logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न; हजारो भाविकांची उपस्थिती पोहरादेवी | प्रतिनिधी गोर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी धर्मपीठ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी धर्मपीठात दर्शन घेऊन गुरूंचे आशीर्वाद घेतले. २७ जुलैपासून शेकडो पायदळ दिंड्यांचे पोहरादेवी येथे आगमन झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. महोत्सवादरम्यान श्री किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. २८ जुलै रोजी प्रबोधनकार पंकज पाल महाराज व आकाश महाराज यांच्या सुश्राव्य भजनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. २९ जुलै रोजी धर्मगुरू जितेंद्र महाराज यांच्या हस्ते पूज्य संत रामराव बापू यांच्या भोगविधीचा धार्मिक सोहळा संपन्न झाला. यावेळी महंत गोपाल महाराज (कर्नाटक), महंत रमेश महाराज (तेलंगणा), श्री श्री भिक्षू महाराज (हैदराबाद) यांच्यासह शेकडो साधू-संत उपस्थित होते. अनेक भाविकांनी धर्मगुरू जितेंद्र महाराज यांचे पूजन करून गुरुदीक्षा स्वीकारली. या सोहळ्यास पायदळ दिंडी समितीचे सदस्य व प्रा. विलास राठोड, श्री प्रकाश चव्हाण (विजापूर), श्री गणेश राठोड (घनसावंगी), श्री अर्जुन राठोड (परतूर) यांच्यासह विविध भागांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानेही मोलाचे सहकार्य केले. तहसीलदार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तर मानोरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवून भाविकांच्या सुरक्षिततेची प्रभावी काळजी घेतली. गुरुपौर्णिमा महोत्सवामुळे पोहरादेवी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी धर्मगुरूंचे आशीर्वाद घेत महोत्सवाची सांगता केली.

17 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
17 hrs ago
0dedaa76-35e2-47cd-b6e5-f3d0d0fa5ab9

गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवी येथे गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न; हजारो भाविकांची उपस्थिती पोहरादेवी | प्रतिनिधी गोर बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी धर्मपीठ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी धर्मपीठात दर्शन घेऊन गुरूंचे आशीर्वाद घेतले. २७ जुलैपासून शेकडो पायदळ दिंड्यांचे पोहरादेवी येथे आगमन झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने

12edb3b3-b271-4165-88cf-efc20da08029

भारावून गेला होता. महोत्सवादरम्यान श्री किसन भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. २८ जुलै रोजी प्रबोधनकार पंकज पाल महाराज व आकाश महाराज यांच्या सुश्राव्य भजनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. २९ जुलै रोजी धर्मगुरू जितेंद्र महाराज यांच्या हस्ते पूज्य संत रामराव बापू यांच्या भोगविधीचा धार्मिक सोहळा संपन्न झाला. यावेळी

b5c64ea9-6209-40f5-a934-ed0d0c5c58bd

महंत गोपाल महाराज (कर्नाटक), महंत रमेश महाराज (तेलंगणा), श्री श्री भिक्षू महाराज (हैदराबाद) यांच्यासह शेकडो साधू-संत उपस्थित होते. अनेक भाविकांनी धर्मगुरू जितेंद्र महाराज यांचे पूजन करून गुरुदीक्षा स्वीकारली. या सोहळ्यास पायदळ दिंडी समितीचे सदस्य व प्रा. विलास राठोड, श्री प्रकाश चव्हाण (विजापूर), श्री गणेश राठोड (घनसावंगी), श्री अर्जुन राठोड (परतूर) यांच्यासह विविध भागांतील मान्यवरांनी उपस्थिती

373055e6-d9f9-4608-b6aa-575142820c4a

लावली. महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनानेही मोलाचे सहकार्य केले. तहसीलदार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तर मानोरा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व त्यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवून भाविकांच्या सुरक्षिततेची प्रभावी काळजी घेतली. गुरुपौर्णिमा महोत्सवामुळे पोहरादेवी परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी धर्मगुरूंचे आशीर्वाद घेत महोत्सवाची सांगता केली.

