रक्षाबंधनाच्या दिवशी कुडूस नाक्यावर वाहतूक कोंडी; लाडक्या बहिणींचा सवाल, “लाडका भाऊ कधी येणार?” कुडूस | प्रतिनिधी वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे शुक्रवारी, दि. २८ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सणानिमित्त कुडूस परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. कुडूस नाका हा वाडा तालुक्यातील महत्त्वाचा वाहतूक मार्ग असून या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच सध्या ईगल इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारामार्फत रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय कुडूस नाका परिसरातील बेशिस्त वाहतूक हीदेखील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. काही वाहनचालक तसेच रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करता विरुद्ध दिशेने वाहने चालविली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कुडूस नाक्यावरील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या बांधकामांमुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. कुडूस नाक्यावर उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र अद्याप या मागणीवर ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींची गैरसोय रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या अनेक बहिणींना कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला. तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागल्याने काही महिलांनी संताप व्यक्त केला. “लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडविण्याची चर्चा केली जाते; मात्र कुडूस नाक्यावर आम्हाला तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकावे लागत आहे. लाडक्या बहिणींना या ट्रॅफिकमधून बाहेर काढण्यासाठी लाडका भाऊ कधी येणार?” असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. कुडूस नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न केवळ सणासुदीपुरता मर्यादित नसून दररोज नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुरू असलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण आणणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणे आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून उड्डाणपुलाबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग आणि संबंधित प्रशासन कुडूस नाक्यावरील या गंभीर वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

- जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News जश्ने ईद ए मिलादुन्नबी 2026 मुंब्रा Mumbai Bulletin News1
- मेरठ में सपा का प्रदर्शन, योगी का पोस्टर जलाने की कोशिश मेरठ कमिश्नरी पर सपा कार्यकर्ताओं ने योगी आदित्यनाथ का पोस्टर जलाने की कोशिश की। पोस्टर छीनते समय एक पुलिसकर्मी का हाथ झुलस गया। पुलिस कार्रवाई की तैयारी में है। #SamajwadiParty #YogiAdityanath #Meerut #UPNews #Protest #Police #UttarPradesh #BreakingNews1
- मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना मुंबई: मंत्री आशीष शेलार ने रक्षाबंधन के पर्व पर की आंगनवाड़ी सेविकाओं और स्वास्थ्य कार्यकर्ताओं की सराहना, कहा—उनका सहयोग अमूल्य सांस्कृतिक और पारंपरिक पर्व रक्षाबंधन के अवसर पर महाराष्ट्र के प्रमुख नेता और मंत्री आशीष शेलार ने समाज सेवा में जुटी महिलाओं के प्रति अपना आभार व्यक्त किया है। मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि हमारी परंपराओं में रक्षाबंधन का पर्व भाई-बहन के पवित्र प्रेम और अटूट बंधन को व्यक्त करने का एक बेहद महत्वपूर्ण माध्यम है।1
- नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨ नायगाव कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष! 🌴🎉 कोळी बांधवांचा उत्साह शिगेला! 🛶✨1
- नेपाल की बारिश ने बढ़ाई बिहार की धड़कनें… नदियां उफान पर, बाढ़ का खतरा मंडराया!” नेपाल में कुदरत का कहर! बिहार पर मंडराया बाढ़ का खतरा, नदियों का जलस्तर बढ़ा पटना/बिहार। नेपाल में लगातार हो रही भारी बारिश के बीच नदियों के जलस्तर में बढ़ोतरी से बिहार में बाढ़ का खतरा गहराने लगा है। नेपाल से आने वाले पानी के कारण गंडक, कोसी, बागमती और कमला बलान जैसी नदियों के उफान पर आने की आशंका ने सीमावर्ती इलाकों में चिंता बढ़ा दी है। कई निचले इलाकों में जलभराव की स्थिति बनने लगी है। नदी किनारे रहने वाले लोगों को सतर्क रहने और प्रशासन के निर्देशों का पालन करने की अपील की जा रही है। हालात बिगड़े तो कई इलाकों में बाढ़ का संकट और गहरा सकता है। प्रशासन और राहत-बचाव एजेंसियों को अलर्ट रहने की जरूरत है। अपील: नदी, बांध और निचले इलाकों के आसपास जाने से बचें। अफवाहों पर ध्यान न दें और किसी भी आपात स्थिति में स्थानीय प्रशासन से संपर्क करे2
- JaiBhimApp - Play store Stickers and Wallpaper App – +500 बाबासाहेब और सामाजिक समानता के संदेशों को डिजिटल माध्यम से आगे बढ़ाना चाहते हैं, तो आज ही JaiBhimApp डाउनलोड करें।1
- भारताचे असे पंतप्रधान ज्यांनी देशासाठी काहीतरी मिळवून दिले आहे. भारताला असे एक पंतप्रधान लाभले होते ज्यांनी आपल्या कार्यकाळात लोकांच्या स्मरणात राहील असे काहीही निर्माण केले नाही; उलट, जे काही उभारले गेले होते, ते सर्व विकून टाकण्यात आले.1
- मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा ऑटो, टैक्सी और रिक्शा चालकों के लिए मराठी सीखना अनिवार्य (एक साल का समय) मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा ऑटो, टैक्सी और रिक्शा चालकों के लिए मराठी सीखना अनिवार्य (एक साल का समय) समर्थन: ऑटो, टैक्सी और रिक्शा चालकों के संगठनों ने मुंबई में 'काम चलाऊ मराठी' सीखने के इस प्रस्ताव का समर्थन किया है और वे इसे सीखना चाहते हैं। चुनौती और राहत: कई चालक अलग-अलग उम्र के हैं और कुछ ने बहुत पहले पढ़ाई छोड़ दी थी, जिससे कम समय में इसे सीखना उनके लिए कठिन था। इसे ध्यान में रखते हुए, राज्य सरकार ने एक साल का समय देने की उनकी मांग को स्वीकार कर लिया है। छूट: इस एक साल की अवधि के दौरान चालकों के खिलाफ कोई दंडात्मक कार्रवाई नहीं की जाएगी। सरकार उनकी मदद के लिए विशेष कक्षाएं और अध्ययन सामग्री (Literature) तैयार करेगी।1
- अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांचा जल्लोष! | मुख्यमंत्री फडणवीसांचे मानले आभार मुंबई, महाराष्ट्रात अ-मराठी ऑटो-रिक्षा चालकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत चालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.1