logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पाचोरा तालुक्यात ' स्व जनगणने'ला (Self Enumeration) उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासनाच्या आवाहनाला यश पाचोरा तालुक्यात ' स्व जनगणने'ला (Self Enumeration) उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रशासनाच्या आवाहनाला यश पाचोरा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात 'स्व-गणना' म्हणजेच Self Enumeration प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत असून ही मोहीम यशस्वी होताना दिसत आहे. मोठ्या संख्येने नागरिक स्वतःहून आपली माहिती नोंदवत आहेत. या कामाला गती देण्यासाठी पाचोरा तालुक्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी १ मे रोजी तालुक्याचे प्रथम नागरिक म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ केला होता. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील १ मे ते १५ मे या कालावधीत चालणाऱ्या या 'स्व-गणना' कार्यक्रमात तालुक्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. स्व गणना या मोहिमेबद्दल माहिती देताना तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले की, "ही भारताची १६ वी जनगणना असून पहिली डिजिटल जनगणना आहे. या डिजिटल सुविधेचा लाभ घेणे, वेळेची बचत करणे, अचूक माहिती संकलित करणे आणि या राष्ट्रीय कार्यात लोकांचा सहभाग वाढवणे हा 'स्व गणना' प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे." पाचोरा तालुक्यात या मोहिमेला व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नागरिकांना आवाहन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने:भूषण अहिरे (प्रांत अधिकारी),बापू रोहोम (उपविभागीय पोलीस अधिकारी), राहुल कुमार पवार (पोलीस निरीक्षक), मंगेश देवरे (मुख्याधिकारी, नगर परिषद पाचोरा), सुधाकर मुंडे (गट विकास अधिकारी), तसेच धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगेश महाराज धामणगावकर, मौलाना जीशान रजा ,मौलाना नईम रजा, जिल्हा परिषद सदस्य राव साहेब पाटील,किरण काटकर, रफिक बागवान, शिक्षक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील, विकास पाटील, विजय ठाकूर, जावेद रहीम इत्यादींनी नागरिकांना स्वतःहून आपली स्व गणना पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. प्रगणकांना प्रशिक्षण १६ मे पासून सुरू होणाऱ्या 'घरोघरी जनगणने'साठी (Door to Door Census) प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना गो. से. हायस्कूल पाचोरा येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रगणक कर्मचाऱ्यांनी देखील आपली स्वयं-गणना पूर्ण केली आहे. पाचोरा तालुक्याने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1 hr ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधीतील मराठी भाषणाची सोशल मीडियावर धूम किंवा मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल
    1
    मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधीतील मराठी भाषणाची सोशल मीडियावर धूम
किंवा
मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. 
खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले :
✅फकीराबाबा मिनानी
✅प्रितम मथरानी
✅झामनदास गोधानी
✅शिलाबाई चावला
✅कमल भोजवानी
✅गोविंद माखीजानी
✅हेमंत बेलानी व कमल बेलानी
✅महेश ग्यानचंदानी 
✅अशोक संतवानी 
✅रवी आंनदानी
✅मुकेश साधवानी
✅रवी कुकरेजा
    user_शुरु रिपोर्टर
    शुरु रिपोर्टर
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीच्या अनास्थेमुळे गावातील अनेक मूलभूत सोयीसुविधांची कामे रखडली असून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
    4
    जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाच्या विकासाकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. पंचायत समितीच्या अनास्थेमुळे गावातील अनेक मूलभूत सोयीसुविधांची कामे रखडली असून नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
    user_M S Patil
    M S Patil
    अमळनेर, जळगाव, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू
    1
    सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू
सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    4 hrs ago
  • बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त* श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.
