नाही, ज्यामुळे नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. सध्या या भागात दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो, पण नागरिकांची तीव्र मागणी आहे की, हा कालावधी कमी करून दर तीन दिवसांनी पाणी सोडावे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने आणि बोरिंगलाही पाणी नसल्याने, नागरिकांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत, अन्यथा त्यांची नाराजी आणखी वाढेल असे म्हटले आहे.
    user_Akshay koli
    Akshay koli
    मुक्ताईनगर, जळगाव, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.
    1
    बनावट शिक्का प्रकरणामध्ये जाफ्राबाद पोलिसांना न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने तातडीने जामीन मंजूर केला, ज्यामुळे पोलिसांच्या कारवाईला एक मोठा झटका लागल्याचे दिसून येत आहे.
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे. या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तळपत्या उन्हात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भोकरदन तालुक्यातून तीव्र पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या विविध मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.

या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील मराठा सेवकांच्या वतीने पोलीस प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर प्रा. अंकुश जाधव, सतीष जाधव, विकास जाधव, अप्पासाहेब जाधव, विलास पवार, अंगद सहाने, परमेश्वर पालोदे, श्रीकृष्ण जाधव, प्रकाश जाधव, उमेश घोडके आदी मराठा सेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील मराठा समाजात असंतोषाची भावना निर्माण झाली असून, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    3 hrs ago
  • जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती. या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    1
    जालना येथील सिंधी बाजारमध्ये रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार वाजता शिवशक्ती-लहूशक्ती-भीमशक्ती अभियानाच्या वतीने मा. आमदार अमितजी गोरखे साहेबांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. तळपत्या ४२ डिग्री तापमानात 'जिगरबाज लहू सैनिकांनी' हा एल्गार पुकारला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलेल्या तरतुदीनुसार अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण व्हावे, या मागणीसाठी आमदार अमितजी गोरखे शासन दरबारी अभ्यासपूर्ण मांडणी करत असताना, काही समाजकंटक सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करून अपशब्द वापरत असल्याने त्यांच्या संरक्षणाची ही मागणी करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान, "आमदार अमित गोरखे आगे बढो-हम तुम्हारे साथ है", "आमदार अमित गोरखे से जो टकरायेगा वह मिट्टी मे मिल जायेगा", आणि "आरक्षण वर्गीकरण झालंच पाहीजे" या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्य समन्वयक रविकांत जगधने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी डॉ. मनोहर जाधव, छगन वाघमारे, देविदास जाधव, सचिन साने, बंडू निकाळजे, दत्ता घोडे, अशोक लोखंडे, प्रकाश काका साळवे, सतीष खंडागळे, नरेश जगधने, शाम खंदारे, सुधाकर तुपसौन्दर, सुदाम दाभाडे, अभिनेते अरुण गाढे, प्रदीप पडूळ, अनिल लोखंडे, रमेश कासार, राहुल गोफने, मनोज बॉबी, सोमेश कांबळे, विजय आठवले यांसह अनेक 'जिगरबाज लहू सैनिकांची' प्रमुख उपस्थिती होती.

या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण कडक उन्हात सुरू ठेवले आहे. त्यांनी मंडप सोडून, बाज वर बसून उपोषण सुरू केले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रियांश अमृत जूस हे अत्यंत 'पॉवरफुल' असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात, मित्रांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी रियांशच्या या 'पॉवर'चा अनुभव घ्यावा.
    1
    रियांश अमृत जूस हे अत्यंत 'पॉवरफुल' असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात, मित्रांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी रियांशच्या या 'पॉवर'चा अनुभव घ्यावा.
    user_Sagar Chimkar
    Sagar Chimkar
    Public Health Specialist नांदुरा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील 'सिर कटी लडकी' प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कारागृहातून बाहेर पडताच पिता-पुत्रांनी पोलिसांना मारहाणीच्या त्या बातमीपासून क्लीन चिट दिली आहे. या घडामोडीमुळे बुलढाणा पोलिसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारागृहाबाहेर आल्यानंतर वडिलांनी पोलिसांना निर्दोष ठरवत, त्यांच्यावरील मारहाणीचे आरोप फेटाळले.
    1
    जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील 'सिर कटी लडकी' प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात कारागृहातून बाहेर पडताच पिता-पुत्रांनी पोलिसांना मारहाणीच्या त्या बातमीपासून क्लीन चिट दिली आहे.

या घडामोडीमुळे बुलढाणा पोलिसांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. कारागृहाबाहेर आल्यानंतर वडिलांनी पोलिसांना निर्दोष ठरवत, त्यांच्यावरील मारहाणीचे आरोप फेटाळले.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी एक शिष्टमंडळ पोहोचले आहे.
    1
    मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी एक शिष्टमंडळ पोहोचले आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.