नशा मुक्त युवा आणि निरोगी युवा या मोहिमे अंतर्गत टीबी संदर्भामध्ये जनजागृती नशामुक्त आणि टी.बी. मुक्त युवा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती- डॉ. एम. एच. सौदागर उदगीर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त आणि टी.बी. मुक्त युवा अभियान’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा तसेच क्षयरोगाबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण करावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे होते, तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून डॉ. एम. एच. सौदागर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अतिष आकडे यांनी प्रास्ताविकातून नशेचे वाढते दुष्परिणाम, युवकांवर होणारा परिणाम तसेच क्षयरोगासारख्या आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज स्पष्ट केली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. एम. एच. सौदागर यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तंबाखू, गुटखा, मद्य व इतर व्यसनांमुळे शरीरावर तसेच मानसिक आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम होतात. युवकांनी व्यसनांना ठामपणे नकार देऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच क्षयरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि वेळेवर उपचार घेण्याचे महत्त्व याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे यांनी युवक हे देशाचे भविष्य असून निरोगी आणि व्यसनमुक्त युवा पिढी निर्माण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या कुटुंबात व समाजातही आरोग्यविषयक जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वनाथ भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बालाजी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, आरोग्य संवर्धन आणि टी.बी. प्रतिबंधाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. ‘नशामुक्त युवा – निरोगी युवा’ आणि ‘टी.बी. मुक्त समाज - सशक्त भारत’या संकल्पनेला बळ देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

- भारतीय मार्केट मध्ये पुन्हा नव्याने नवीन भोंदू बाबा निर्माण झाले... .1
- केशरबाई शाळेत 'एक राखी जवानांसाठी' कार्यशाळा संपन्न. विद्यार्थी-पालकांनी बनवलेल्या राख्या सैनिकांना पाठवणार. लातूर : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था द्वारा संचलित, सौं. केशरबाई भार्गव प्रा.वि.लातूर येथे इ.३ री ‘अ’ च्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक राखी जवानांसाठी’ या अभिनव उपक्रमांतर्गत महिला पालकांसाठी विशेष राखी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महिला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. शा. स.अध्यक्ष श्री. कमलकिशोरजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून व वर्गशिक्षिका सौ. कल्पना श्याम भट्टड यांच्या कृतीयुक्त सहभागातून आयोजित या कार्यशाळेत पालकांनी आपल्या पाल्यांसोबत प्रत्यक्ष सहभाग घेत आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेल्या या राख्या देशाच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठविण्यात येणार आहेत. ‘राखी म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नसून, देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही माध्यम आहे,’ हा भाव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यशाळेदरम्यान पालकांना राखी बनविण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पालकांनी उत्साहाने सहभाग घेत सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडविला. पालकांचा प्रत्यक्ष सहभाग लाभल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंद, आत्मविश्वास, देशप्रेम व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या उपक्रमातून ‘आपल्या हातची राखी जवानांच्या मनगटावर’ हा भावनिक संदेश देत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कृतज्ञता, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार देण्यात आले. महिला पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती व सक्रिय सहभाग हे या कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी जेष्ठ शिक्षिका रुक्मिणी सलगरे उपस्थित होत्या.1
- लातुरात लोककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लातूर : बालरंगभूमी परिषद, लातूर शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात "जल्लोष लोककलेचा" या शिर्षकखाली लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नव्या पिढीला लोककलांचे ज्ञान व्हावे यासाठी लातूर शाखा व राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजर्षी शाहू महाविद्यालय, बसस्थानकाजवळ, लातूर येथे होणार असून या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्राच्या पारंपारिक लोककला, लोकगीत, लोकनृत्य, लोकवाद्य आदिविषयी सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिके होणार आहेत. नव्या पिढीला लोककलांची माहिती व महती कळावी, त्यात गोडी निर्माण व्हावी तथा या माध्यमातून नवे लोककलावंत व रसिक निर्माण व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस मोफत प्रवेश असून जिल्हा व परिसरातील अधिकाधिक सर्वच वयाच्या विद्यार्थी व रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, बालरंगभूमी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे, लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, महोत्सव प्रमुख मयूर राजापूरे, प्रा. नवलाजी जाधव, प्रा. वैभव माने, हिरा वेदपाठक, सुवर्णा बुरांडे, रवी अघाव, रवीकिरण सावंत, अॅड. बालाजी म्हेत्रे व बालरंगभूमी परिषद जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.1
- 🚨 Nanded News | नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांनी आपत्कालीन कार्यकेंद्राशी संपर्क साधावा 📍नांदेड | २६ ऑगस्ट २०२६ नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील पर्यटक व नागरिकांची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. 📢 जिल्हा प्रशासनाचे आवाहन: नांदेड जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे संपर्क साधावा. ☎️ 02462-235077 ☎️ 1077 — टोल फ्री माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास द्यावा. ⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी पोस्ट शेअर करा आणि नांदेडमधील महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedNews #NepalFlood #Nepal #Nanded #NandedUpdates #Emergency #NandigramTimes1
- [26/08, 20:11] Madhav Gaikwad: लसकाम संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न नांदेड: लसकाम संघटनेच्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील गुणवंत पिढीला प्रोत्साहन देणे आणि निष्ठावंत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आदर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. [26/08, 21:19] Wife..,💗: प्रति वर्षाप्रमाण शिवा कर्मचारी महा संघाच्या वतीने आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवत्ता चा सत्कार आयोजित केला या सत्कार सोहळ्याला ३५० गुणवंत उपस्थितव होतो गेले २९ वर्षापासून सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा चालू आहे आणि त्याचा या वर्षा चा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटन म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवर या व्यासपीठावर होते विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात २८३ क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालीमकर यांच्याही सत्कार करण्यात आला या निमित्ताने माझी मी माझ्या वतीने शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिवादन करतो त्यांचा भावी कार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... *"देश की युवा पीढ़ी खतरे में हैं" ये आंकड़े सुनकर आपके पैरों तले जमीन खिसक जाएगी ... कुछ इस तरह फर्ज़ी डिग्री वाले फेंकूओं की सरकार ने देश को बर्बाद किया है* *युवा इसलिए इस भ्रष्टाचारी सरकार को सपोर्ट नहीं कर रहा*1