नांदेड महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड गणेश शिंगे यांनी गुरुवार, 30 एप्रिल सकाळी 6 वाजल्यापासून आंदोलन सुरू होईल असे जाहीर केले. बुधवारी रेल्वे स्थानकापासून महापालिकेकडे मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने पुरुष व महिला कर्मचारी सहभागी झाले होते. कचरा संकलन करणाऱ्या खासगी संस्थेने 80 ते 85 कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्याचा आरोप करत कर्मचारी संतप्त झाले आहेत. यापूर्वी झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले असून, काही कर्मचाऱ्यांनी मुंडन करून निषेधही व्यक्त केला. दरम्यान, गुरुवारपासून कामबंद झाल्यास शहरातील स्वच्छता व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- Post by नागनाथ ससाने1
- महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Mohsin ahmed khan1
- *लातूर हादरलं! लातूर मधील संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर भ्रष्टाचाराची काळी छाया; किशोर महाराज हिशोब द्या.. पत्रकार परिषद.1
- “उदगीरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे… शहरातील जळकोट रोडवरील जय मल्हार धाब्याच्या पाठीमागील वसाहतीत एका माजी सैनिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत घरात आढळून आला आहे. घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली… त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडताच ही धक्कादायक बाब उघडकीस आली. प्रकाश बाबुराव सासट्टे असे मृत माजी सैनिकाचे नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरमध्ये राहत होते. प्राथमिक अंदाजानुसार चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा… मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्ध आई-वडिलांसह राहत असलेल्या या माजी सैनिकाच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे… पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.”1