logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

रिझवान सौदागर यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी फेरनिवड! रिझवान सौदागर यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी फेरनिवड! ​धाड: बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी धाड येथील रिझवान सौदागर यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. ​आपल्या या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना रिझवान सौदागर म्हणाले, "काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मा. मुकुलजी वासनिक, जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश पाटील अवचार आणि आमचे नेते मा. राहुल भाऊ बोंद्रे यांचा मी ऋणी आहे." ​ते पुढे म्हणाले की, "ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षसंघटना तळागाळात अधिक मजबूत करण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत राहीन." ​या फेरनिवडीबद्दल सौदागर यांच्यावर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2 hrs ago
user_ZM news official
ZM news official
बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
2 hrs ago
99c0d4d5-390e-46ba-a86f-ca6d127d6969

रिझवान सौदागर यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी फेरनिवड! रिझवान सौदागर यांची बुलढाणा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी फेरनिवड! ​धाड: बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी धाड येथील रिझवान सौदागर यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. ​आपल्या या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना रिझवान सौदागर म्हणाले, "काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मा. मुकुलजी वासनिक, जिल्हाध्यक्ष मा. प्रकाश पाटील अवचार आणि आमचे नेते मा. राहुल भाऊ बोंद्रे यांचा मी ऋणी आहे." ​ते पुढे म्हणाले की, "ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षसंघटना तळागाळात अधिक मजबूत करण्यासाठी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत राहीन." ​या फेरनिवडीबद्दल सौदागर यांच्यावर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन
    1
    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाडमध्ये पोलिसांचा रूट मार्च; शांतता व सलोख्याचे आवाहन
    user_ZM news official
    ZM news official
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*
    1
    बुलढाणा :-सापाच्या विषाने नव्हे, आरोग्य यंत्रणेच्या निर्दयी दुर्लक्षाने घेतला २ जीव! रस्ता नसल्याने ३ किमी झोळीतून प्रवास, रुग्णालयात लस मिळेना; २२ वर्षीय गर्भवती मातेचा बाळासह तडफडून मृत्यू, दोषींवर कारवाई कधी?*
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • नियमित व्यायामामुळे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
    1
    नियमित व्यायामामुळे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.
    user_Sambhaji Fit Wellness Studio
    Sambhaji Fit Wellness Studio
    Fitness Trainer जाफ्राबाद, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • गौरीच्या आगमनावर ‘पाऊल राजा’ची हजेरी; भक्तिमय वातावरणात उत्साहाला उधाण! भोकरदन :गौरीच्या आगमनानिमित्त परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गौरीच्या स्वागतासाठी आयोजित सोहळ्यात ‘पाऊल राजा’च्या विशेष हजेरीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. गौरीच्या आगमनाचा आनंद, भक्तीचा उत्साह आणि पारंपरिक वातावरणाचे मनमोहक क्षण या व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत. 📍 विशेष वृत्त | मराठवाडा मीडिया न्यूज ✍️ बातमीदार : विश्वास धसाळ व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका. #गौरीआगमन #गौरीपूजन #पाऊलराजा #गौरी #भोकरदन #मराठवाडा #मराठवाडामीडियान्यूज #विश्वासधसाळ #Gauri #GauriFestival
    1
    गौरीच्या आगमनावर ‘पाऊल राजा’ची हजेरी; भक्तिमय वातावरणात उत्साहाला उधाण! 

भोकरदन :गौरीच्या आगमनानिमित्त परिसरात भक्तीमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गौरीच्या स्वागतासाठी आयोजित सोहळ्यात ‘पाऊल राजा’च्या विशेष हजेरीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
गौरीच्या आगमनाचा आनंद, भक्तीचा उत्साह आणि पारंपरिक वातावरणाचे मनमोहक क्षण या व्हिडिओत पाहायला मिळणार आहेत.
📍 विशेष वृत्त | मराठवाडा मीडिया न्यूज
✍️ बातमीदार : विश्वास धसाळ
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#गौरीआगमन #गौरीपूजन #पाऊलराजा #गौरी #भोकरदन #मराठवाडा #मराठवाडामीडियान्यूज #विश्वासधसाळ #Gauri #GauriFestival
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान भोकरदन इसरारखान पठाण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे. जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे. गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे. समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    4
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

भोकरदन येथील स्टिंग ऑपरेशनमध्ये आरोग्य विभागाला मोलाचे सहकार्य जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान
भोकरदन इसरारखान पठाण
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित विशेष गौरव समारंभात सामाजिक कार्यकर्ते अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ अध्यक्ष, अन्याय अत्याचार निवारण, हक्क पर्यावरण संरक्षण समिती यांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अब्दुल रऊफ युसूफ यांना गौरवपत्र प्रदान केले. फोटोमध्ये जिल्हाधिकारी आशिमा मित्तल या त्यांना गौरवपत्र देताना दिसत असून त्यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या फोटोमध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या सत्यमेव जयते बोधचिन्ह असलेले अधिकृत गौरवपत्र दिसत आहे.
जालना जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा, १९९४ सुधारित २००३ तसेच गर्भपात प्रतिबंधक कायदा, १९७१ सुधारित २०२१ म्हणजेच PCPNDT आणि MTP कायद्यांतर्गत भोकरदन येथे आरोग्य विभागाने केलेल्या गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांनी अत्यंत मोलाचे आणि धाडसी सहकार्य केले होते.
बेटी बचाओ, बेटी पढाओ या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या गंभीर प्रकाराची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरोग्य विभागाला प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या या उल्लेखनीय आणि समाजहिताच्या सहकार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने हा गौरव केला आहे.
गौरवपत्रावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, जालना जिल्ह्यामध्ये गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा १९९४ सुधारीत २००३ व गर्भपात प्रतिबंध कायदा १९७१ सुधारीत २०२१ अंतर्गत भोकरदन येथे केलेल्या स्टिंग ऑपरेशन करिता आपण मोलाचे सहकार्य आरोग्य विभागास केले आहे. हे सहकार्य उल्लेखनीय असल्याने आपणास गौरविण्यात येत आहे.
समाजातील अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या गर्भलिंग निदानाविरोधात प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मिळालेला हा जिल्हास्तरीय सन्मान हा अब्दुल रऊफ मोहम्मद युसूफ यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पोचपावती मानली जात आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
    user_इसरारखान पठाण
    इसरारखान पठाण
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
    1
    सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
सावळदबारा परिसरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध ठिकाणी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, वर्धिनी केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाला अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक तथा शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उस्मान तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस जमादार व अंमलदार, माजी सैनिक, पत्रकार मंडळी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावळदबारा वर्धिनी केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, नागरिक तसेच गावातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    1
    न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
 नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून
नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    10 hrs ago
  • चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी
    1
    चिखली:-धोंडी धोंडी पाणी दे...’ म्हणत कवठळच्या महिलांची महादेवाला आर्त हाक; दीड महिन्यांचा दुष्काळ अन् विजेच्या लपंडावाने पिके करपली, तातडीने भरघोस मदतीची मागणी
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.