*माजी जि.प. सदस्य श्री संग्राम हयगले यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश* कासराळी ता. बिलोली जि. नांदेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संग्राम हयगले यांनी दि. 27 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा *ठाणे* येथील *स्व. मातोश्री गंगुबाई शिंदे सभागृहात* पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते *मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब* यांच्या उपस्थित *श्री. संग्राम हयगले* यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश करून शिवसेनेशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते *मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब* यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक *मा. बालाजी पाटील खतगावकर साहेब*, संपर्क प्रमुख श्री मडावी, जिल्हा प्रमुख श्री उमेश मुंढे तसेच सेवानिवृत्त सनदी अधिकारी मधुजी गिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री अशोक गोपछडे, लगूळ येथील माजी सरपंच बाबुराव गोसलोड, विजयनगर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी राजकुमार गुरगुरलवार, श्री विनोद निलावार आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येने शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बिलोली तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी काळात याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.

- Post by Today One Live1
- जाहीर अवाहन... जाहीर अवाहन... उदगीर शहरातील सर्व नागरिकांना, आपल्या शहराच्या आणि देशाच्या नियोजित विकासासाठी 'जनगणना २०२७' हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या जनगणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 'स्व-गणना' (Self-Enumeration) दिनांक १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविला जात आहे. माझे आपणास नम्र आवाहन आहे की, आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पोर्टल/ॲपद्वारे स्वतःहून नोंदवावी. या राष्ट्रीय कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे. अचूक माहिती देऊन शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे. चला, डिजिटल जनगणनेचा भाग बनूया आणि उदगीरच्या विकासाला गती देऊया! आपले नम्र सौ. स्वातीताई सचिन हुडे नगराध्यक्षा, उदगीर नगरपरिषद हेडलाइन1
- Post by नागनाथ ससाने1
- टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत प्रियंका मुंडे सरपंचपदी विजयी; 132 मतांनी दणदणीत विजय, गावात जल्लोष1
- आरटीओ आणि वाहनचालकात शाब्दिक चकमक. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी बाबळगाव चे वाहन चालक यांना केली मदत. रेनापुर पोलीस ठाण्यात आरटीओ ने दिलेली तक्रार मध्यस्थीने माघार. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026. लातूर तालुक्यातील बाबळगाव चे रहिवासी असलेले निळकंठ शिंदे यांची बोलेरो पिकप वाहन ही कोथिंबीर भरण्यासाठी लातूर तालुक्यातील बामणी शिवारात लावली असता या ठिकाणी आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी गाडीचे कागदपत्रे विचारात दोघांमध्ये तक्रार होऊन निळकंठ शिंदे विरोधात रेनापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. लातुर जिल्ह्याच्या आरटीओ. कार्यालयातील आरटीओ सहाय्यक इन्स्पेक्टर यांनी कारण नसतांना बाभळगाव येथील बुलेरो पीकअपचे मालक निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे बेलोरो पिकप वाहन मालक निळकंठ शिंदे यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना माहिती कळवताच तात्काळ प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी रेणापूर पोलीसांना संपर्क साधुन निळकंठ शिंदे यांना मदत करीत प्रकरणाविषयी चौकशी कामे निळकंठ शिंदे हे बाभळगाव येथील रहीवाशी आहेत, त्यांनी कर्ज काढून एक बुलेरो पिक अप मालवाहतूक गाडी खरेदी केली आहे,ते दररोज शेतकऱ्यांची कोथिंबीर घेऊन नागपूर ला जातात, रोजच्या प्रमाणे ते लातुर तालुक्यातील बामणी शिवारात रसत्याच्या कडेला (रस्ता सोडून) आपली बुलेरो पिक अप व्हॅन लावली होती आणी ते कोथिंबीर घेण्यासाठी शेतकर्यांच्या फडात गेले होते, तेंव्हा अचानक अष्टा मोड हुन एक RTO ची गाडी आली आणी निळकंठ यास बुलेरो पिक अप व्हॅन चे कागदपत्र मागितले, निळकंठ यांनी सर्व कागदपत्र दाखविले, लायसन्स दाखविले यात गाडी मालकाची कोणतीही चूक नसताना संबंधित इन्स्पेक्टर नी पैसे मागीतले ते पैसेही गाडी मालक निळकंठ यांनी दिले, तरीही 1500 रुपयाचा खोटा फाईन गाडी वर लावला आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ यांना शिवीगाळ केली, नंतर इन्स्पेक्टर आणी निळकंठ मध्ये शाब्दिक चकमक झाली, आणी संबंधित इन्स्पेक्टर नी निळकंठ शिंदे यांच्या विरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ही बातमी समजताच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी रेणापूर पोलीस निरीक्षक आणी संबंधित बीट आमलदार यांना संपर्क साधुन, निळकंठ यांना समज देत हे प्रकरण या ठिकाणीच मिटवण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे खंडापूरकर बाबा यांनी बोलताना आजही RTO लातुर मधील इन्स्पेक्टर यांची मुजोरी समाप्त झाली नाही, यापुढे जो कोणी भ्रष्टाचार इन्स्पेक्टर करत आसेल तर त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची गाढवावर बसवुन धिंड काढण्यात यावे. आरटीओ कार्यालयातून कोणी त्रास देत असेल तर स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती, फोन नंबर - 8888184444, 8055088888 वर संपर्क साधावा. वाहान चालकास मी विनंती करणार आहे, RTO ऑफिस मधील कोणाही इन्स्पेक्टर अन्य कर्मचाऱ्यांना एकरी भाषेचा वापर करु नका, त्यांना व्यक्तिगत भांडण करु नका आपण कायदेशीर तक्रार देवू असे सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात आले.1
- 📍लातूर जिल्ह्यातील पानचिंचोली येथील एका ७५ वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी व्यक्त केला संशय...उष्माघाताने जिल्ह्यात आत्तापर्यंत तीन जणांचा झालाय मृत्यू1
- Post by नागनाथ ससाने1
- हातात पिस्तूल घेतलेला पिस्तुल्या महाराज कोट्यावधी रुपये घेऊन फरार. वारकऱ्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. लातूर शहरात खंडापूर गावात हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भाविक भक्तांनी केलेल्या दानाची रक्कम कोट्यावधी रुपयाने जमा झाली असताना ही रक्कम किशोर शिवनीकर या महाराजांच्या ताब्यात होती ही रक्कम घेऊन फरार झाल्याची बातमी न्यूज 18 मराठी चॅनलने प्रसारित केली आहे.1
- • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.1