logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कमिन्स कंपनी 5 सूत्रांवर आधारीत गाव व शाळांमध्ये व्हीलेज डेव्हलपमेंट कार्यक्रम राबवून कम्युनिटीचा विकास करते फलटण : कमिन्स कंपनीचा उद्योग व्यवसाय 100 हून अधिक देशात सुरु असून 1990 सालापासून कमिन्स इंडिया फौंडेशनच्या माध्यमातून कंपनी गाव व शाळांसाठी सीएसआरमध्ये काम करीत आहे. कमिन्स कंपनीने स्वत:बरोबर कम्युनिटीचाही कसा विकास करता येईल हे ध्येय ठेवून व्हीलेज डेव्हलपमेंट करण्यासाठी कार्यरत आहे. पंचसूत्री कार्यक्रमानुसार व्हीलेज डेव्हलपमेंट केले जात असून शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, इनकम जनरेट व सोशल इंजिनिअरींग या 5 सूत्रांवर आधारीत विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे कमिन्स मेगा साईट सीआर हेड प्रविण गायकवाड यांनी सांगितले. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित अ‍ॅम्बिशन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज  आदर्की बुद्रुक ता. फलटण येथे कमिन्स इंडिया फौंडेशन यांच्या सहकार्याने मुलींसाठी स्वतंत्र आधुनिक शौचालय व चेंजिग रुम वास्तूचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करीत श्रीफळ वाढवून व टिकाव मारुन झाले. यावेळी सुरवडी येथील कमिन्स मेगा साईट सीआर हेड प्रविण गायकवाड, धरा एनजीओ संस्थेचे अध्यक्ष नितीन गायकवाड, कमिन्स सीआर टीमच्या ऐश्‍वर्या घाडगे, सुमाना एनजीओ प्रतिनिधी बंटी तिवारी यांच्यासह  भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळासाहेब कासार (मोहोळकर), उपाध्यक्ष आप्पासाहेब नलवडे, सरपंच गणपतराव धुमाळ, उपसरपंच व संचालक महेंद्र धुमाळ, विनायक शिंदे, हणमंतराव पवार, श्री भैरवनाथ मल्टीस्टेट सोसायटी व्हाईस चेअरमन संजय पवार, सचिव प्रकाश येवले,  माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष सुळ, प्राचार्या डॉ. सौ. संजीवनी जाधव (देशमुख) यांच्या शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. आदर्की बुद्रूक या गावाची व शाळेची कमिन्स कंपनीच्या माध्यमातून डेव्हलपेमेंटसाठी निवड करण्यात आली असून गावाची गेल्या 3/4 वर्षापासून निवड करावी अशी मागणी सुरु होती मात्र नावातील साधर्म्यामुळे थोडा उशीर झाला. सुरवडी ता. फलटण येथे कमिन्स कंपनीचे अनेक प्रोजेक्ट सुरु आहेत. ग्रामविकास माध्यमातून सुरवडी परिसरातील जवळपास 25 गावात व्हीलेज डेव्हलपमेंट उपक्रमावर गेल्या 10 वर्षापासून  कंपनी काम करीत आहे. आजपासून आदर्की बुद्रुक व्हीलेज डेव्हलपमेंट काम होणार असल्याचे सीआर हेड प्रविण गायकवाड यांनी सांगितले.   अ‍ॅम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज येथे आल्यानंतर मुलांचा उत्साह पाहून समाधान वाटले. बाळासाहेब कासार (मोहोळकर) व सर्व संचालक मंडळाने  जे काम उभे केले आहे ते प्रेरणादायी आहे. राज्य पातळीवरील शैक्षणिक सुविधा आदर्की बुद्रुक सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिला असल्याचे पहावयास मिळाले ते काम वाखाणण्यासारख्ये आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकाचा उत्साह कौतुकास्पद आहे. शिक्षण घेताना मुलांनी या सर्व गोष्टींचा फायदा करुन घ्यावा असे प्रविण गायकवाड यांनी सांगितले. आपण आपल्या जीवनाचे दोन भाग करु शकतो, एक म्हणजे पूर्वार्ध व दुसरा म्हणजे उत्तरार्ध होय. ज्या व्यक्तीने पूर्वार्धात कष्ट घेतले त्यांचा उत्तरार्ध सुखद जातो व ज्या व्यक्तीने पूर्वार्धात सुखद अनुभव घेतला त्याचा उत्तरार्धा हा कष्टात जातो. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना  कष्ट हे करावयाचे आहेत मात्र ते पूर्वार्धात करायचे की उत्तरार्धात करायचे हे विद्यार्थ्यांनी ठरवावे. तथापी पूर्वाधात विद्यार्थ्यांनी कष्ट घेवून आपला गोल निश्‍चित करावा. आजच्या या उपक्रमामुळे आम्हालाही यामध्ये खारीचा वाटा म्हणून सहभागी होता आले याचा आनंद आहे. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज लागली तर आम्ही आमच्या परिने मदत करु याची ग्वाही देत गावाचा व शाळेचा सुरु असलेला विकास हा असाच पुढे चालत राहो अशा शुभेच्छा कमिन्स मेगा साईट सीआर हेड प्रविण गायकवाड यांनी दिल्या. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित अ‍ॅम्बिशन इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आल्यानंतर परिसरत व शैक्षणिक वातावरण पाहिल्यानंतर मन उल्हासित होवून आनंदीत झाले.  