केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या 'गेट' (ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग) परीक्षेमध्ये पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त) मधील तब्बल १७ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली असून, देशपातळीवर ६४९ वी सर्वोच्च रँक मिळवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओम राजू पाटील, सोहम चेतन कुलकर्णी, अनुष्का शहाजी घोडके, आदेश बाळासाहेब कोंढारे, वैष्णवी विलास मस्के, विवेक बंडू पवार, ओंकार बापुसो देशमुख, समर्थ महेश मोटे, आकाश नवनाथ चव्हाण, जय बाळासाहेब जाधवर, तुषार शंकर कर्डुले, भाग्यवान सुनील सायकर, संकेत रावसाहेब मोरे, श्रेयश दशरथ लोकरे, रणजीत कमलाकर धनवडे, आदेश दत्तात्रय देठे आणि रोहन राजेश ताटीपामल या १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र पेपरमध्ये यश मिळवले आहे. स्वेरीच्या सातत्यपूर्ण सराव सत्रांमुळे आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कठीण परिश्रमाला हे अभूतपूर्व यश मिळाले आहे. संस्थेमार्फत वर्षभर गेट, गव्हर्मेंट एक्झाम, कॅट यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षांच्या तयारीसाठी विशेष उपक्रम राबवले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांचे अॅप्टिट्यूड, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत प्रक्रियेची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे त्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध होतात. यापूर्वीही संस्थेचे अनेक विद्यार्थी 'गेट'मधील गुणांच्या आधारे देशातील नामांकित आयआयटी, आयआयएससी आणि एनआयटी यांसारख्या संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच, अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (पीएसयु) प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळवून संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी, विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, बी. फार्मसी, डिप्लोमा इंजिनिअरिंग, डी. फार्मसीचे प्राचार्य, उपप्राचार्या, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले की, प्रथम वर्षापासून घेतलेली नाईट स्टडी आणि आयोजित गेस्ट लेक्चर्सचा 'गेट' परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप फायदा झाला.

- कोकोमध्ये क्लासी वाइब्सचा अनुभव येतो. त्यात शांत स्वभाव असून, अथांग प्रेम दिसून येते.2
- गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.1
- आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त, उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या जन्मगाव चोंडी येथे जाऊन विनम्र अभिवादन केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. यावेळी कृषिमंत्री श्री दत्तात्र्य भरणे, श्री अक्षय शिंदे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कु. संध्या सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोककल्याणकारी राज्यकारभार, न्यायनिष्ठा आणि समाजहिताच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव करत, त्यांचे विचार आणि कार्याचा वारसा समाजाला कायम प्रेरणा देत राहील, अशी भावना व्यक्त केली.1
- कुरनूर येथे युवा नेते चेतन मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी युवा नेते चेतन मोरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नगरसेवक महेश इंगळे यांनी चेतन मोरे यांचा श्री स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना, चेतन मोरे यांनी त्यांच्या पुढील जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चेतन मोरे यांनी या सत्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळींकडून मिळालेल्या शुभेच्छा त्यांच्या जीवन प्रवासात नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, याचा त्यांना निश्चितच अभिमान आहे. तसेच, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते झालेला सत्कार आणि त्यातून लाभलेले स्वामींचे आशीर्वाद ही त्यांच्यासाठी सर्वात अमूल्य भेट असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट देऊन आनंद आणि उत्साह द्विगुणीत केल्याबद्दल चेतन मोरे यांनी नगरसेवक महेश इंगळे यांच्यासह उपस्थित सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे आभार मानले. या सोहळ्याला पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, रमेश शिंदे सर, समर्थ स्वामी, तुषार मोरे, पत्रकार सचिन पवार, बाळासाहेब एकबोटे, श्रीकांत मलवे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.1
- Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी जोरदार टीका केली आहे. काशीद यांनी म्हटले आहे की, जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली, तेव्हा लक्ष्मण हाके यांनी शेतातील ढेकळात उपोषण करणार असल्याचे सांगितले आणि आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर, ऍडव्होकेट बंडू काशीद यांनी हाके यांना आव्हान दिले आहे की, त्यांनी एक दिवस ढेकळात उपोषण करून दाखवावे.1
- राजस्थानमध्ये सध्या भीषण वाळूच्या वादळाचा कहर सुरू आहे, ज्यामुळे अनेक शहरे पूर्णपणे अंधारात बुडाली आहेत.1
- इचलकरंजीतील बहुचर्चित आयपीएल सट्टा रॅकेट प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला, ज्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या आयपीएल सट्टा प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाल्याचे श्रेय अॅड. रियाज बाणदार आणि अॅड. सचिन माने यांच्या दमदार युक्तिवादाला दिले जात आहे.1