More news from Maharashtra and nearby areas
  • संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    1
    संसद परिसर में विपक्षी सांसदों ने राम मंदिर चढ़ावा मामले को लेकर प्रतीकात्मक विरोध प्रदर्शन किया।
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज
    News Anchor Jalgaon, Maharashtra•
    1 hr ago
  • आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।
    1
    आज सड़क निर्माण में हुई लापरवाही के कारण मेरे खेत में पानी भर गया है, जिससे फसल को नुकसान होने की आशंका है। इस संबंध में मैंने वीडियो भी रिकॉर्ड किया है। संबंधित विभाग से निवेदन है कि जल्द से जल्द मौके का निरीक्षण कर उचित कार्रवाई करें और समस्या का स्थायी समाधान करें।
    user_Mk news channel
    Mk news channel
    Farmer पाचोरा, जळगाव, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप* *"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी* जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    1
    जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप*
*जामनेर तालुक्यात स्मार्ट मीटरवरून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष; वीजबिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप*
*"एसी सुरू असताना १,४०० रुपये बिल, आता एसी बंद असूनही ७,००० रुपये बिल" – नागरिकांचा संताप; बिलांची चौकशी करण्याची मागणी*
जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येत असून, या मीटरमुळे वीजबिलात अनपेक्षित वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी घरांमध्ये साधे वीज मीटर असताना उन्हाळ्यात एसीचा नियमित वापर करूनही मासिक वीजबिल सुमारे १,४०० रुपयांच्या आसपास येत होते. मात्र आता स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पावसाळ्यात एसीचा वापर बंद असतानाही मासिक तब्बल ७,००० रुपयांचे वीजबिल आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे.
यामुळे स्मार्ट मीटरची अचूकता, वीजबिलाची गणना आणि मीटर रीडिंगबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. "स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट सुरू आहे का?" असा सवाल अनेक नागरिक करत असून, वाढीव वीजबिलांची स्वतंत्र चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, वाढीव वीजबिलामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले असून, शासन आणि वीज वितरण कंपनीने याबाबत तातडीने खुलासा करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
    user_KRUSHNA RAJPUT
    KRUSHNA RAJPUT
    जामनेर, जळगाव, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Muslim colony Khadka ward kramank 3
    1
    Muslim colony Khadka ward kramank 3
    user_Juber Khan Karim Khan
    Juber Khan Karim Khan
    Bhusawal, Jalgaon•
    9 hrs ago
  • लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत.... धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस! धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    1
    लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत....
धुळ्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस!
धुळे: लळींग गावात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. 
रात्रीपासून मुसळधार पाऊस, घरा घरात पाणी साचले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ek hi barish mein new Eid ka gharon ke pass Tak gussa Pani yah ek Hi din ki barish mein Khadka Gram Panchayat ke new Eid ka colony ke HAL
    1
    ek hi barish mein new Eid ka gharon ke pass Tak gussa Pani
yah ek Hi din ki barish mein Khadka Gram Panchayat ke new Eid ka colony ke HAL
    user_Sheikh Rauf Sheikh Yusuf
    Sheikh Rauf Sheikh Yusuf
    भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! अक्कलपाडा धरणातून विसर्ग, पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद... Dhule News | धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! ⚠️ 12 तासांपासून मुसळधार पाऊस. अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरू. पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद. नागरिकांनी सतर्क रहावे. - #DhuleRedAlert #AkalkpadaDam #PanzaraRiver #DhuleFlood #marketupdate
    1
    धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! अक्कलपाडा धरणातून विसर्ग, पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद... 
Dhule News | धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट! ⚠️  
12 तासांपासून मुसळधार पाऊस. अक्कलपाडा धरणातून विसर्ग सुरू.  
पांझरा नदीला पूर, फारशी पूल बंद. नागरिकांनी सतर्क रहावे.
-
#DhuleRedAlert #AkalkpadaDam #PanzaraRiver #DhuleFlood 
#marketupdate
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.