logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्यातील मार्केट सेस रद्द होणेसाठी ४ ऑगस्ट रोजी कोल्हापूरात राज्यव्यापी व्यापारी परिषद *राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार* कोल्हापूर १ सिटी न्यूज नेटवर्क कृषी उत्पन्न बाजार समिती सेसमुळे व्यापारी व ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार, व्यापारातील वाढत्या अडचणी, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणारे प्रतिकूल परिणाम, दुबार कर आकारणी या विरोधात *कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज* व *दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत नष्टे लॉन, बसंत-बहार रोड, महावीर गार्डन शेजारी, कोल्हापूर* येथे मार्केट सेस रद्द होणेबाबत राज्यव्यापी परिषद आयोजित केली आहे. देशात ज्यावेळी जीएसटी लागू केला त्यावेळी अन्नधान्य, खाद्यान्न हे जीएसटी मधून वगळले जातील असे केंद्र शासनाने जाहिर केले होते व ते वगळले देखील होते. परंतू, जुलै २०२२ पासून अन्नधान्य, खाद्यान्न व गूळ यावर जीएसटी लागू करुन व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे. जीएसटी लागू झाल्याने ‘एक देश, एक, एक मार्केट’ या संकल्पनेनुसार मार्केट सेस जाणे गरजेचे होते. मार्केट सेस रद्द होणेबाबत राज्यभरात गेल्या २-३ वर्षांपासून परिषदा घेऊन आंदोलने केली. शासनाने त्याची दखल घेत मार्केट सेस बाबत निर्णय घेणेसाठी समिती गठीत केली व त्या समितीची बैठक घेतली. सदर बैठकीत मार्केट सेस हटविणेबाबत काहीच निष्पन्न झाले नाही. मार्केट सेस हटाव हीच आमची मुख्य मागणी असताना शासनाने मार्केट समित्यांना यूजर चार्जेस आकारण्याचा किंवा वसूल करण्याचा अधिकार दिला. त्याविरोधात असंतोष निर्माण झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे ३० मे २०२६ रोजी पुणे येथे बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने मार्केट समितीला कृषी उत्पादनांच्या किंवा गैर कृषी उत्पादनांच्या विपणनांसाठी मार्केट समिती स्वत: ठरवेल अशा दराने वापरकर्ता शुल्क (यूजर चार्जेस) आकारण्याचा किंवा वसूल करण्याचा अधिकार दिला असून यूजर चार्जेस आकारण्यात येणाऱ्या काही वस्तूंवर अगोदरच जीएसटी लागू होता त्यावर पुन्हा यूजर चार्जेस लागू करणे म्हणजे मार्केट सेस, यूजर चार्जेस व जीएसटी अशा तिहेरी करांचा बोजा व्यापाऱ्यांवर लागू होणार होता. कृती समितीच्या बैठकीत विरोध झाल्यानंतर यूजर चार्जेस ला स्थगिती देण्यात आली. परंतु, त्यानंतर देखील मुंबईतील व्यापाऱ्यांना यूजर चार्जेसच्या मोठ्या रकमेच्या नोटीसा धाडल्या आहेत. मार्केट सेस हा मार्केट समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर आकारला जात असला तरी त्याचा प्रत्यक्ष भार हा ग्राहकांवरच पडत असून त्यामुळे वस्तू दरवाढ होत आहे. मार्केट सेस हटविणेसाठी राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गेल्या महिनाभरात अनेक ऑनलाईन बैठका घेतल्या. तसेच कोल्हापूर सह अनेक जिल्ह्यांत जिल्हास्तरीय मेळावे घेत राज्यातील मार्केट सेस रद्द होण्याच्या अनुषंगाने निर्णायक परिषद कोल्हापूरात घेण्याचे ठरले आहे. आज खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन मार्केट सेस रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. तसेच स्थानिक आमदारांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर प्रमाणेच उर्वरित जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात यावेत असे पूर्वी ठरले होते. त्याप्रमाणे ज्या त्या जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निवेदने देण्यात येणार आहेत. या परिषदेत मार्केट सेस विरोधात ठराव करुन त्या ठरावाची अंमलबजावणी करणेबाबत शासनाला कळविले जाणार आहे. *परिषदेस कॅमिटचे चेअरमन मोहन गुरनानी, प्रेसिडेंट दिपेन आगरवाल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, दि ग्रेन, राईस अँड ऑईल सीडस् मर्चंटस् असोसिएशन, मुंबईचे अध्यक्ष भिमजी भानूशाली, दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जितेंद्र शहा प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अमरसिंह देसाई, दि जनरल किराणा मर्चंटस् असोसिएशन, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष निलेश सेठी, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, दि बारामती मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किरवे, जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, भुसार अडत व्यापारी संघ, सोलापूरचे अध्यक्ष सुरेश चिक्कली, दि होलसेल ग्रेन अँड सीडस् मर्चंटस् असोसिएशन, नागपूरचे उपाध्यक्ष रमेश उमाठे, ग्रेन सीडस् अँड ऑईल मर्चंटस् असोसिएशन, लातूरचे अध्यक्ष पांडूरंग मुंदडा, ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेअर महासंघ, ठाणेचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांच्यासह राज्यभरातील सर्व जिल्हा व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहून मार्केट सेस विरोधातील आपली भुमिका जाहीर करतील.* परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कॅमिटचे सचिव अजित कोठारी, कोल्हापूर चेंबर व ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे पदाधिकारी तसेच परिषदेनिमित्त स्थापन केलेल्या समितीचे पदाधिकारी परिषद यशस्वी होणेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. तरी या परिषदेस मार्केट सेस संबंधित व्यापाऱ्यांनी ४ ऑगस्ट रोजी आपले व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे व दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांना प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

