logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अबकड तहसीलदारांना निवेदन, सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

5 hrs ago
user_One day news
One day news
News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
5 hrs ago

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण अबकड तहसीलदारांना निवेदन, सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर
    3
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग....
भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत
ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती.
बाईट : आमदार संजय केणेकर
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
    1
    गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर
    user_अरबाज शेख. सावरगावकर
    अरबाज शेख. सावरगावकर
    Voice of people उंबेरखेडा तांडा•
    3 hrs ago
  • नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    1
    नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Jalna, Maharashtra•
    21 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात भीषण आग छत्रपती संभाजीनगरातील विमानतळ परिसरात आज बुधवारी भीषण आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
    1
    छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात भीषण आग
छत्रपती संभाजीनगरातील विमानतळ परिसरात आज बुधवारी भीषण आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 😯😯😯😯
    1
    😯😯😯😯
    user_Mushraf Tadvi
    Mushraf Tadvi
    Salesperson सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली. दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग : भर उन्हात महानगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा
छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कडक कारवाई केली. शहरातील सेवन हिल परिसरातील गजानन मंदिराजवळील मुख्य रस्त्यालगत झालेल्या अतिक्रमणांवर जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. 42 अंशांच्या कडक उन्हात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे परिसरात मोठी हालचाल पाहायला मिळाली.
दरम्यान, कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अचानक सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या या कठोर भूमिकेची शहरभर चर्चा सुरू आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • धुळे-भुसावळ मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात धुळे-भुसावळ मार्गावर मराठखेड्याजवळ एसटी बसचा आज बुधवारी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस तब्बल सुमारे ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रितपणे धावत राहिली. या दरम्यान बस रस्त्यावरील सुरक्षा कठड्याला जोरात धडकली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघातात सुमारे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने अपघात टाळता आला नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
    1
    धुळे-भुसावळ मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात
धुळे-भुसावळ मार्गावर मराठखेड्याजवळ एसटी बसचा आज बुधवारी भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस तब्बल सुमारे ३ किलोमीटरपर्यंत अनियंत्रितपणे धावत राहिली. या दरम्यान बस रस्त्यावरील सुरक्षा कठड्याला जोरात धडकली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी या अपघातात सुमारे १५ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताचे कारण प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. चालकाने बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने अपघात टाळता आला नाही. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.