Shuru
Apke Nagar Ki App…
यमुना एक्सप्रेस वर भीषण अपघात ट्रक चालक ठार
चंद्रकला हेमंत वळवी
यमुना एक्सप्रेस वर भीषण अपघात ट्रक चालक ठार
More news from Nashik and nearby areas
- *चांदवड तालुका होणार पाणीदार; 'विशेष जलसमृद्धी अभियानाचा' आमदार राहुल आहेरांच्या उपस्थितीत दिमाखदार प्रारंभ* चांदवड: तालुक्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने आज तहसील कार्यालय, चांदवड येथे 'विशेष जलसमृद्धी अभियान' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील विविध मान्यवरांच्या साक्षीने या अभियानाचे बिगुल वाजवण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे व संदीप काळे, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर यांची विशेष उपस्थिती होती. या अभियानाद्वारे तालुक्यातील जलस्त्रोत बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणेने कंबर कसली आहे. कार्यक्रमाला प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे आणि कृषी अधिकारी निलेश मावळे उपस्थित होते. तसेच सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील प्रमुख अधिकारी, ज्यात सुनंदा घुगे, सुभाष पगार, माधुरी वाडिले, वासंती बोरसे, प्रसाद सोनवणे आणि प्रतीक धुमारे यांचा समावेश होता, त्यांनी तांत्रिक नियोजनाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब माळी, अशोक भोसले, बाळासाहेब वाघ, निवृत्ती शिंदे, मोहन शर्मा, पंढरीनाथ खताळ यांसह अनेकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला. या अभियानामुळे आगामी काळात तालुक्यातील धरणांमधील साठा वाढण्यास आणि शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. "तालुक्याचा शाश्वत विकास करायचा असेल, तर जलसमृद्धी हाच एकमेव मार्ग आहे. लोकसहभाग आणि प्रशासकीय नियोजन यांच्या जोरावर चांदवड तालुका पाणीदार करू." — *डॉ. राहुल दादा आहेर* (आमदार, चांदवड-देवळा)1
- Post by Peoples News 241
- जलगांव जामोद नाला करने1
- घाटपुरी जलकुंभाच्या मुख्य व्हॉल्व्हचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर; उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता खामगाव:शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत करणाऱ्या घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम आज, १० जानेवारी २०२६ रोजी प्रशासनातर्फे अत्यंत वेगाने हाती घेण्यात आले आहे. खामगाव नगर परिषदेचे पाणी पुरवठा सुपरवायझर सुरजसिंह ठाकुर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली हे काम युद्धपातळीवर सुरू असून, उद्यापासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीचा मुख्य व्हॉल्व्ह तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त झाला होता. परिणामी, संबंधित भागातील पाणी वितरणात अडथळा निर्माण झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे नियोजन केले. आज दिवसभर सुरू असलेल्या या दुरुस्ती कामामुळे पाणीपुरवठा बंद असला तरी, रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी झाल्यानंतर उद्या (११ जानेवारी) पासून संबंधित भागातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत होण्याची दाट शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.2
- Post by YUVA JALNA NEWS1
- राजमाता पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज1
- नासिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांचे जनतेला आवाहन1
- Post by Peoples News 241
- प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई खामगाव : प्रतिबंधित व घातक नायलॉन ने मांजाची विक्री करणाऱ्या एका युवकास शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी मोची गल्ली परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० रिल नायलॉन मांजा असा सुमारे ६,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोची गल्ली भागात बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित परिसरात छापा टाकला.चेतनमुकेश चव्हाण (२७, रा. मोची गल्ली, खामगाव) हा नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या १० रिल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कलम १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रशांत श्रींगारे, हेडकॉन्स्टेबल प्रदीप मोटे, तसेच रवींद्र कजर, गणेश कोल्हे, सागर भगत, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव व अमर ठाकूर यांनी केली.1