1 hr ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
fb7fb3be-7333-413c-8b8e-16dd339a5518

राज्यातील मार्केट सेस रद्द होणेसाठी ४ ऑगस्ट रोजी कोल्हापूरात राज्यव्यापी व्यापारी परिषद *राज्यातून मोठ्या संख्येने व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहणार* कोल्हापूर १ सिटी न्यूज नेटवर्क कृषी उत्पन्न बाजार समिती सेसमुळे व्यापारी व ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार, व्यापारातील वाढत्या अडचणी, व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणारे प्रतिकूल परिणाम, दुबार कर आकारणी या विरोधात *कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज* व *दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन* यांच्या संयुक्त विद्यमाने *मंगळवार दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत नष्टे लॉन, बसंत-बहार रोड, महावीर गार्डन शेजारी, कोल्हापूर* येथे मार्केट सेस रद्द होणेबाबत राज्यव्यापी परिषद आयोजित केली आहे. देशात ज्यावेळी जीएसटी लागू केला त्यावेळी अन्नधान्य, खाद्यान्न हे जीएसटी मधून वगळले जातील असे केंद्र शासनाने जाहिर केले होते व ते वगळले देखील होते. परंतू, जुलै २०२२ पासून अन्नधान्य, खाद्यान्न व गूळ यावर जीएसटी लागू करुन व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे. जीएसटी लागू झाल्याने ‘एक देश, एक, एक मार्केट’ या संकल्पनेनुसार मार्केट सेस जाणे गरजेचे होते. मार्केट सेस रद्द होणेबाबत राज्यभरात गेल्या २-३ वर्षांपासून परिषदा घेऊन आंदोलने केली. शासनाने त्याची दखल घेत मार्केट सेस बाबत निर्णय घेणेसाठी समिती गठीत केली व त्या समितीची बैठक घेतली. सदर बैठकीत मार्केट सेस हटविणेबाबत काहीच निष्पन्न झाले नाही. मार्केट सेस हटाव हीच आमची मुख्य मागणी असताना शासनाने मार्केट समित्यांना यूजर चार्जेस आकारण्याचा किंवा वसूल करण्याचा अधिकार दिला. त्याविरोधात असंतोष निर्माण झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती तर्फे ३० मे २०२६ रोजी पुणे येथे बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने मार्केट समितीला कृषी उत्पादनांच्या किंवा गैर कृषी उत्पादनांच्या विपणनांसाठी मार्केट समिती स्वत: ठरवेल अशा दराने वापरकर्ता शुल्क (यूजर चार्जेस) आकारण्याचा किंवा वसूल करण्याचा अधिकार दिला असून यूजर चार्जेस आकारण्यात येणाऱ्या काही वस्तूंवर अगोदरच जीएसटी लागू होता त्यावर पुन्हा यूजर चार्जेस लागू करणे म्हणजे मार्केट सेस, यूजर चार्जेस व जीएसटी अशा तिहेरी करांचा बोजा व्यापाऱ्यांवर लागू होणार होता. कृती समितीच्या बैठकीत विरोध झाल्यानंतर यूजर चार्जेस ला स्थगिती देण्यात आली. परंतु, त्यानंतर देखील मुंबईतील व्यापाऱ्यांना यूजर चार्जेसच्या मोठ्या रकमेच्या नोटीसा धाडल्या आहेत. मार्केट सेस हा मार्केट समितीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर आकारला जात असला तरी त्याचा प्रत्यक्ष भार हा ग्राहकांवरच

901f3f5e-01a3-42a4-ae2f-6b7da799d7b9

पडत असून त्यामुळे वस्तू दरवाढ होत आहे. मार्केट सेस हटविणेसाठी राज्यस्तरीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत गेल्या महिनाभरात अनेक ऑनलाईन बैठका घेतल्या. तसेच कोल्हापूर सह अनेक जिल्ह्यांत जिल्हास्तरीय मेळावे घेत राज्यातील मार्केट सेस रद्द होण्याच्या अनुषंगाने निर्णायक परिषद कोल्हापूरात घेण्याचे ठरले आहे. आज खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन मार्केट सेस रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले. तसेच स्थानिक आमदारांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर प्रमाणेच उर्वरित जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात यावेत असे पूर्वी ठरले होते. त्याप्रमाणे ज्या त्या जिल्ह्यातील खासदार, आमदार यांना निवेदने देण्यात येणार आहेत. या परिषदेत मार्केट सेस विरोधात ठराव करुन त्या ठरावाची अंमलबजावणी करणेबाबत शासनाला कळविले जाणार आहे. *परिषदेस कॅमिटचे चेअरमन मोहन गुरनानी, प्रेसिडेंट दिपेन आगरवाल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, दि ग्रेन, राईस अँड ऑईल सीडस् मर्चंटस् असोसिएशन, मुंबईचे अध्यक्ष भिमजी भानूशाली, दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जितेंद्र