logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मातृदिनी एचएआरसी संस्थेकडून निराधार मातेला स्वावलंबनाची भेट; शेळी-करडू देत दिला जगण्याला नवा आधार सेलू (प्रतिनिधी):- आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्त रविवारी (दि.१०) एचएआरसी संस्थेच्या वतीने एक हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सेलू तालुक्यातील कुंडी येथील निराधार विधवा माता वंदना बालासाहेब अंभोरे यांना उदरनिर्वाहासाठी एक शेळी व एक करडू भेट देत त्यांच्या आयुष्याला स्वावलंबनाची नवी दिशा देण्यात आली. या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लागणार असून मुलांच्या शिक्षणालाही आधार मिळणार आहे. पतीच्या निधनानंतर दोन लहान मुलांसह अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या वंदना अंभोरे या मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुलांचे शिक्षण, दैनंदिन खर्च आणि कुटुंबाचा सांभाळ करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरत होते. अशा कठीण परिस्थितीची माहिती कुंडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामराव गायकवाड यांनी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एचएआरसी) संस्थेकडे दिली. त्यानंतर संस्थेने तातडीने मदतीचा हात पुढे करत मातृदिनाच्या निमित्ताने हा सामाजिक उपक्रम साकारला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, मुख्याध्यापक रामराव गायकवाड तसेच शरद ठाकर उपस्थित होते. या उपक्रमासाठी हार्दिक ठाकर, अंबरेश्वर राठी, आलोक जोशी, विनोद भाला, राम गायकवाड, संतोष बारबिंडे आणि प्रा. डी. व्ही. दिकीत यांनी आर्थिक सहकार्य केले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एचएआरसी संस्था सातत्याने कार्यरत असून आजवर संस्थेच्या माध्यमातून ९२ निराधार, विधवा व गरजू महिलांना शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या, शेळी-करडू तसेच विविध उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपक्रमांमुळे अनेक महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा नवा मार्ग मिळाला असून त्यांच्या कुटुंबांना आधाराची मजबूत साथ लाभत आहे.

5 hrs ago
user_Kapil Ashokrao Shinde
Kapil Ashokrao Shinde
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
5 hrs ago
3f4d88e8-2419-4b84-a616-edc6ca3519cb

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    1
    ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मनसैनिकांनी शाई आणि ऑइल फेकले. मनसे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे या घटनेतून समोर आले.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • चित्रपट कलावंत सुपरस्टार टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. चित्रपट कलावंत टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 10 मे 2026. तामिळनाडूचा चित्रपट कलावंत सुपरस्टार टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी आज रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना लाखोंच्या जनतेच्या साक्षीने पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    1
    चित्रपट कलावंत सुपरस्टार टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. 
चित्रपट कलावंत टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. 
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
रविवार दिनांक 10 मे 2026.
तामिळनाडूचा चित्रपट कलावंत सुपरस्टार टी व्ही के. पक्षाचे नेते विजय थलपतिया यांनी आज रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना लाखोंच्या जनतेच्या साक्षीने पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आंबेजोगाई रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    8 hrs ago
  • सांगलीत पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळत तीन आरोपींना अटक केली आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या वादामुळे हा कट रचला गेल्याचा संशय असून, आरोपी फेब्रुवारीपासून भोकरेंची रेकी करत होते. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, भोकरेंना तातडीने 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
    1
    सांगलीत पत्रकार संजय भोकरे यांच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळत तीन आरोपींना अटक केली आहे. अंबाबाई तालीम संस्थेच्या वादामुळे हा कट रचला गेल्याचा संशय असून, आरोपी फेब्रुवारीपासून भोकरेंची रेकी करत होते. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, भोकरेंना तातडीने 'झेड प्लस' सुरक्षा देण्याची मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    12 hrs ago
  • लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पोलिसांनी अवैध 'जुगाड' वाहतूक आणि जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जुगाड चालकांना अटक करण्यात आली असून, ₹3.45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात पोलिसांनी अवैध 'जुगाड' वाहतूक आणि जुगारावर धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जुगाड चालकांना अटक करण्यात आली असून, ₹3.45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहनांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • इंडियन बँकेने मुंबईत एका मोठ्या कर्ज वितरण आणि लोकसंपर्क शिबिराचे आयोजन केले. या शिबिरातून हजारो ग्राहकांना त्वरित विविध कर्जे उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे त्यांची आर्थिक गरज भागण्यास मदत झाली.
    1
    इंडियन बँकेने मुंबईत एका मोठ्या कर्ज वितरण आणि लोकसंपर्क शिबिराचे आयोजन केले. या शिबिरातून हजारो ग्राहकांना त्वरित विविध कर्जे उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे त्यांची आर्थिक गरज भागण्यास मदत झाली.
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-नांदुरा मार्गावर एका भीषण अपघातात पंढरी बगाडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचे आज तर मुलीचे उद्या लग्न असताना ही हृदयद्रावक घटना घडल्याने लग्नघरावर शोककळा पसरली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव-नांदुरा मार्गावर एका भीषण अपघातात पंढरी बगाडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाचे आज तर मुलीचे उद्या लग्न असताना ही हृदयद्रावक घटना घडल्याने लग्नघरावर शोककळा पसरली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 day ago
  • न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
    1
    न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant Paithan, Aurangabad•
    1 hr ago
  • लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    2
    लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.
    user_Mahesh NIKAM
    Mahesh NIKAM
    औसा, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.