तुमच्या या उपक्रमाला सहकार्य  करण्यासाठी कमिन्स कंपनी विविध उपक्रमाद्वारे मदत करेल. कमिन्स कंपनीने जेथे जेथे काम  केले तेथे तेथेे उत्कृष्ट काम केले आहे. फलटण तालुक्यातील अनेक गावात व शाळांमध्ये पाणी, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. कंपनीने सीएसआर फंड उपलब्ध आहे म्हणून तो कुठे तरी व कसाही न वापरता जिथे गरज आहे तिथेच व महत्वाचा परिसर कोणता आहे तेथे तो फंड कंपनी वापरते. कंपनी सर्वांचा विचार करुन त्यावर प्रकाश टाकून योग्य सुविधा उपलब्ध करुन देत असून त्याचा गावाने व शाळेने उपयोग करुन घ्यावा असे आवाहन धरा एनजीओ संस्थेचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी केले. कमिन्स इंडिया फाउंडेशनने फलटण तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक उपक्रम राबविले आहेत. कंपनीने सीएसआर फंडातून अनेक शाळा व गावांसाठी पाणी, ओढ्याचे खोलीकरण शाळांना लागणार्‍या सुविधा अशी मदत केली आहे. अ‍ॅम्बिशन इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील मुलींसाठी आधुनिक चेंजिंग रुम व प्रसाधनगृह कंपनी बांधून देणार असून त्याचे भूमिपूजन आज झाल्याचे भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांनी सांगितले.   भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गेल्या 21 वर्षापासून ना नफा ना तोटा तत्वावर ग्रामीण भागातील मुलांना एलकेजी ते 12 वीपर्यंत शिक्षण उपलब्ध करुन देताना सेवा म्हणून कार्यरत आहे. आम्हाला दरवर्षी नफा न होता तोटाच सहन करावा लागतो. शाळेतील मुलांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्री भैरवनाथ मल्टीस्टेटचे अधिकारी, कर्मचारी, गावातील ग्रामस्थ देणगी स्वरुपात आर्थिक मदत करीत असल्याने त्यांचा यात मोठा वाटा असून त्यामुळे शाळेसाठी इमारती बांधू शकलो. कमिन्स कंपनीनेही आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. कमिन्स कंपनीने नियमानुसार शाळेसाठी कंपाउंड वॉल, मुलांसाठी प्रसाधनगृह उभारावे.  मुलांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होण्यासाठी आरओ फिल्टर उपलब्ध करुन द्यावा. शाळेला लॅब आहे मात्र भविष्यात मुले वाढणार असल्याने संगणक आणि इमारतीसह आधुनिक लॅब मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करुन आमचे संचालक व विद्यार्थी यांच्या मागणीनुसार कंपनीने ग्रामीण विद्यार्थ्यांना खेळासाठी मदत करता येईल ती करावी अशी विनंती भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांनी केली. कमिन्स इंडिया फाउंडेशन व कमिन्स मेगा साईट सीआर हेड  प्रविण गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना विविध उपक्रमांचा फायदा करुन घ्यावा असे आवाहन भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रकाश येवले यांनी सांगितले. प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्यावतीने संचालक, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थीनींसाठी उभारण्यात येणारे आधुनिक शौचालय व चेंजिंग रूम या सुविधा त्यांच्या आरोग्य, स्वच्छता व सन्मानाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असून या उपक्रमामुळे शाळेच्या विकासाला नवे बळ मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.

12 hrs ago
user_LOKSHAKATI RAKASHAK
LOKSHAKATI RAKASHAK
Satara, Maharashtra•
12 hrs ago
b90eae8e-752a-4369-bee4-e962fa6f2b80

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून  डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र  तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे  डोळेझाक करत असून  पर्यावरण प्रेमींनी  कारवाईची मागणी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत. मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.
    1
    फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांचे हार्दिक स्वागत.
मुंबईत आगमन झाले असता महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत, भारत-फ्रान्स भागीदारी आणखी मजबूत करून, त्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांचे स्वागत करणे ही सन्मानाची गोष्ट होती.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    1
    AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. 
#AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Deepak Sagar
    1
    Post by Deepak Sagar
    user_Deepak Sagar
    Deepak Sagar
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Akash mane
    1
    Post by Akash mane
    user_Akash mane
    Akash mane
    Plumber तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Raju Bawdiwale
    1
    Post by Raju Bawdiwale
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पत्रकार पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर
    1
    एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    1 day ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.17 तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.17
तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ  येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.