मुखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर अक्षम्य हलगर्जीपणाबद्दल शहर काँग्रेस मुखेडच्या वतीने प्रशासनाचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला. शासकीय कार्यालयांमध्ये जयंतीदिनी अभिवादन करणे बंधनकारक असतानाही, मुखेड दुय्यम निबंधक कार्यालयाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने शिवप्रेमी, अहिल्यादेवींचे अनुयायी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहर काँग्रेसने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर जोरदार ताशेरे ओढत म्हटले की, प्रशासन पूर्णपणे झोपा काढत असून, अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. या कार्यालयाचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रताप नाही; यापूर्वी राष्ट्रीय सणाचे गांभीर्य न राखता, भारताचा राष्ट्रीय तिरंगा ध्वज अत्यंत उशिरा फडकवण्याचा गंभीर प्रकार याच कार्यालयात घडला होता. या घटनांमुळे येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांचे भान राहिले आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कार्यालयातील वाढत्या अनागोंदी कारभारावर आणि भ्रष्टाचारावर हल्लाबोल करताना काँग्रेसने "आओ चोरो बांधों भारा, आधा तुम्हारा आधा हमारा..." अशी घोषणा देत प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली. सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नसून, केवळ टक्केवारी आणि मलिदा लाटण्यातच प्रशासन व्यस्त असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. राष्ट्रीय पुरुषांचा आणि आदरस्थानांचा अपमान करणाऱ्या तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेसने केली आहे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.1
- संबोधी अकादमीने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 110 जोडपी विवाहबद्ध झाली.1
- खासदार संजय जाधव यांनी आंतरवाली येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. "लाख मेले तरी चालतील, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे," अशी तीव्र प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी व्यक्त केली.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी 'जनसंवाद' उपक्रमांतर्गत नांदेड येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. जिल्हा पोलीस कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात एकूण ३७ तक्रारदारांनी आपले अर्ज सादर केले. यावेळी मालमत्ता वाद, हरवलेली इसम, सायबर फसवणूक, गुन्ह्यांचा तपास आणि अवैध व्यवसाय यांसारख्या विविध विषयांवरील तक्रारी मांडण्यात आल्या. प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, तक्रारींच्या प्रभावी निपटाऱ्यासाठी 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली असून प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा केला जाणार आहे. पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.1
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. त्यांचे हे उपोषण भाजप सरकारविरोधात आहे.1
- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकरमधून 800 ग्रॅम सोने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.1