शहा प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सांगली चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अमरसिंह देसाई, दि जनरल किराणा मर्चंटस् असोसिएशन, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष निलेश सेठी, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, दि बारामती मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किरवे, जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, भुसार अडत व्यापारी संघ, सोलापूरचे अध्यक्ष सुरेश चिक्कली, दि होलसेल ग्रेन अँड सीडस् मर्चंटस् असोसिएशन, नागपूरचे उपाध्यक्ष रमेश उमाठे, ग्रेन सीडस् अँड ऑईल मर्चंटस् असोसिएशन, लातूरचे अध्यक्ष पांडूरंग मुंदडा, ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेलफेअर महासंघ, ठाणेचे अध्यक्ष सुरेश ठक्कर यांच्यासह राज्यभरातील सर्व जिल्हा व्यापारी प्रतिनिधी उपस्थित राहून मार्केट सेस विरोधातील आपली भुमिका जाहीर करतील.* परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कॅमिटचे सचिव अजित कोठारी, कोल्हापूर चेंबर व ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे पदाधिकारी तसेच परिषदेनिमित्त स्थापन केलेल्या समितीचे पदाधिकारी परिषद यशस्वी होणेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. तरी या परिषदेस मार्केट सेस संबंधित व्यापाऱ्यांनी ४ ऑगस्ट रोजी आपले व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावे असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे व दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांना प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • kolhapur che rajkarni dalbadlu nete zoplet kaay tyana sarkari gaadit firnyashathi nivdun dilele nahi
    1
    kolhapur che rajkarni dalbadlu nete zoplet kaay tyana sarkari gaadit  firnyashathi nivdun dilele nahi
    user_Vikram pujari
    Vikram pujari
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे
    1
    सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे 
सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे
    user_SUBHAN5151 FAKIR
    SUBHAN5151 FAKIR
    Association or organisation हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे.असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडागळे यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे, प्रिया खंडागळे म्हणाल्या भ्रष्टाचार, अनियमितता, नागरिकांच्या तक्रारी आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध विषय मांडत असल्यामुळे मला वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घ्यावी लागते. मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, प्रत्येक वेळी माझ्याशी सन्मानपूर्वक वागण्याऐवजी अपमानास्पद, अवमानकारक आणि असभ्य वर्तन करण्यात येत आहे. एक जबाबदार शासकीय अधिकारी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागण्यास बांधील असताना, माझ्याशी करण्यात आलेली वागणूक ही शासकीय सेवेतील आचारसंहितेला व लोकाभिमुख प्रशासनाच्या तत्त्वांना धरून नाही.
    1
    नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे
नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत आहे.असे म्हणत सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खंडागळे यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे, प्रिया खंडागळे म्हणाल्या भ्रष्टाचार, अनियमितता, नागरिकांच्या तक्रारी आणि माहिती अधिकार कायद्यांतर्गत विविध विषय मांडत असल्यामुळे मला वारंवार महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घ्यावी लागते.
मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, प्रत्येक वेळी माझ्याशी सन्मानपूर्वक वागण्याऐवजी अपमानास्पद, अवमानकारक आणि असभ्य वर्तन करण्यात येत आहे. एक जबाबदार शासकीय अधिकारी नागरिकांशी संयमाने व कायद्याच्या चौकटीत वागण्यास बांधील असताना, माझ्याशी करण्यात आलेली वागणूक ही शासकीय सेवेतील आचारसंहितेला व लोकाभिमुख प्रशासनाच्या तत्त्वांना धरून नाही.
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    1
    वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"
    1
    "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
    1
    अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का?
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 
अण्णाभाऊंच्या ‘माझी मैना’ या अजरामर रचनेबद्दल तुम्हाला हे सत्य आधी माहिती होतं का?
कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • माझ्या कुटुंबियांना आणि मला जीविताला अजूनही धोका आहे सूरज साखरे,.....
    1
    माझ्या कुटुंबियांना आणि मला जीविताला अजूनही धोका आहे सूरज साखरे,.....
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.