logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि कमालीच्या अनास्थेमुळे शासनाच्या तब्बल ३३ कोटी रुपयांच्या निधीचा चुराडा झाल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून समोर आला आहे. केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेच्या कोट्यवधींच्या निधीतून जनतेच्या सेवेसाठी खरेदी केलेल्या बसेस आज खंबळपाडा डम्पिंग ग्राउंडवर भंगार अवस्थेत धूळ खात पडल्या आहेत, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय भोराडे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सन १९९९ मध्ये कल्याण महानगर परिवहन महामंडळाची स्थापना झाली असून, तेव्हापासून आजतागायत परिवहनच्या ताफ्यात एकूण ३३५ बसेस सामील झाल्या आहेत. सन २०१५ मध्ये 'जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने' अंतर्गत केंद्र सरकारचा ५०%, राज्य सरकारचा २५% आणि पालिकेचा २५% निधी मिळून एकूण ११८ बसेस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्षात ४७ बसेस परिवहनच्या ताफ्यात आल्या. मात्र, या बसेस रस्त्यावर जेमतेम २ ते अडीच वर्षेच धावल्या आणि त्यानंतर परिवहन अधिकाऱ्यांनी या मौल्यवान बसेस नेतवली येथील मॉलच्या जागेत उभ्या करून ठेवल्या होत्या. नेतवली येथील मॉलच्या जागेचा खरेदी-विक्री करारनामा झाल्यानंतर, तिथल्या ३० बसेसपैकी २० बसेस खंबळपाडा डम्पिंग ग्राउंडवर तर १० बसेस 'प्रेम ऑटो' परिवहन आगारात हलवण्यात आल्या. परंतु, तिथे योग्य देखरेख आणि सुरक्षा नसल्याचा गैरफायदा घेत कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तींनी संगनमत करून या बसेसचे टायर, बॅटऱ्या, इंजिनचे सुटे भाग आणि महागडी विद्युत उपकरणे चोरून नेल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आज या बसेसची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, तिथे केवळ बसेसचे लोखंडी सांगाडे उरले आहेत. टाटा मोटर्सच्या एका बसची किंमत जवळपास ५९ लाख ४२ हजार ३७६ रुपये इतकी आहे. अशा ३० बसेस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भंगार झाल्याने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, ताफ्यात आलेल्या १० वातानुकूलित (एसी) बसेसपैकी केवळ ४ बसेस सुरू असून ६ बसेस धूळ खात पडल्या आहेत. तसेच, अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या १० 'व्हॉल्वो' बसेसपैकीही केवळ ४ बसेस रस्त्यावर धावत असून उर्वरित ६ बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. सामान्य करदात्या नागरिकांच्या कष्टाच्या पैशातून उभ्या राहिलेल्या या सार्वजनिक मालमत्तेची परिवहनच्या अधिकाऱ्यांनी मिळून विल्हेवाट लावली असून, हा थेट जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी होऊन संबंधित दोषी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून आणि करदात्यांमधून केली जात आहे.

1 hr ago
user_जनहित न्यूज महाराष्ट्र
जनहित न्यूज महाराष्ट्र
Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
1 hr ago
40cb942b-9496-4c7e-a702-fce6601b5607

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिवा जंक्शनहून रत्नागिरीकडे संध्याकाळी ५:५० वाजता सुटणाऱ्या रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली जात नाही, ही अत्यंत मोठी हलगर्जी आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या काही लोकांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की, या गाडीत प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी खूप अडचणी येतात. चालू तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही, तर तिकीट नसलेले प्रवासी लवकर पोहोचून पूर्ण सीटवर ताबा मिळवतात. यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे, रेल्वे विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि ‘जो ज्या वेळी येईल, त्याला रिकाम्या सीटवर बसावे’ अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    1
    दिवा जंक्शनहून रत्नागिरीकडे संध्याकाळी ५:५० वाजता सुटणाऱ्या रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा पुरवली जात नाही, ही अत्यंत मोठी हलगर्जी आहे. या ट्रेनने प्रवास करणाऱ्या काही लोकांशी संवाद साधल्यावर असे लक्षात आले की, या गाडीत प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी खूप अडचणी येतात.

