कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील अंकुशराव यादव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेने ६ जुलै रोजी जिल्हा बँक प्रतिनिधीपदासाठी ठराव घेतला. या बैठकीत अंकुशराव रामचंद्र यादव यांचे नाव जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून एकमताने आणि बिनविरोध मंजूर करण्यात आले आहे. संस्थेच्या सर्व १३ संचालकांनी या ठरावाला आपला पाठिंबा दिला आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढवत असून, हा ठराव त्यांच्या बाजूने झाला आहे. संस्थेचे संचालक निलेश उर्फ बंटी यादव यांनी म्हटले आहे की, हा ठराव बहिरोबावाडीकरांचा सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधोरेखित करतो. सहकार क्षेत्रात सभापतींच्या नेतृत्वावर असलेला वाढता विश्वास यातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील अंकुशराव यादव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेने ६ जुलै रोजी जिल्हा बँक प्रतिनिधीपदासाठी ठराव घेतला. या बैठकीत अंकुशराव रामचंद्र यादव यांचे नाव जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून एकमताने आणि बिनविरोध मंजूर करण्यात आले आहे. संस्थेच्या सर्व १३ संचालकांनी या ठरावाला आपला पाठिंबा दिला आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढवत असून, हा ठराव त्यांच्या बाजूने झाला आहे. संस्थेचे संचालक निलेश उर्फ बंटी यादव यांनी म्हटले आहे की, हा ठराव बहिरोबावाडीकरांचा सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधोरेखित करतो. सहकार क्षेत्रात सभापतींच्या नेतृत्वावर असलेला वाढता विश्वास यातून स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
- कर्जत तालुक्यातील राशीन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गट क्रमांक १४७६ आणि १४७७ मधील ग्रामपंचायत मिळकतीवरील जागेची मोजणी आज कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पार पडली. दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या या मोजणी प्रक्रियेदरम्यान भूमी अभिलेख विभागाचे शिस्तेदार सुनील धामणे, मोजणी अधिकारी प्रशांत थोरात, संजय धनवडे, पंकज निमसे यांच्यासह गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड उपस्थित होते. याशिवाय महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे आणि स्थानिक नागरिक तसेच शाहू राजेभोसले, तात्यासाहेब माने, सोयब काझी, राम कानगुडे, अविनाश मासाळ, विक्रम परदेशी हे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी अशी मागणी केली की, गेल्या ५० वर्षांपासून तिथे राहणाऱ्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार ५०० स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी आणि ज्यांची घरकुले आहेत, ती जैसे थे ठेवावीत. यावर भूमी अभिलेख विभागाचे शिस्तेदार सुनील धामणे यांनी स्पष्ट केले की, सध्या केवळ जागेची मोजणी करण्याचे काम सुरू असून अतिक्रमण काढण्याची कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही. या आश्वासनानंतर उपस्थित रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करत मोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण केला नाही.1
- उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.1
- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दररोज सकाळी जगाच्या कल्याणासाठी आणि मानवतेसाठी संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना "पसायदान" म्हटली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित शाळा इमारत, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे मिळतील काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे. तसेच, या विद्यार्थ्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून निधीचे "दान" मिळेल काय, असे विचारत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे।1
- पुण्याच्या बारामतीमध्ये पालखी दरम्यान एका ज्येष्ठ व्यक्तीने अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा फोटो आपल्या गळ्यात घालून समाजाला एक संदेश दिला. पालखीमध्ये या ज्येष्ठ व्यक्तीने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो घातल्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.1
- महापालिकेकडे उद्ध्वस्त करण्यासाठी यंत्रणा आहे पण सावरण्यासाठी नाही, अशी स्पष्ट भूमिका कामगार नेते यशवंत भोसले यांनी मांडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना तात्काळ सेवांमध्ये कायमस्वरूपी करण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.1
- कर्जत तालुक्यातील राशीन येथील गट क्रमांक १४७६ आणि १४७७ मधील ग्रामपंचायत मिळकतीवर असलेल्या जागेची मोजणी आज कडक पोलीस बंदोबस्तामध्ये पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही मोजणी प्रक्रिया दुपारी १२ वाजता सुरू झाली. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे शिस्तेदार सुनील धामणे, मोजणी अधिकारी प्रशांत थोरात, संजय धनवडे, पंकज निमसे, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी रोहिदास कापरे उपस्थित होते. याशिवाय शाहू राजेभोसले, तात्यासाहेब माने, सोयब काझी, राम कानगुडे, अविनाश मासाळ, विक्रम परदेशी यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोजणी सुरू असताना स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी मागणी केली की, येथे ५० वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार ५०० स्क्वेअर फूट जागा मिळावी आणि ज्यांचे घरकुल आहे, त्यांना तशाच स्थितीत ठेवण्यात यावे. यावर भूमी अभिलेखचे शिस्तेदार सुनील धामणे यांनी स्पष्ट केले की, सध्या केवळ जागेची मोजणी केली जात असून कोणतेही अतिक्रमण काढले जाणार नाही. रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी मोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण न करता शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले.1
- आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या चरण पादुका असलेल्या पालखीचे शिरूर कासार शहरात प्रशासनाच्या वतीने मोठ्या जल्लोषात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे. "भेटी लागे जीव.. लागलीसे आस..पाऊले चालली पंढरीची वाट..!" या भक्तिभावाने पालखीचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याप्रसंगी तहसीलदार सुरेशजी घोळवे, नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी गणेश दहिफळे, पोलीस ठाण्याचे एपीआय राजेश गडवे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. हरिनामाच्या गजरात शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.1