पारंपरिक कारागिरांसाठी वरदान ठरतेय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हिंगणघाट :वर्धा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आर्थिक व तांत्रिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ग्रामीण तसेच शहरी भागातील कारागिरांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. या योजनेअंतर्गत सुतार, लोहार, सोनार, कुंभार, न्हावी, धोबी, शिंपी, चांभार आदी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना प्रशिक्षण, आर्थिक मदत तसेच आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येत असल्याने ही योजना कारागिरांसाठी वरदान ठरत असल्याचे मत एमएसएमई विकास कार्यालय नागपूरचे सहाय्यक निदेशक मधुकर भुरले यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालय व यांच्या वतीने कारागीर व हस्तकला व्यावसायिकांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेवरील जनजागृती शिबिराचे आयोजन मंगळवार, दि. 10 रोजी वीरांगना राणी दुर्गावती भवन, हिंगणघाट येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद स्वास्थ सभापती संजय माडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक निदेशक मधुकर भुरले, माजी सहाय्यक निदेशक पि. टी. डोईफोडे, भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक प्रदीप कुमार त्रिवेदी, भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय मोहोड तसेच माजी नगरसेविका नलिनी सयाम प्रामुख्याने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना पि. टी. डोईफोडे यांनी सांगितले की, ही योजना सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, चांभार यांसह १८ पारंपरिक कारागिरांच्या व्यवसायांना बळकटी देण्यासाठी व त्यांच्या उपजीविकेचा स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची आहे. ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक प्रदीप कुमार त्रिवेदी यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध कर्ज योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुद्रा कर्ज योजना तसेच उद्योजकांसाठी उपलब्ध आर्थिक सहाय्याची माहिती दिली. कारागिरांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. नगर परिषद स्वास्थ सभापती संजय माडे यांनी युवकांनी निराश न होता नोकरीच्या शोधात भटकण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त केले. तर माजी नगरसेविका नलिनी सयाम यांनी महिलांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन अजय मोहोड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरज गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरी व ग्रामीण भागातील युवक, महिला तसेच कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- मजाक बना दिया शिक्षा का मंदिर! 2.20 करोड़ की लागत, लेकिन ईंट-सीमेंट सब 'थर्ड क्लास'। #viralreels #viralvideos #BreakingNews #Muzaffarpur #BiharPolice #samratchoudhary #bihar #schools #Shikshamantri1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- Post by धरती पुत्र4
- शताब्दी चौकात भीमगर्जना: आनंद शिंदेंच्या सुरांनी नागपूरकर मंत्रमुग्ध; महापौर, आमदारांची विशेष उपस्थिती नागपूर: शताब्दी चौक परिसरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'जयंती विशेष' कार्यक्रमात लोकप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांच्या सुरांनी भीम अनुयायांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्याला नागपूरकरांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: प्रमुख उपस्थिती: शहराचे महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिंदेशाहीचा जलवा: आनंद शिंदे यांनी 'प्रथा' आणि 'परंपरा' जपत सादर केलेल्या भीमगीतांनी जनसागर डोलायला लागला. प्रचंड गर्दी: शताब्दी चौकात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती; पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मान्यवरांचे मार्गदर्शन: लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. शिंदेंच्या आवाजातील पहाडी गीतांनी रात्री उशिरापर्यंत भीम अनुयायांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला1
- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1