logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तंत्रज्ञानाच्या युगात लोककला जोपासणे काळाची गरज - सौ.अर्चना भोंगळे सावलहिरा येथे महिला भारुड व भजन स्पर्धा उत्साहात संपन्न. जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर बिनधास्त न्यूज नेटवर्क चंद्रपूर/कोरपना: (दि १७) लोककला केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. घरकाम आणि संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी भारुड व भजन ही पारंपरिक कला जिवंत ठेवली आहे. तुमच्या आवाजातील गोडवा आणि अभिनयातील सहजता खरोखरच कौतुकास्पद आहे.अशा व्यासपीठामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त गुणांना नक्कीच मोठी दिशा मिळेल,असे प्रतिपादन सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी केले. कोरपना तालुक्यातील सावलहिरा येथे जय जगन्नाथ बाबा महिला भारुड,भजन मंडळ व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भारुड व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी सौ.भोंगळे बोलत होत्या. पुढे बोलतांना सौ.अर्चना भोंगळे म्हणाल्या की, भारुड आणि भजन ही आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आजच्या आधुनिक काळातही महिला ही परंपरा तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहेत, सावलहिरा येथे महिलांनी या स्पर्धेतून एकजुटीचे आणि भक्तीचे दर्शन घडवले आहे.अध्यात्म आणि प्रबोधनाचा मेळ घालत महिलांनी सादर केलेल्या भजन व भारुडांनी मन अगदी प्रसन्न झाले असल्याचेही सौ.भोंगळे यांनी सांगितले. यावेळी सावलहिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'महिला भारुड व भजन' स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक लोककला जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, सरपंच उमेश पेंदोर,उपसरपंच संतोष जोगी, उमेश पालीवाल, देविदास मालेकर,पुंजाराम कोवे, दिनकर मुसळे, वसंता बहिरे, विनोद नागोसे, रामदास ठाकूर,लक्ष्मण पेंदोर,सुनील गेडाम,सुधाकर बहिरे,सुधाकर मालेकर, कुमार मुसळे,पवन मुसळे, यशोदा साकाटे, निर्मला साकाटे यांचेसह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

8 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
8 hrs ago
38d78de6-a9e9-4e27-ab3d-b7f914f1c162

तंत्रज्ञानाच्या युगात लोककला जोपासणे काळाची गरज - सौ.अर्चना भोंगळे सावलहिरा येथे महिला भारुड व भजन स्पर्धा उत्साहात संपन्न. जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर बिनधास्त न्यूज नेटवर्क चंद्रपूर/कोरपना: (दि १७) लोककला केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. घरकाम आणि संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळून महिलांनी भारुड व भजन ही पारंपरिक कला जिवंत ठेवली आहे. तुमच्या आवाजातील गोडवा आणि अभिनयातील सहजता खरोखरच कौतुकास्पद आहे.अशा व्यासपीठामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त गुणांना नक्कीच मोठी दिशा मिळेल,असे प्रतिपादन सौ. अर्चना देवराव भोंगळे यांनी केले. कोरपना तालुक्यातील सावलहिरा

1d78e91a-5e8d-43ed-9d71-d3caa58e6460

येथे जय जगन्नाथ बाबा महिला भारुड,भजन मंडळ व गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भारुड व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी सौ.भोंगळे बोलत होत्या. पुढे बोलतांना सौ.अर्चना भोंगळे म्हणाल्या की, भारुड आणि भजन ही आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे. आजच्या आधुनिक काळातही महिला ही परंपरा तितक्याच निष्ठेने पुढे नेत आहेत, सावलहिरा येथे महिलांनी या स्पर्धेतून एकजुटीचे आणि भक्तीचे दर्शन घडवले आहे.अध्यात्म आणि प्रबोधनाचा मेळ घालत महिलांनी सादर केलेल्या भजन व भारुडांनी मन अगदी प्रसन्न झाले असल्याचेही सौ.भोंगळे यांनी सांगितले. यावेळी

f49b14eb-38d1-42ba-8505-ba5775d007c6

सावलहिरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'महिला भारुड व भजन' स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक लोककला जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरुण मडावी, सरपंच उमेश पेंदोर,उपसरपंच संतोष जोगी, उमेश पालीवाल, देविदास मालेकर,पुंजाराम कोवे, दिनकर मुसळे, वसंता बहिरे, विनोद नागोसे, रामदास ठाकूर,लक्ष्मण पेंदोर,सुनील गेडाम,सुधाकर बहिरे,सुधाकर मालेकर, कुमार मुसळे,पवन मुसळे, यशोदा साकाटे, निर्मला साकाटे यांचेसह भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    1
    पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    1
    Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    user_Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Nagpur (Urban), Maharashtra•
    1 hr ago
  • Post by The Indian Matrimony
    2
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    1
    पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    Nagpur (Rural), Maharashtra•
    7 hrs ago
  • There are two types of Energy inside Negative & Positive
    1
    There are two types of Energy inside Negative & Positive
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • safety grill bacche ke liye
    1
    safety grill bacche ke liye
    user_Irshad Alam
    Irshad Alam
    Nagpur (Urban), Maharashtra•
    17 hrs ago
  • एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।
    3
    एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। 
महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है।
यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल  सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।
    user_Mazahir Anwar
    Mazahir Anwar
    Local Politician कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.