logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. महाराणा प्रताप नगरचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कायापालट सुरू -आमदार अमित देशमुख, तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती. ₹१.६० कोटींच्या 16 विविध विकासकामांचा शुभारंभ. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 01 एप्रिल 2026. लातूर शहरालगतच्या नव्या वस्त्या व गावांना शहरासारख्याच दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत अंतर्गत येथे ₹१ कोटी ६० लाखांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, तर खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार निधीतून एकत्रितपणे विविध मूलभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून, एकाच गावात अनेक कामे केल्यास त्यांचा दर्जा सुधारतो आणि नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळतो, असे देशमुख यांनी सांगितले. हद्दवाढीतील तांत्रिक अडचणींमुळे ‘झालर क्षेत्रा’तील नागरिकांना सुविधा मिळण्यात अडथळे येतात, ही समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा, रस्ते, सिटीबस सेवा आणि इतर सोयी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या भागासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात महानगरपालिकेच्या हद्दीत समावेश करून या परिसराचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार १६ विविध कामांना मंजुरी देण्यात आली असून काही कामे खासदार निधीतूनही राबवली जाणार आहेत. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी तौफिक सय्यद यांची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

2 hrs ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•

More news from Maharashtra and nearby areas
  • 📍उदगीर मध्ये माजी सैनिकाचा स्वतःच्या घरीच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.. या मृत्यूच्या मागचे कारण पोलीस यंत्रणा शोधत आहे
    1
    📍उदगीर मध्ये माजी सैनिकाचा स्वतःच्या घरीच सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.. या मृत्यूच्या मागचे कारण पोलीस यंत्रणा शोधत आहे
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by नागनाथ ससाने
    1
    Post by नागनाथ ससाने
    user_नागनाथ ससाने
    नागनाथ ससाने
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    1
    विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • ------- पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा शहरातील महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन वास्तव्याने धन्य झालेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवास वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की सन २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना श्री.देवेंद्रजी फडणवीस व पर्यटन मंत्री मा.श्री.जयकुमारजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाच्या विशेष योजनेतून मंजूर ₹२.५१ कोटी निधीतून सुसज्ज हॉल, निवासी खोल्या, टॉयलेट-बाथरूम सुविधा, संरक्षण भिंत, पाणी फिल्टर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नानासाहेब डिडुळ, सतीश बप्पा जाधव व सहकाऱ्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण काम करून पाटोद्यात एक सुंदर वास्तू साकारली आहे. महानुभाव पंथाची समता, साधेपणा व सर्वसमावेशकता अधोरेखित करत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठीतील ‘लीळाचरित्र’ च्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश आज ही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पाटोदा हे त्यांच्या वास्तव्याने पवित्र स्थळ असून, या ठिकाणाचा विकास आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाकडून महानुभव पंथ व श्री चक्रधर स्वामी मंदिर विकासासाठी मोठा निधी मंजूर झाल्याने भविष्यात पाटोदा शहराला धार्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, महंत, पदाधिकारी व महानुभव पंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    -------
पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा शहरातील महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन वास्तव्याने धन्य झालेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवास वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की सन २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना श्री.देवेंद्रजी फडणवीस व पर्यटन मंत्री मा.श्री.जयकुमारजी रावल  यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाच्या विशेष योजनेतून मंजूर ₹२.५१ कोटी निधीतून सुसज्ज हॉल, निवासी खोल्या, टॉयलेट-बाथरूम सुविधा, संरक्षण भिंत, पाणी फिल्टर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नानासाहेब डिडुळ, सतीश बप्पा जाधव व सहकाऱ्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण काम करून पाटोद्यात एक सुंदर वास्तू साकारली आहे. महानुभाव पंथाची समता, साधेपणा व सर्वसमावेशकता अधोरेखित करत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठीतील ‘लीळाचरित्र’ च्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश आज ही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पाटोदा हे त्यांच्या वास्तव्याने पवित्र स्थळ असून, या ठिकाणाचा विकास आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाकडून महानुभव पंथ व श्री चक्रधर स्वामी मंदिर विकासासाठी मोठा निधी मंजूर झाल्याने भविष्यात पाटोदा शहराला धार्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, महंत, पदाधिकारी व महानुभव पंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Sanjhsuyog News Channel
    1
    Post by Sanjhsuyog News Channel
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    3 hrs ago
  • महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम. खाकी’तील माणुसकीचा स्पर्श! रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग. सुरू ॲप इन मराठी न्यूज. शुक्रवार दिनांक 01 मे 2026. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला. लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.
    3
    महाराष्ट्र दिनी लातूर पोलिसांचा रक्तदानाचा अभिनव उपक्रम.
खाकी’तील माणुसकीचा स्पर्श!
रक्तदात्यांना हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट; सहा केंद्रांवर उत्स्फूर्त सहभाग.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
शुक्रवार दिनांक 01 मे 2026. 
महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘खाकी’तील माणुसकीचा प्रत्यय देणाऱ्या या उपक्रमात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमाअंतर्गत शहरातील पत्रकार प्रकाश कंकाळ यांच्यासह विविध स्तरातील नागरिकांनी रक्तदान करून सहा विविध केंद्रांवर रक्तसंकलन करण्यात आले. सकाळपासूनच रक्तदात्यांची गर्दी दिसून आली. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या शिबिरात उत्साहाने भाग घेतला.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास पोलिसांकडून हेल्मेटचे ‘सुरक्षा कवच’ भेट देण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे रक्तदानासोबतच रस्ते सुरक्षा जनजागृतीचाही संदेश देण्यात आला.
लातूर पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ‘सेवा आणि सुरक्षा’ या ब्रीदवाक्याला साजेसा उपक्रम ठरला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ट्रॅक्टरवरील कोटींच्या दरोडेखोरीला आळा घाला – कॉम्रेड राजन क्षीरसागर
    1
    ट्रॅक्टरवरील कोटींच्या दरोडेखोरीला आळा घाला – कॉम्रेड राजन क्षीरसागर
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    7 hrs ago
  • बीडमध्ये अल्पसंख्यांकांचा एल्गार; संरक्षण कायद्यासाठी उपोषण आंदोलन
    1
    बीडमध्ये अल्पसंख्यांकांचा एल्गार; संरक्षण कायद्यासाठी उपोषण आंदोलन
    user_Sanjhsuyog News Channel
    Sanjhsuyog News Channel
    Beed, Maharashtra•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.