    1
    बुलडाणा/*गजानन महाराज मंदिरात आता मोबाईल बंद… मोबाईल सुरू दिसल्यास केला जाणार जप्त*
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावची शिस्त आणि सेवा यासाठी सर्वदूर ख्याती आहे. गजानन महाराज संस्थांकडून अनेक सुचनांचे फलक लावले आहेत. त्यांचे पालन बहुधा केले जाते पण काही याला अपवाद ठरतात. गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाई असताना सुध्दा फोटो काढले जातात. तर काही ठिकाणी थांबून फोटो काढून इतर श्री भक्तांना याचा नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे श्री मंदिर परिसरातील पावित्र्य जपण्याकरिता तसेच श्री दर्शनार्थी भाविकांना श्रींचे सहज आणि सुरक्षित दर्शन व्हावे आणि गर्दीचे व्यवस्था प्रभावीपणे करता यावे, यासाठी श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. करिता श्री मंदिरात प्रवेश करतेवेळी मुख्य प्रवेशद्वारावर कटाक्षाने आपला मोबाईल बंद करावा. श्री मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करताना निदर्शनास आल्यास आपला मोबाईल जमा करण्यात येईल. मोबाईल परत घेण्याकरिता होणारा मानसिक त्रास व आपला वेळ वाचविण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून श्री संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन श्री संत गजानन महाराज संस्थांनकडून करण्यात आले आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 min ago
  • देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दि. ०८/०५/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे गावातील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे व त्यांची पत्नी असे शेतवस्तीवरील राहते घराचे गच्चीवर झोपलेले असतांना, कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी त्यांचे डोळयावर, चेह-यावर, शरिरावर अॅसिड सदृष्य पदार्थ टाकून गंभीर जखमी केले म्हणून येवला तालुका पोलीस ठाणेस गुरनं २३१/२०२६ भा.न्या.सं. कलम १२४ (१) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी घटनास्थळ व आजुबाजूचे परिसराची बारकाईने पाहणी केली. तसेच सदर घटनेतील जखमी यांचेकडे सदर घटनेबाबत माहिती घेवून, तपास सुरू केला. सदर घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळावर मिळून आलेले भौतिक पुरावे व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खालील दोन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयात अटक केलेले आरोपी १) चांगदेव देवराम मोरे, वय ४०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक २) सचिन जालिंदर कोटमे, वय २०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक सदर घटनेतील जखमी इसम भाऊसाहेब बोर्डे व यातील आरोपी क. १ चांगदेव मोरे यांचेत शेतीचे बांधावरून जुना वाद होता. तसेच जखमी भाऊसाहेब यास यावर्षी कांद्याचे उत्पन्न चांगले झाले होते व तो आरोपीबद्दल लोकांसमोर वाईट साईट बोलत असल्याचा राग मनाज धरून त्याने शेतातील तण व काटेरी झुडूप जाळण्यासाठी आणलेले अॅसिड सदृष्य पदार्थ बाटलीमध्ये भरून घटनेच्या दिवशी रात्री यातील जखमींवर सदरचा अॅसिड हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील दोन्ही आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलीक यांचे पथक करीत आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार, येवला तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.
    1
    देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक
देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दि. ०८/०५/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे गावातील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे व त्यांची पत्नी असे शेतवस्तीवरील राहते घराचे गच्चीवर झोपलेले असतांना, कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी त्यांचे डोळयावर, चेह-यावर, शरिरावर अॅसिड सदृष्य पदार्थ टाकून गंभीर जखमी केले म्हणून येवला तालुका पोलीस ठाणेस गुरनं २३१/२०२६ भा.न्या.सं. कलम १२४ (१) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी घटनास्थळ व आजुबाजूचे परिसराची बारकाईने पाहणी केली. तसेच सदर घटनेतील जखमी यांचेकडे सदर घटनेबाबत माहिती घेवून, तपास सुरू केला. सदर घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळावर मिळून आलेले भौतिक पुरावे व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खालील दोन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्हयात अटक केलेले आरोपी
१) चांगदेव देवराम मोरे, वय ४०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक
२) सचिन जालिंदर कोटमे, वय २०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक
सदर घटनेतील जखमी इसम भाऊसाहेब बोर्डे व यातील आरोपी क. १ चांगदेव मोरे यांचेत शेतीचे बांधावरून जुना वाद होता. तसेच जखमी भाऊसाहेब यास यावर्षी कांद्याचे उत्पन्न चांगले झाले होते व तो आरोपीबद्दल लोकांसमोर वाईट साईट बोलत असल्याचा राग मनाज धरून त्याने शेतातील तण व काटेरी झुडूप जाळण्यासाठी आणलेले अॅसिड सदृष्य पदार्थ बाटलीमध्ये भरून घटनेच्या दिवशी रात्री यातील जखमींवर सदरचा अॅसिड हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील दोन्ही आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलीक यांचे पथक करीत आहे.
सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार, येवला तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.
    user_नागेश मोरे
    नागेश मोरे
    पत्रकार मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    33 min ago
  • फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना,
    1
    फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना,
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणुकीचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणुकीचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.