नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा टीझर चर्चेत; दापुरी खुर्दचे संतोष भालेराव सहकलाकाराच्या भूमिकेत नागराज मंजुळेंच्या ‘खाशाबा’चा टीझर चर्चेत; दापुरी खुर्दचे संतोष भालेराव सहकलाकाराच्या भूमिकेत खाशाबा जाधव यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची रुपेरी पडद्यावर मांडणी; १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित होणार चित्रपट रिसोड : महाराष्ट्राचे सुपुत्र आणि महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातून चित्रपटाची भव्यता आणि कथानकाची प्राथमिक झलक समोर आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून, १ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात खाशाबा जाधव यांच्या जीवनातील संघर्ष, कुस्तीची पार्श्वभूमी आणि त्यांच्या ऐतिहासिक क्रीडा प्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. टीझरमध्ये लाल मातीतील कुस्तीचे प्रसंग, तत्कालीन काळाचे वातावरण तसेच खाशाबा जाधव यांच्या संघर्षाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात रिसोड तालुक्यातील दापुरी खुर्द येथील संतोष वामन भालेराव यांचा सहकलाकार म्हणून सहभाग आहे. ग्रामीण भागातून अभिनय क्षेत्रात प्रवास करणाऱ्या भालेराव यांना नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रमुख भूमिकेतील कलाकाराचे नाव अद्याप जाहीर नाही चित्रपटाच्या टीझरमध्ये विविध कलाकारांची झलक दिसत असली, तरी खाशाबा जाधव यांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या नावाचा अधिकृत खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेण्यात आला असून, महाराष्ट्रातील विविध भागांत ऑडिशन प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती आहे. या प्रक्रियेतून नवोदित कलाकाराची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात असून, त्याच्या नावाची अधिकृत घोषणा निर्मात्यांकडून करण्यात येणे अपेक्षित आहे. १९५२च्या ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक कामगिरी खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावून भारतीय क्रीडा इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश, त्यांचा संघर्ष आणि जिद्द हा ‘खाशाबा’ चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. दिग्गज कलाकारांचा सहभाग चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओजकडून करण्यात आली असून, संगीत अजय-अतुल यांचे आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी तसेच नागराज मंजुळे यांच्यासह अनेक कलाकार सहभागी आहेत. संतोष वामन भालेराव यांचाही सहकलाकार म्हणून सहभाग आहे. चार-पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेनंतर आता टीझर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्याने ‘खाशाबा’च्या प्रदर्शनाकडे क्रीडाप्रेमी आणि चित्रपट रसिकांचे लक्ष लागले आहे.

- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- सर्व समाज बांधवांना विनंती आहे की उद्या परभणी येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती महाराष्ट्रातील सर्व तमाम धनगर समाज बांधवांना कळकळीची विनंती आहे उद्या 17 सप्टेंबर या दिवशी परभणी येथे धनगर एसटी आरक्षण संदर्भामध्ये यलगार मोर्चाची नियोजन केले आहे तरी आपण सर्वांनी सकाळी ठीक दहा वाजता परभणी येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती1
- परभणी येथील मोर्चाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे -विष्णु भाऊ कु-हाडे धनगर समाजाला घटना दत्त stआरक्षण मिळावे यासाठी दि १७सप्टेबर रोजी होत असलेल्या परभणी येथील मोर्चाला सर्व धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी केले आहे1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1