logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गूढ आणि धक्कादायक सत्य… ‘सालबर्डी’चा रहस्यमय थरार गुन्ह्यांच्या गुंत्यातून उलगडणार सत्य… ‘सालबर्डी’चा थरारक खेळ कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेली काही रहस्ये… काळाच्या पडद्याआड कायमची हरवलेलीच राहतात. पण जेव्हा या रहस्यांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा केवळ उत्तरं मिळत नाहीत तर नव्या, धक्कादायक प्रश्नांची मालिका उभी राहते. याच गूढतेच्या धाग्यांना पकडत, सत्याच्या शोधात निघालेली एक थरारक कहाणी आता ‘सालबर्डी’ या चित्रपट रूपाने समोर येत आहे. ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेल्या रहस्यांभोवती फिरत असून, त्या उलगडण्याचा प्रयत्न करताना समोर येणारे धक्कादायक सत्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. ‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंत पोलिसांच्या वर्दीत झळकणार असून, गुन्ह्यांच्या गुंतागुंतीत शिरून सत्याचा शोध घेणारी तिची पीआय मनोरमा प्रधान ही भूमिका चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळीच धार देणार आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथानकाला प्रभावीपणे पुढे नेणारी विविध जॉनरची गाणी ही या चित्रपटाची खासियत ठरत आहे. प्रत्येक गाणं केवळ मनोरंजनासाठी नसून कथानकातील भावनांना अधिक गहिरं करत प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवतं. चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

8 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
8 hrs ago
b8ce59c1-3c43-4d65-83d9-4bd52c8f5671

गूढ आणि धक्कादायक सत्य… ‘सालबर्डी’चा रहस्यमय थरार गुन्ह्यांच्या गुंत्यातून उलगडणार सत्य… ‘सालबर्डी’चा थरारक खेळ कोल्हापूर ३० सिटी न्यूज नेटवर्क इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेली काही रहस्ये… काळाच्या पडद्याआड कायमची हरवलेलीच राहतात. पण जेव्हा या रहस्यांच्या मागोमाग जाण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा केवळ उत्तरं मिळत नाहीत तर नव्या, धक्कादायक प्रश्नांची मालिका उभी राहते. याच गूढतेच्या धाग्यांना पकडत, सत्याच्या शोधात निघालेली एक थरारक कहाणी आता ‘सालबर्डी’ या चित्रपट रूपाने समोर येत आहे. ‘सालबर्डी’ हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा इतिहासाच्या अंधाऱ्या कप्प्यांत दडलेल्या रहस्यांभोवती फिरत असून, त्या उलगडण्याचा प्रयत्न करताना समोर येणारे धक्कादायक सत्य प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे. ‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंत पोलिसांच्या वर्दीत झळकणार असून, गुन्ह्यांच्या गुंतागुंतीत शिरून सत्याचा शोध घेणारी तिची पीआय मनोरमा प्रधान ही

a7f035a1-5c49-4161-84c6-6bb318dc796a

भूमिका चित्रपटाच्या कथानकाला एक वेगळीच धार देणार आहे. ‘सालबर्डी’ चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथानकाला प्रभावीपणे पुढे नेणारी विविध जॉनरची गाणी ही या चित्रपटाची खासियत ठरत आहे. प्रत्येक गाणं केवळ मनोरंजनासाठी नसून कथानकातील भावनांना अधिक गहिरं करत प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवतं. चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या व्हिडिओमध्ये पहा: कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स. लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'. कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन. योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन. सहभागी कलाकार: विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.
    1
    शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आयोजित २१ व्या शिव महोत्सवात कागल येथील डी. आर. माने कॉलेजच्या ग्रुपने 'देवीचा जागर' हा कार्यक्रम सादर केला. या ऊर्जावान सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
या व्हिडिओमध्ये पहा:
कागलच्या कलाकारांचा हाय-एनर्जी परफॉर्मन्स.
लोककलेचा वारसा जपणारा 'देवीचा जागर'.
कोरिओग्राफर शुभम सोनुले यांचे विशेष दिग्दर्शन.
योगिता खाडे मॅम आणि हसीना मालदार मॅम यांचे मार्गदर्शन.
सहभागी कलाकार:
विश्वजित वाघमारे, सूरज कुऱ्हाडे, स्वरंगी सारंगले, रसिका आवळे, आदिका भोसले, तनुजा जाधव, रूपाली भोसले, श्रुतिका पाटील आणि स्मिता कुऱ्हाडे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    1
    हुपरी येथील अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी आणि पोक्सो प्रकरणातील दोन आरोपींना इचलकरंजी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अ‍ॅडव्होकेट रियाज बाणदार यांनी मांडलेले तांत्रिक मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    55 min ago
  • सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    1
    सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .
    1
    विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे  नागरिकांचे म्हणणे.  वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे. हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.
    1
    सोलापूरमध्ये रविवारी पार पडलेल्या चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी हिने दमदार कामगिरी करत वेदिका सासने हिला एकतर्फी पराभूत करून महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब पटकावला. या विजयानंतर अमृता पुजारी हिचे नाव महिला कुस्तीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले आहे.
हरीभाई देवकरण प्रशाला मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व निर्झरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य स्पर्धा पार पडली.
    user_Solapur News
    Solapur News
    सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    2
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange
    3
    पिंपरी चिंचवड : -
हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं...
#हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव
#Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.