logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माहूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, नगर पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या संदर्भात माजी भाजप शहर सरचिटणीस सोनकर प्रमोद अविनाश सोनकर यांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, पौराणिक महत्त्व असलेल्या भानुतीर्थ तलाव परिसरात सौंदर्यीकरणाचे काम अर्धवट बंद पडल्याने मातीचे ढिगारे जमा झाले असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता करून तलावाभोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, जगदंबा हायस्कूललगतचा हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असल्याने धरमवाडी, बुद्धपुरा, वडरपुरा, कोलामपुरा, मोमीनपुरा, लकडपुरा, बागवान गल्ली, परधान पुरा यासह अनेक भागांतील नागरिकांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. हातपंप परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आणि झाडाझुडपे वाढल्याने साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडीची इमारतही मोडकळीस आली असून ती कोसळण्याच्या स्थितीत असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, वार्डातील नाल्यांची गेल्या महिनाभरापासून सफाई न झाल्याने त्या तुंबून दुर्गंधी पसरली आहे. या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा अप्रिय घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथराव शिंदे, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर आणि आमदार भिमराव केराम यांनाही पाठवण्यात आली आहे.

8 hrs ago
user_Dhananjay Govindrao Aradhye
Dhananjay Govindrao Aradhye
Newspaper advertising department माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
8 hrs ago

माहूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, नगर पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या संदर्भात माजी भाजप शहर सरचिटणीस सोनकर प्रमोद अविनाश सोनकर यांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, पौराणिक महत्त्व असलेल्या भानुतीर्थ तलाव परिसरात सौंदर्यीकरणाचे काम अर्धवट बंद पडल्याने मातीचे ढिगारे जमा झाले असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसराची

स्वच्छता करून तलावाभोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, जगदंबा हायस्कूललगतचा हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असल्याने धरमवाडी, बुद्धपुरा, वडरपुरा, कोलामपुरा, मोमीनपुरा, लकडपुरा, बागवान गल्ली, परधान पुरा यासह अनेक भागांतील नागरिकांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. हातपंप परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आणि झाडाझुडपे वाढल्याने साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडीची इमारतही मोडकळीस आली असून ती कोसळण्याच्या स्थितीत असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

bcc1b40e-25f1-48a8-b8e4-b720e90dafa3

तसेच, वार्डातील नाल्यांची गेल्या महिनाभरापासून सफाई न झाल्याने त्या तुंबून दुर्गंधी पसरली आहे. या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा अप्रिय घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथराव शिंदे, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर आणि आमदार भिमराव केराम यांनाही पाठवण्यात आली आहे.

More news from Yavatmal and nearby areas
  • यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या पार्डी नस्करी तांडा येथील शेतशिवारात शेतात कामासाठी गेलेल्या मायलेकावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात मायलेक गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाकडे अस्वलाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या पार्डी नस्करी तांडा येथील शेतशिवारात शेतात कामासाठी गेलेल्या मायलेकावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात मायलेक गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाकडे अस्वलाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    21 hrs ago
  • नांदेडमध्ये शुक्रवारी काँग्रेसने पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि इंधन टंचाईच्या निषेधार्थ शहरात अनोखे आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आयटीआय परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून भाकरी भाजत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गळ्यात पेट्रोलच्या बाटल्या आणि मेलोडी चॉकलेटचे हार घालून लक्षवेधी पद्धतीने निषेध व्यक्त केला. त्यांनी पेट्रोल पंपावर नागरिकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप करत महागाईविरोधात घोषणा दिल्या. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी बैलगाडीत दुचाकी आणून सरकारचे लक्ष वेधून घेतले. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहन चालवणे कठीण झाले असून, भविष्यात बैलगाडीचा वापर करण्याची वेळ येईल, असा उपरोधिक संदेश या आंदोलनातून देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी सरकारने तातडीने इंधन दर कमी करून टंचाई दूर करावी, अशी मागणी केली. शहराध्यक्ष अब्दुल गफार यांनी महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे सांगितले. तर काँग्रेस पदाधिकारी पप्पू पाटील कोंडेकर यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
    1
    नांदेडमध्ये शुक्रवारी काँग्रेसने पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि इंधन टंचाईच्या निषेधार्थ शहरात अनोखे आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आयटीआय परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून भाकरी भाजत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गळ्यात पेट्रोलच्या बाटल्या आणि मेलोडी चॉकलेटचे हार घालून लक्षवेधी पद्धतीने निषेध व्यक्त केला. त्यांनी पेट्रोल पंपावर नागरिकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप करत महागाईविरोधात घोषणा दिल्या. वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी बैलगाडीत दुचाकी आणून सरकारचे लक्ष वेधून घेतले. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहन चालवणे कठीण झाले असून, भविष्यात बैलगाडीचा वापर करण्याची वेळ येईल, असा उपरोधिक संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी सरकारने तातडीने इंधन दर कमी करून टंचाई दूर करावी, अशी मागणी केली. शहराध्यक्ष अब्दुल गफार यांनी महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे सांगितले. तर काँग्रेस पदाधिकारी पप्पू पाटील कोंडेकर यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • प्रेक्षकांना 'बापाचं स्वप्न पूर्ण' या मराठी लघुपटाची माहिती देण्यात आली आहे. हा एक शॉर्ट चित्रपट असून, तो पाहण्याची संधी गमावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    प्रेक्षकांना 'बापाचं स्वप्न पूर्ण' या मराठी लघुपटाची माहिती देण्यात आली आहे. हा एक शॉर्ट चित्रपट असून, तो पाहण्याची संधी गमावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैलगाडी मोर्चा काढून भाजप सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त केला.
    1
    नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैलगाडी मोर्चा काढून भाजप सरकारविरोधात आपला निषेध व्यक्त केला.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    22 hrs ago
  • अमरावती येथे, आयुक्त वर्षा लड्डा यांनी विविध कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
    1
    अमरावती येथे, आयुक्त वर्षा लड्डा यांनी विविध कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • एसडीपीआयचे (SDPI) सरफराज शेख हे बांद्रा गरीब नगरमधील बेघर आणि निराधार लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
    1
    एसडीपीआयचे (SDPI) सरफराज शेख हे बांद्रा गरीब नगरमधील बेघर आणि निराधार लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शेतकऱ्यांनी आपली डिझेलची समस्या घेऊन शिवसेना तालुका प्रमुख निलेश तिवारी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर, शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने प्रशासनाशी चर्चा केली.
    1
    शेतकऱ्यांनी आपली डिझेलची समस्या घेऊन शिवसेना तालुका प्रमुख निलेश तिवारी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर, शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने प्रशासनाशी चर्चा केली.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर सय्यद इकबाल यांनी माहिती दिली आहे की, आता जन्म दाखले वितरण सुरू झाले आहे. या सुविधेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    1
    ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर सय्यद इकबाल यांनी माहिती दिली आहे की, आता जन्म दाखले वितरण सुरू झाले आहे. या सुविधेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    17 hrs ago
  • परभणी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
    1
    परभणी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.
    user_Rahul dhabale
    Rahul dhabale
    सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.