चालू तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना जागा मिळत नाही, तर तिकीट नसलेले प्रवासी लवकर पोहोचून पूर्ण सीटवर ताबा मिळवतात. यामुळे वेळेवर येणाऱ्या प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे, रेल्वे विभागाने यावर तात्काळ कार्यवाही करावी आणि ‘जो ज्या वेळी येईल, त्याला रिकाम्या सीटवर बसावे’ अशी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    user_Anjani kumar Dubey
    Anjani kumar Dubey
    Doctor कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये भेडसावणाऱ्या समस्यांबाबत एमआयएम नगरसेवक नफीस अन्सारी यांनी काय भूमिका मांडली आहे, यावर चर्चा सुरू आहे. त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 30 मध्ये भेडसावणाऱ्या समस्यांबाबत एमआयएम नगरसेवक नफीस अन्सारी यांनी काय भूमिका मांडली आहे, यावर चर्चा सुरू आहे. त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रेल्वे पोलिसांनी यमराजाचे रूप धारण करून रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. प्रवाशांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
    1
    रेल्वे पोलिसांनी यमराजाचे रूप धारण करून रेल्वे प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. प्रवाशांना जागरूक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने एका मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली, तसेच रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि औषधेही पुरवण्यात आली. याप्रसंगी नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड बनवण्याची आणि संबंधित माहिती मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सरकारी आरोग्य योजनांचा लाभ घेता येईल. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली आणि या लोकहिताच्या उपक्रमाचे कौतुक केले. आयोजकांनी सांगितले की, भविष्यातही असे सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जात राहतील, जेणेकरून सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतील.
    1
    नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने एका मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली, तसेच रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि औषधेही पुरवण्यात आली.

याप्रसंगी नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड बनवण्याची आणि संबंधित माहिती मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सरकारी आरोग्य योजनांचा लाभ घेता येईल. या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेतली आणि या लोकहिताच्या उपक्रमाचे कौतुक केले.

आयोजकांनी सांगितले की, भविष्यातही असे सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जात राहतील, जेणेकरून सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळू शकतील.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    Thane, Maharashtra•
    2 hrs ago
  • S.H. A. S यूथ फाउंडेशनने मुंब्रा येथे 'ड्रग्स फ्री मुंब्रा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.
    1
    S.H. A. S यूथ फाउंडेशनने मुंब्रा येथे 'ड्रग्स फ्री मुंब्रा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.
    user_Maharashtra India crime news
    Maharashtra India crime news
    Journalist Thane, Maharashtra•
    3 hrs ago
  • आज कुबा फाउंडेशनच्या वतीने नारायण नगर येथे एका वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नगरसेवक राजन नारायण किने यांनी उपस्थिती लावली.
    1
    आज कुबा फाउंडेशनच्या वतीने नारायण नगर येथे एका वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नगरसेवक राजन नारायण किने यांनी उपस्थिती लावली.
    user_Maharashtra7 tv
    Maharashtra7 tv
    News Anchor Thane, Maharashtra•
    4 hrs ago
  • पालकांनी केलेल्या तक्रारींनंतर विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी रेडियंट शाळेला भेट दिली.
    1
    पालकांनी केलेल्या तक्रारींनंतर विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी रेडियंट शाळेला भेट दिली.
    user_Maharashtra sach news
    Maharashtra sach news
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी मारुती मंदिर परिसरात शनिवारी एक दुःखद घटना घडली. मंदिरासमोर असलेला सभा मंडप अचानक कोसळला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेवेळी मंडपाखाली सुमारे 30 ते 40 भाविक दबले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना आर.पी. रुग्णालय आणि परिसरातील इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मंडप कोसळल्याने कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी केली जात आहे.
    1
    महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी मारुती मंदिर परिसरात शनिवारी एक दुःखद घटना घडली. मंदिरासमोर असलेला सभा मंडप अचानक कोसळला, ज्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये एकच गोंधळ आणि आरडाओरड झाली.

या दुर्घटनेत आतापर्यंत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेवेळी मंडपाखाली सुमारे 30 ते 40 भाविक दबले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना आर.पी. रुग्णालय आणि परिसरातील इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, जिथे काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मंडप कोसळल्याने कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. या घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून या अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी केली जात आहे.
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.